Skip to main content

चित्रपट

द वॉक - एक अप्रतिम अनुभव

लेखक कोमल यांनी रविवार, 18/10/2015 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
जर मी तुम्हाला विचारलं कि तुमची आवड काय आहे? तर मला कैक उत्तरे मिळतील. स्वतःच्या आवडीचं काम कोण कोण करत आहे असं विचारलं तर बऱ्यापैकी कमी हात वर येतील. पण जर मी असा प्रश्न केला की, स्वतःच्या आवडीलाच ध्येय बनवून, एक स्वप्न बघून त्याच्यासाठी वेडं होणं कितीजणांना जमतं, तर फारच कमी उदाहरणं मिळतील. अशाच एका वेडयाची गोष्ट आहे "द वॉक". न्यूयॉर्क. ध्येयवेड्या लोकांचं शहर. आणि पॅरिस स्वप्नाळू आर्टिस्ट लोकांचं ठिकाण. आपल्या ध्येयवेड्या आर्टिस्ट चा प्रवास चालू झाला पॅरिस पासून न्यूयॉर्ककडे. गोष्ट काही फार नवीन नाही पण अगदीच जुनी पण नाही आणि अप्रचलित तर अगदीच नव्हे.

ये कैसी अजब दास्ता हो गयी है

लेखक संदीप ताम्हनकर यांनी गुरुवार, 08/10/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुरय्या जमाल शेख ने 'ये कैसी अजब दास्ता हो गयी है' हे गाणं गायलं आणि त्यावर अभिनय केला तेव्हा ती साधारण 34 वर्षांची होती. 'रुस्तुम आणि सोहराब' (रुस्तुम ऐ सोहराब - 1963) ही तिच्यासाठी आजच्या भाषेत कमबॅक फिल्म होती. नायक पृथ्वीराज कपूर आणि प्रेमनाथ असे बुलंद नट होते. अजून एक माहिती म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक 'विश्राम बेडेकर' होते. हिंदी सिनेमामध्ये अनेक सुंदर चेहऱ्याच्या नट्या झाल्या, अनेक अभिनय संपन्न नट्या झाल्या, अनेक सुरेल गायिका झाल्या पण या तिन्हीचा सुवर्ण संगम म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हे गाणं आवर्जून बघा.

हाऊ मेनी कॉलम्स डिड ही गेट?

लेखक अजिंक्य विश्वास यांनी बुधवार, 07/10/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
’How many columns did he get?’ व्हीनस - २००६ ऑस्कर कधी कधी खूप कद्रूपणे वागते. अर्थात हा कद्रूपणा ऑस्करची उंची कमी करतो. त्या व्यक्तीची नाही , ज्याला इतकी नामांकने मिळूनदेखील एकही ऑस्कर कधी मिळाले नाही. (नाही म्हणायला, लाईफ टाईम अचिव्हमेंट देऊन आपला खुजेपणा तेवढा दाखवला.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

तलवार

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 04/10/2015 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
तलवार २००८ सालच्या आरुषी तलवार "ऑनर किलिंग" या गाजलेल्या प्रकरणावर मेघना तलवार या घेऊन आल्या आहेत "तलवार". या गाजलेल्या प्रकरणात काय घडले असेल याची उत्सुकता त्या काळात शिगेला पोचली होती. नव्हे मिडियाने पोचवली होती. त्यात काय घडले असेल याची नाट्यमय कहाणी म्हणजे “तलवार”. सध्या निकाल लागलेल्या त्या प्रकरणावर पूर्णपणे आधारित आहे हा चित्रपट. आरुषी तिचे आई-वडील अन नोकर हेमराज यांना त्या काळात मिडीयाने लोकप्रिय (?) बनवले होते. जर ते "ऑनर किलिंग" असेल तर त्यात काय घडले असेल? मुळात ऑनर किलंग असेल कि नसेल?

दगडी चाळ

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 03/10/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपट - दगडी चाळ "दगडी चाळ" या दोन शब्दांनी सगळ्यात आधी काय आठवते? तर मुंबईतला राजकारणी बनलेला डॉन अरुण गवळी अन त्याच्या कारवाया. कारण दगडी चाळ हा मुंबईतला भायखळा भागातला भाग हा त्याचा अड्डा किंवा घर होते कैक काळ. त्यामुळे दिग्दर्शकाने कितीही स्पष्ट पाटी दिली (सुरु होण्या आधी) तरी चित्रपटाच्या नावावरून आणि एका मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आणि बाकी डीटेल्स वरून प्रेक्षकांना काय तो अंदाज लागतोच. दगडी चाळ आणि १९९६च्या आसपास असलेली तिथली मुंबईतली दहशत अन या दहशतीखाली फुलणारे प्रेम या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे दगडी चाळ.

मसान: एक आधुनिक शोकात्मिका

लेखक ए ए वाघमारे यांनी शुक्रवार, 02/10/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर बरेच दिवसांनी आलो.म्हणून वाटलं जरा जुन्याच लेखापासून सुरूवात करू. ******************************************** मसान: एक आधुनिक शोकात्मिका ‘मसान’ या अनुराग कश्यप स्कूलमधून निघालेल्या नव्या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय नाव आहे ‘फ्लाय अवे सोलो’. आणि हेच शीर्षक अधिक समर्पक आहे असं ‘मसान’ बघितल्यावर वाटलं. मसान नावावरून या चित्रपटात काहीतरी स्मशानासंबंधी, भुताखेताचं , अतर्क्य, गूढ कथानक असेल असा समज होण्याची शक्यता आहे. पण ही कहाणी तशी नाही.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

मराठी चित्रपट - "तू ही रे"

लेखक समीर_happy go lucky यांनी गुरुवार, 01/10/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
तू हि रे (मराठी) मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही.

कॅलेंडर गर्ल्स

लेखक सुजल यांनी मंगळवार, 29/09/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेंडर गर्ल्स माझ्या मते मधुर भांडारकर ने दोनतीन वर्षांपूर्वीच डिक्लेयर केलाय. मी या या विषयावर चित्रपट काढणार आहे म्हणून . त्याच सगळ वेल प्लाण्ड व्यवस्थित अभ्यास करून चित्रपट असतात हे सांगायला नकोच . अर्थात त्याच्या चित्रपटांचा प्लॉट ही ठरून गेलाय. रियल लाईफ वर आणि जास्त करून सेलिब्रिटी वर्ड मध्ये जे काय चाललेलं असत त्या वर्ड मधल्या भानगडी / त्या वर्ड मध्ये शिरण्या करता कराव्या लागणाऱ्या उचापत्या /त्या वर्ड मध्ये "औट ऑफ द वे" जाऊन कराव्या लागणाऱ्या तडजोडी . ग्लॅमर वर्ड मधला नाटकीपणा या सगळ्याच मिश्रण करून त्याचे सिनेमे असतात.