Skip to main content

चित्रपट

सेक्रेड गेम्स: ठो-कळे

लेखक वनफॉरटॅन यांनी सोमवार, 03/09/2018 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय woke लोकांसाठी कंटेंटचं इतकं दुर्भिक्ष्य आहे, की अक्षरश: कोणतीही नवीन कलाकृती मस्त खपून जाते. त्या कलाकृतीला खरोखर चांगलं निर्मितीमूल्य, दर्जेदार लेखन/दिग्दर्शन मिळालं की ती प्रेक्षकांच्या मनात अढळपद मिळवते. ह्यामुळे इतर म्हणाव्या तर बारीक, म्हणाव्या तर गंभीर चुकांकडे सरसकट दुर्लक्ष होतं. (पुढील लेखात पांढऱ्या ठशांत 'रसभंग' आहेत.) नेटफ्लिक्सची सेक्रेड गेम्स ही आजकाल अतिशय चर्चेत असलेली भारतीय मालिका. मालिका त्रैभाषिक आहे. मुख्य पात्रांतले संवाद हिंदी/इंग्रजीत असले तरीही कथा मुंबई पोलिसांभोवती फिरणारी असल्यामुळे मराठीचा वापर इंग्रजीपेक्षा जास्त आहे.

All You Need To Know About Online Piracy

लेखक Saketh4005 यांनी गुरुवार, 26/07/2018 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
Online piracy the name which is making a hell lot of money for some of those who are illegally publishing the movies on the sites. Online movie piracy is killing the film industry and is making money for them which they are earning in a huge amount. Earlier in those days when the usage of the internet is only limited to the top cities, they used to make the piracy in the form of CD's and DVD's it would be easy for the film production house to take the necessary actions.

सुपरहिरोंचा शोले!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 21/07/2018 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
"इन्फिनिटी वॉर" च्या सकाळी साडेआठच्या शोला सुद्धा फुल्ल गर्दी, शिट्ट्या, टाळ्या, हास्याचे कारंजे! पूर्ण चित्रपटभर मिस्कील विनोदी डायलॉगची सुखद पेरणी! एकेका सुपरहिरोच्या एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या! यात भारंभार सुपरहिरो आहेत. एकामागून एक येतच राहतात. इतके की काहींचे नाव पण आपल्याला माहिती नाहीत. मी शेवटी मोजणे सोडून दिले. मार्व्हल अवेंजर्स 3 (इन्फिनिटी वॉर) मध्ये थेनॉस पूर्ण चित्रपटभर भाव खाऊन जातो आणि संगळ्या डझनभर सुपर हिरोंना शब्दशः पुरून उरतो. हा सुपर व्हिलन थेनॉस बराच हल्क सारखा दिसतो, कलर मात्र जांभळा!

फर्जंद: थरारक युद्धपट!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 20/07/2018 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख २० जून २०१८ या दिवशी लिहिला असून त्या दरम्यान आणि नंतर वारेच दिवस मिसळपाव वर काहीतरी कारणास्तव मला लेख अपलोड करता येत नव्हते. म्हणून आता टाकत आहे) काल रात्री "फर्जंद" बघितला. तिसरा आठवडा सुरु असूनसुद्धा हाऊसफुल होता. स्टोरी (कथा), स्क्रीनप्ले (पटकथा), लिरिक्स (गीत लेखन)आणि डायलॉग (संवाद)अशा चार गोष्टी आणि त्यासुद्धा पहिल्याच चित्रपटात दिग्पाल लांजेकर याने समर्थपणे हाताळल्या आहेत. अमितराजचे संगीत आणि केदार दिवेकरचे पार्श्वसंगीत (बॅगराउंड म्युझिक) दोन्ही छान आणि समर्पक आहेत. त्यात नाविन्य आहे त्यामुळे ऐकायला छान रीफ्रेशिंग (ताजेतवाने) वाटतं.

जफर पनाही : लव्ह लेटर टू द सिनेमा (उत्तरार्ध )

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 17/07/2018 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० मध्ये अचानक जफर पनाहीच्या अटकेची बातमी जगासमोर आली. जगातल्या जवळपास सगळ्या देशांमधून या अटकेच्या निषेधात सूर उमटला. पण इराणीयन सरकार ठाम होतं. जफरवर सरकारविरोधात जनमत भडकवण्याचा ठपका ठेवला गेला होता. एका अर्थाने तो देशद्रोहच होता. त्यांना ६ वर्षांची कैद झाली. कैदेवर भागलं नाहीच तर पुढची किमान वीस वर्ष त्यांच्यावर चित्रपट बनवण्यापासून, लिखाण करण्यापासून , आपली मतं-विचार सार्वजनिकरित्या व्यक्त करण्यापासून आणि देश सोडण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं. जफरनी असं काय केलं होतं कि त्यांच्याच मातृभूमीतलं सरकार त्यांना अशी सजा देत होतं ?

४ गोष्टींच्या निमित्ताने!

लेखक लई भारी यांनी रविवार, 15/07/2018 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
'लस्ट स्टोरीज' च टायटल सार्थ असलं तरी मला त्यात मार्केटिंगचा भाग जास्त वाटतो. नेटफ्लिक्स आताशी भारतीय वेब-सेरीज घेऊन येतंय त्यामुळे कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी ह्या माध्यमाची बलस्थानं(पक्षी: सेन्सॉरमुक्ती) वापरून चांगल्या मालिकांमध्ये सुद्धा 'बिनधास्त' माल भरपूर टाकला आहे. कथेची गरज आहेच म्हणा पण त्यानिमित्ताने प्रसिद्धी पण होतेच. खरतर या मालिकेतल्या छोटेखानी ४ कथा या रूढार्थाने 'कथा' म्हणण्यापेक्षा, त्या पात्रांच्या जीवनातले काही प्रसंग आहेत. सरधोपट शेवट-सुरुवात न करता त्यांच्या जीवनातला एक तुकडा दिग्दर्शकांनी आपल्या समोर मांडला आहे. किमान पहिल्या ३ कथांमध्ये तरी हे अगदी प्रकर्षानं जाणवत.

जफर पनाही : अ लव्ह लेटर टू द सिनेमा… (पूर्वार्ध )

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी सोमवार, 09/07/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या देशात जर एक असा कलाकार असेल ज्याचे चित्रपट नेहमीच आंतरराष्ट्रीय स्थरावर नावाजले गेले आहेत आणि जातात. त्याला आतापर्यंत जवळपास २५ हून अधिक अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार किंवा सन्मान मिळाले आहेत, ज्याचे चित्रपट जगातल्या सर्व मोठ्या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले जातात, तर त्या कलाकाराचं त्याच्या देशात काय स्थान असेल? देशातल्या सरकार कडून त्याला मिळणारी वागणूक कशी असेल? ते त्याच्या चित्रपट बनवण्यावर किंवा लिखाण करण्यावर २० वर्ष बंदी नक्कीच घालणार नाहीत… पण समजा हा कलाकार इराण सारख्या कट्टर मुस्लीम राष्ट्रातला असेल तर?

कितीसा पुरोगामी आहेस ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/06/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

Everything , everything

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 21/05/2018 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , चित्रपट समीक्षण वगैरे करण्याइतका मी दर्दी नाही.. त्यातही इंग्लिश चित्रपट --ज्यातले सगळे संवाद नेमके कळाले असतीलच असं नाही.. झरकन जाणारे सगळे सब टाईटल्स सुद्धा १००% वाचले गेल्याची शक्यता नाही. झालंच तर पात्रांची नावं पण विसरलोय (इंटरनेटवर पुन्हा शोध घेता येईल पण कट्ट्यावर गप्पा मारताना कशाला पुन्हा तो खटाटोप).. तर समीक्षण नाही पण एका सुंदर चित्रपटाबद्दल सांगावेसे वाटतेय.. ते सांगण्याचा हा प्रयत्न मुळात मी इंग्लिश चित्रपट फारसे बघत नाही..

चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 07/05/2018 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! Simple, Free Image and File Hosting at MediaFire ( एका थोर व्यंगचित्रकाराने म्हणजे बाळासाहेब ठाकरे ह्यांनी चार्लीचे काढलेले व्यंगचित्र ) नुकत्याच संपलेल्या साली म्हणजे २० डिसेंबर २०१७ रोजी पु लं च्या घरी चोरी झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि अगदी सहजच पु लं ज्याचे निस्सीम चाहते त्या चार्ली चॅप्लिनच्या घराच्या चोरीची कथा आठवली.