Skip to main content

चित्रपट

अ लेडी विथ द कॅमेरा…

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 04/05/2018 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ च्या काळात इजिप्त धुमसत होता. मुस्लीम ब्रदरहूड आणि जनता यांच्यातला वाद शिगेला पोचला होता. तेहरीर चौक या सगळ्या घडामोडींचं केंद्र बनलं होतं. रोज हजारो माणसं तिथं येत-जमत, निदर्शनं करीत असतं. तेव्हा ’एक २०-२२ वर्षांची मुलगी आपल्या कॅमेरानं हे सगळं टिपत असे. आजूबाजुची परिस्थिती, अंधाधुंद माजलेली अराजकता, वारंवार निघणारे मोर्चे-निदर्शनं, त्यांच्यावरची दडपशाही, लष्कराचं डोळ्यात भरणारं अस्तित्व, जनतेतला रोष असं बरचं काहीसं तिनं आपल्या कॅमे-यात कैद केलं होतं.

ऑक्टोबर

लेखक पिशी अबोली यांनी मंगळवार, 24/04/2018 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या महत्वाच्या गरजा भागलेली आजची तरुणाई. कुठच्यातरी भयंकर अडचणींमधून मार्ग काढून काहीतरी नेत्रदीपक करण्याची निकड संपलेली. जगण्याचं कारण काय, असा प्रश्न पडतोय, हे कळण्याइतका विचार करण्याची सवय नाही, आणि तरी त्या प्रश्नाच्या गर्तेत कधी ना कधी अडकून भरकटणारी, त्या डोळ्यांत भरणाऱ्या भरकटलेपणावर आपापल्या कुवतीने उत्तरं शोधणाऱ्या, सुचवणाऱ्या जगावर कावलेली तरुणाई. ऑक्टोबरमधला डॅन म्हणून सहजपणे आपला वाटू शकतो. व्यवहारात मंद, आणि तरी काहीतरी करण्याची इच्छा असणारा, ते करण्यासाठी मार्ग माहीत नसलेला, आणि मग ती काही करण्यासाठीची ऊर्जा उगाच जगाला हडतुड करत वाया घालवणारा डॅन.

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/04/2018 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
" चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो " काही दिवसांपूर्वी माझ्या धाकट्या बहिणीने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र 'चलो एक बार फिरसे वर..'लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे.

आम्ही दोघीच्या निमित्ताने

लेखक पारा यांनी मंगळवार, 17/04/2018 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण बघताना कंटाळा आला नाही म्हणजे चित्रपट आवडला असं समजायचं का? की चित्रपटाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात जे घडतं त्याने तुम्हाला फरक पडला तर त्या चित्रपटाचा प्रभाव पडला असं म्हणता येईल? आम्ही दोघी तसं काहीच करत नाही. कुठल्याच व्यक्तिरेखेशी मी समरस होऊ शकलो नाही. प्रिया बापट आणि तिच्या बाबांमधला असंवाद मला कुठेच स्पर्श करून गेला नाही. त्या दोन्ही व्यक्तिरेखा कोरड्या आणि प्लास्टिकच्या वाटल्या मला. नाही म्हणायला मुक्ता बर्वेचा संयत अभिनय थोडा कुठे मनाला भिडतो, पण तिचा रोल तसा फार नाहीच. गावाकडच्या एका मुलीचं बेअरिंग ती पहिल्या सीनला जे पकडते ते अगदी शेवटपर्यंत.

एकमेवाद्वितीय ग्रेटा गार्बो

लेखक महामाया यांनी शुक्रवार, 13/04/2018 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेटा गार्बो आठवली अन् मन हळहळलं. कां...? कारण तिच्या मुळेच मला हालीवुडचा लळा लागला. 1990 साली जेव्हां गार्बो वारली, तेव्हां मला तिचं नाव देखील ठाउक नव्हतं. पण ती गेली, त्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समधे तिच्यावरील गोविंदराव तळवळकरांचा अग्रलेख ‘एक सुंदर गूढ’ अप्रतिम असाच होता. त्याची सुरवात ‘AGE CANNOT WETHER HER; NOR CUSTOM STALE’ या वाक्याने झाली होती. त्या अग्रलेखात गार्बो सोबत इनग्रिड बर्गमनचा ओझरता उल्लेख होता. तो अग्रलेख वाचून मी गार्बोच्या प्रेमात पडलो. कारकीर्दीच्या शिखरावर असतांना तिने निवृत्ति पत्करली असल्यामुळे असेल कदाचित, पण तिच्याबद्दल मनांत उत्सुकता निर्माण झाली.

वलय - प्रकरण ३४ ते ५२ (समाप्त)

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 09/03/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण २९ ते ३३ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42181 प्रकरण 34 शेवटी राजेश मोहिनीला सोबत स्वतःच्या गाडीत घेऊन निघाला. ती अर्धवट धुंदीत राजेशच्या बाजूला बसली होती. मोहिनीने "यंग गर्ल" हा परफ्यूम लावला होता. त्याचा सुवास अगदी छान, मस्त आणि मादक होता. अगदी फक्त लेडीजला शोभेल असा! थोडी कमी शुद्धीत असल्याने ती त्याला जास्त चिकटून बसली होती आणि त्यामुळे तिच्या शरीराचा गंध राजेशच्या शरिराला हळूहळू लागत होता.

वलय (कादंबरी) - प्रकरण २९ ते ३३

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 07/03/2018 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण २४ ते २८ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42176 प्रकरण 29 इकडे रागिणी सूरजच्या ब्राझीलहून परत येण्याची वाट बघत होती. संध्याकाळ झाली होती. स्वतःसाठी स्वयंपाक बनवून ती जेवली. मग सूरजला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तो कॉल उचलत नव्हता. मग झोपतांना सहज बातम्या बघाव्या म्हणून तिने टीव्ही लावला. ‘फ्रेश न्यूज- आप तक, आपके घर तक!” हे चॅनेल सुरु होते. "फिल्मी खुलासा" या कार्यक्रमात निवेदक ओरडून ओरडून सांगत होते: "फेमस हॉरर सिरीयल की फेमस ऐक्ट्रेस रागिणी के बारे में एक बडा खुलासा! एक ऐसा सच जो आजतक किसीको नही था पता!

वलय (कादंबरी) - प्रकरण २४ ते २८

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/03/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण 24 राजेश सोबतच्या दु:खद ब्रेकपनंतर जीवनाला अचानक मिळालेली सुखद कलाटणी तिला आठवली. तिने मुद्दाम राजेशला असे सांगितले होते की ती यापुढे प्रोफेशनल रिलेशन कायम ठेवेल म्हणजे राजेश बेसावध राहील आणि तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार नाही. राजेशकडून नकार आला तर असे सांगायचे हे तिने आधीच ठरवले होते. नंतर सोनी बनकरला राजेशसोबत झालेल्या ब्रेकपची कल्पना दिल्यानंतर ती काही दिवसांनी हॉस्टेल सोडून गेली होती. तिने मॅडम अकॅडमीच्या फायनल इयरच्या असाईनमेन्ट बऱ्याच आधी संपवल्या होत्या आणि रीतसर "मॅडम" चे प्रोव्हीजनल सर्टिफिकेट मिळवले. मग तिने कायमचे पुण्याला घरी परत जाऊन आईला ब्रेकपबद्दल सांगितले.

वलय (कादंबरी) - प्रकरण १९ ते २३

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 01/03/2018 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १७ आणि १८ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42104 --- (आज पाच प्रकरणे १९ ते २३ एकदम टाकतो आहे. मग २४ वे प्रकरण ६ मार्चला प्रसिद्ध होईल!) प्रकरण 19 बस ड्राइवरने अचानक जोरात ब्रेक दाबल्याने राजेशची तंद्री भंग पावली. बसमध्ये बाजूच्या सीटवरचा रा. म. मालवणकर यांचे “जीवनाचे शिल्पवृक्ष” हे पुस्तक वाचणारा आधीच्या स्टँडवर केव्हाच उतरून गेला होता. धर्मापूरला जाऊन तो जे करणार होता त्याद्वारे त्याच्या प्रतिशोधाच्या शोधार्थ एक पाऊल तो टाकणार होता. धर्मापूरच्या “धर्म वार्ता" या वृत्तपत्र कार्यालयात तो पोहोचला.

वलय (कादंबरी) - प्रकरण १७ आणि १८

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 28/02/2018 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १६ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42100 प्रकरण 17 सकाळी दहा वाजता आईने बनवलेलं भाजणीचं थालीपीठ हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यासोबत खातांना राजेश आईला म्हणाला, “मस्त झालंय थालीपीठ आणि ठेचा! आणि सोबत ताजं दही असल्याने झकास बेत आहे. आता दुपारी तीनेक वाजेपर्यंत तरी भूक लागणार नाही. मी नाश्टा झाला की धर्मापूरला जाऊन येतो जरा.” “अरे राजेश! काय नुसता फिरत असतोस? आजच्या दिवस आराम केला असतास, मग उद्या गेला असतास. आज आपल्या गावातल्या नदीवरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात संध्याकाळी जाऊ आपण!” “आई!