Skip to main content

भूगोल

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान!

लेखक मार्गी यांनी रविवार, 18/04/2021 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. काल १७ एप्रिलला संध्याकाळी आकाशामध्ये चंद्राने केलेलं मंगळाचं सुंदर पिधान बघता आलं. काही काळ मंगळ चंद्राच्या पलीकडे लपला होता आणि नंतर समोर आला. म्हणजेच हे चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान- अर्थात एक प्रकारचं ग्रहण होतं. सूर्यास्ताच्या आधीच मंगळ चंद्राच्या पलीकडे गेलेला होता. ठीक ७:२१ ला चंद्राच्या बिंबापलीकडून मंगळ परत समोर आला. माझ्या टेलिस्कोपमधून ह्याचे फोटोज व व्हिडिओज घेता आले. नुसत्या डोळ्यांनीही हे दृश्य बघता आलं.

उगवता "तेजस्वी" तारा

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 12/11/2020 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्रोत खरंच आज देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि नक्कीच ती उणीव आपले तेजस्वी यादव भरून काढतील. त्यांना नाही जमले तर अजुन 11 तरुण कार्यकर्त्यांची अख्खी फळीच लालू यादवांनी घरी उभी केलीये. खूप खूप उपकार आहेत या भारतभुमीवर कि एकाच घरात त्यांनी इतके तरुण कार्यकर्ते निर्माण केले. इथेच न थांबता त्यांनी स्त्रीसशक्तीकरण देखील आपल्या घरातूनच सुरु केले. पहिल्यांदा स्वतः करून दाखवायचे आणि आपल्या कृतीतून समाजाला संदेश द्यायचा या थोर विचारसरणीचे ते पाईक आहेत..

डीडीएलजे : स्वप्न दाखवण्याची २५ वर्षे

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 20/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
विसाव्या शतकाच्या अखेरीस भारताने आपली आर्थिक धोरणं बदलली आणि दोन-चार वर्षांत त्याचा परिणाम इथल्या मध्यमवर्गावर दिसू लागला.लोकांच्या खिशात खुळखुळणारा पैसा वाढला होता,उच्छभ्रु समजल्या जाणाऱ्या दुचाकीला लोकाश्रय मिळु लागला होता, केवळ सिनेमात दिसणारे ब्रँड्स भारतात आपली दालनं उघडू लागले होते. या साऱ्याचा बदल इथल्या तरूणाईवर होणं स्वाभाविक होतं. त्यांच्या इच्छा,स्वप्न यात कमालीचा बदल झाला तो ही फार झपाट्याने. याच बदलाच्या टप्प्यावर 'राज मल्होत्रा' भारतीय तरुणांना भेटला (आणि तरुणींना भावला.) उनाड,मित्रांसोबत गाड्या उडवत फिरणारा, मेंडोलीन वाजवणारा बेजबाबदार.

ट्रम्प व्हिझिट पुणे

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 24/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद.

शिवजयंतीच्या निमित्ताने... लाल महालावरील शिवाजी महाराजाचा सर्जिकल स्ट्राईक

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 19/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने...

लाल महालावरील शिवाजी महाराजाचा सर्जिकल स्ट्राईक

 शिवजयंती उत्सवाच्या पर्वणीत महाराजांच्या पराक्रमाची गाथा लष्करी अधिकार्‍यांच्या नजरेतून सादर करण्यात विलक्षण आनंद होतो आहे. महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून फत्ते केलेल्या अनेक कारवायातून जगातील लष्करी इतिहासात त्यांचे उत्तुंग व विराट व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. त्यात शायिस्ताखानाला खतम करायची सर्जिकल स्ट्राईक मोहीम अग्रणी आहे.

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 21/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे. तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो.

शोक कुणाला? खंत कुणाला?

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 25/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

तुझे शहर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 02/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत