दहशतवादाचे परिणाम काय फक्त आपल्यालाच सोसावे लागतात का? दहशतवादाची जिथून सुरुवात होते त्यांना कधीच काही चटके बसत नसतील का? सगळेच पाकिस्तानी दहशतवादी असतात का? अर्थात चित्रपटाची ओळख करून देण्याची हि काही पद्धत नसावी. पण हे विचार मनात आल्याशिवाय हा चित्रपट बघू नये. माध्यमांना जर समाजमनाचा आरसा समजत असाल तर नक्कीच या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी तरी का होईना हा चित्रपट बघावा.
चित्र पहिले: शिकागो, एका हॉस्पिटलमध्ये एक बाई येऊन हुंदके देत रडतेय.
चित्र दुसरे: लाहोर, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एक रॉक कॉन्सर्टची तयारी चालू आहे. अचानक एक जमाव लाठ्या घेऊन येतो, तिथल्या जागेची नासधूस करतो.