कॅलेंडर गर्ल्स
कॅलेंडर गर्ल्स
माझ्या मते मधुर भांडारकर ने दोनतीन वर्षांपूर्वीच डिक्लेयर केलाय. मी या या विषयावर चित्रपट काढणार आहे म्हणून . त्याच सगळ वेल प्लाण्ड व्यवस्थित अभ्यास करून चित्रपट असतात हे सांगायला नकोच . अर्थात त्याच्या चित्रपटांचा प्लॉट ही ठरून गेलाय. रियल लाईफ वर आणि जास्त करून सेलिब्रिटी वर्ड मध्ये जे काय चाललेलं असत त्या वर्ड मधल्या भानगडी / त्या वर्ड मध्ये शिरण्या करता कराव्या लागणाऱ्या उचापत्या /त्या वर्ड मध्ये "औट ऑफ द वे" जाऊन कराव्या लागणाऱ्या तडजोडी . ग्लॅमर वर्ड मधला नाटकीपणा या सगळ्याच मिश्रण करून त्याचे सिनेमे असतात.
मिसळपाव