Skip to main content

चित्रपट

लाईफ ऑफ पाय : मला भलताच आवडलेला चित्रपट

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 17/01/2013 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे काय आहे की - या समस्त जगातील कोणत्याही गोष्टीचे, वस्तूचे अथवा प्राणीमात्राचे समिक्षण करण्यास मी एक अत्यंत नालायक मनुष्य आहे (हेही समिक्षण त्यात आले असावे.) याचे कारण असे की एखादी गोष्ट /वस्तू / प्राणीमात्र मला आवडले की भलतेच आवडते आणि वाईसे वर्सा. मग त्यात उडदामाजी असलेले काळे-गोरे मला दिसत नाही.

कांती शाह नावाच कल्ट

लेखक पिंपातला उंदीर यांनी मंगळवार, 15/01/2013 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल लॅपटॉप वर एड वुड हा रिचर्ड बरटन- जॉनी डेप यांचा चित्रपट बहुदा २८ व्या वेळी पाहत होतो. एड्वर्ड डेविस 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुड मधला निर्माता आणि दिग्दर्शक. ६० आणि ७० च्या दशकात याने एलीयेन्स, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. अमेरिका मध्ये Golden Turky Award नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे.

द लास्ट अ‍ॅक्ट

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 17/12/2012 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
१२.१२.१२. ला साहेबांच्या वाढदिवसाच्या जाहिरातींनी पेपरची पाने भरलेलली होती त्या टाळुन पुढे जात असताना एका चित्रपटाच्या जाहीरातीने नजर खेचुन घेतली होती. चित्रपटाचे नाव होते "The Last Act". चित्रपटाच्या प्रिमियर साठी निवडलेला दिवस होता १२.१२.१२ त्याचे कारण म्हणजे चित्रपटाच्या डायरेक्टर्स ची संख्या आहे १२ आणि चित्रपटाचे कथानक घडतेही १२ शहरात. द लास्ट अ‍ॅक्ट ही भारतातली पहिली कॉलॅबरेटीव्ह फिचर फिल्म आहे. "द लास्ट अ‍ॅक्ट" मागची कल्पना अगदी साधासोपी आहे.

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

जो पर्यंत प्राण आहे.... जब तक है जान

लेखक केदारविदिवेकर यांनी बुधवार, 14/11/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
यश राज फिल्म्स' - YRF, नाम तो याद होगा....(" *** नाम तो याद होगा ".. हा YRF चा अजरामर झालेला डायलॉग कोण विसरू शकेल..), असं जिव्हारी लागण्यासारखं नकळत, अबोलपणे कदाचित बोलून गेले असतील 'यश चोप्रा', असं वाटून जातं काहीसं, त्यांना हा माझा मानाचा मुजरा... 'जीवेत शरदम शतम' म्हणायचं राहून गेलं, असं काहीसं वाटून गेलं असेल तमाम सिनेमाप्रेमी लोकांना आणि त्यांना ही चुटपूट सदैव बेशक लागून राहील. पाहूया त्यांची ही 'सतत तेवत राहणारी प्रेमाची मशाल' कोण पुढे घेऊन जाईल ? शेवटी जस आपण म्हणतो, "सचिन तो सचिनच, किंवा लता ती लताच, तसं यश चोप्रा ते यश चोप्राच".

स्कायफॉल-

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 05/11/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी चित्रपटात सकस कथा, स्पष्ट व्यक्तिचित्रण व अतिप्रगत छायालेखन यांचा संगम अनेक वेळा दिसून आलेला आहे. या सर्व व्यक्तिचित्रणात चार्ली चाप्लीन यांचा ट्रॅम्प, ब्रॅम स्टोकर यांचा काउंट ड्राक्युला , इयान फ्लेमिंग यांचा जेम्स बॉण्ड व स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा इंडियाना जोन्स हे लोकप्रिय आहेत. ५० वर्षे टिकून जेम्स बॉन्ड याने त्यात आघाडी घेतली आहे यात शंकाच नाही. नुकताच प्रदर्शित झालेला "स्कायफॉल" हा॑ चित्रपट कथेत जरा कमी असला तरी फोटोग्राफी , अभिनय, व्यक्तिचित्रण यात सरस ठरलेला आहे. पूर्वी दुखावलेला एक ब्रिटिश गुप्तहेर आता सायबर टेररिस्ट झालेला आहे.

पुराना मंदीर और पुरानी यादे ( बालपणीच्या आठवणी )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी सोमवार, 05/11/2012 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
परवा हेलोवीन होता. अमेरिकेत तर निसर्ग चेटकीण , भुतांच्या स्वरुपात प्रत्येक अमेरिकावासियांच्या दारावर उभे ठाकले आहे. जर्मनीत ह्या सणाचे विशेष महात्म्य नाही. पण माझे मन मला माझ्या बालपणीच्या आठवणी मध्ये रमले. भुतांच्या गोष्टी आजी , आजोबा ह्यांच्या कडून ऐकल्या गेल्या. माझा पिंड भुतांच्या गोष्टीवर बालपणी पोसल्या गेला. आमच्या सोसायटी मध्ये गच्चीवर भाड्याने विडीयो आणून ३ सिनेमे सलग पाहण्याची परंपरा कोजागिरीच्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने सुरु झाली.

इंगलिश विन्गलिश...

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 04/11/2012 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
इंगलिश विन्गलिश... इंग्रजी विंग्रजी.... काय असतं बुवा हे ? लहानपणापासून इंग्रजीला घाबरणारे कितीकसे पाहिलेत ! निरनिराळे अनुभव आपल्यालाही अनेकविध अंगांनी आले असतीलच.. बेशक.......शाळा, कोलेज, कार्यालय वगैरे......हो हो आठवा ते अनुभव.... रम्य ते दिवस, अनुभव, मित्रांसोबत केलेली मजा, नीट इंग्रजी न आल्याने कित्येकांची उडणारी भंबेरी आपण पाहिली, खिल्ली उडवली, पोटं दुखेस्तोवर हसलो वगैरे. इथे तर नेमकं 'आर बाल्की' निर्मितीने तर आपल्या सारख्यांच्या घरचंच उदाहरण घेऊन कदाचित सिनेमा बनवलाय असं वाटतंय... "इंगलिश विन्गलिश"..

चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा

लेखक आळश्यांचा राजा यांनी बुधवार, 31/10/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी. प्रकाश झा यांनी काही चांगले चित्रपट अलीकडे दिलेले आहेत. मला आवडलेले म्हणजे अपहरण, गंगाजल. व्यवस्थेचे बर्‍यापैकी ज्ञान त्यात दिसले होते. पोलीस इन्स्पेक्टर रँकच्या अधिकार्‍यांना आयजी रँकचे गणवेश चढवणार्‍या आणि पोलीस कमिशनर या पदाच्या अधिकार्‍यांना हास्यास्पद पद्धतीने रंगवणार्‍या हिंदी सिनेसृष्टीकडून फारशा अपेक्षा कधीच नव्हत्या. काही अपवाद आहेत, त्यात झा आहेत असे वाटत असतानाच हा चक्रव्यूह नावाचा वैचारीक गोंधळ बघण्यात आला.

बाँबे टॉकीज

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 21/10/2012 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमधल्या बर्‍याच धामधुमीनंतर दोनेक दिवसांपासून थोडा रिकामा वेळ मिळाला. रिकामपणाचे उद्योगही खोळंबले आहेत, पण लॅपटॉपला अत्यंत प्रेमाने वागवल्यामुळे त्याने मुकेपण धारण केलं होतं. ( तरीही कानसेन कसंबसं निभावून नेलं खरं) त्यामुळे नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर बर्‍याच दिवसांचे पाहायचे पाहायचे म्हणून कित्येक दिवसांपासून ठेवलेले सिनेमे आधी पाहायचे ठरवलेयत. सकाळीच काही नवीन शोधावं म्हणून पाहात होते. खरंतर काल रात्री नाना पाटेकरचा कुठल्याशा मराठी मंडळातली जुनीपुरानी मुलाखत पाहून हा माणूस इतका शहाणा आहे, तर त्या फालतू हिंदी सिनेमांतून अतिफालतू भूमिका का करतो हा प्रश्न पडला होता.