Skip to main content

भूगोल

शिवनेरिची वारी

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 24/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी शिवनेरीला जाउन आलो. आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिथे झाला त्या ठिकाणी जायचं ह्या कल्पनेनच सॉल्लिड्ड मस्त वाटत होतं. काय करणार. ज्यावेळी पुण्यात येवुन पहिल्यांदाच लाल महाल पाहिला होता त्यावेळी तिथली माती कपाळाला लावणारी आम्ही येडी. त्यामुळे असं गडावर जायच म्हणल की स्फुरण चढतचं. :) मग काय माहिती गोळा करुन चार टाळकी जमवुन निघालो. फोटो टाकतोच पण आधी थोडासा इतिहास टाकतो गडाचा. हा गड छत्रपतींच्या काळात स्वराज्यात नव्हता. वाचुन विश्वास नाही ना बसला.

लोहगडची सफर

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 10/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
लोहगडला जाउ जाउ अस करत करत बरेच रविवार नुसतेच येत आणि जात होते. प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेगळी कारण. होय नाही करत शेवटी मी आणि राजा दोघच जायच फिक्स केल. तर आता नमनालाच जास्त तेल न घालता घ्या फोटू. हा जाताना पायवाटेवरुन काढलेला फोटु. हा जाताना दिसणारा विसापुर. अवाढव्य आहे हा किल्ला. हा दिसतोय लोहगड. हा त्याचा डावीकडचा भाग. बुलंद किल्ला आहे एकदम.

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 03/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

प्रवासवर्णन - पहिलाच प्रयत्न

लेखक मस्तानी यांनी मंगळवार, 27/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! शाळेत असताना लिहावे लागलेले निबंध यापलीकडे लिखाण न केलेली मी ... पण गेले काही दिवस नियमितपणे मिपावर बागडत असते, त्यामुळे "मी सुद्धा लिहू शकेन" असा काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो वापरूनच आज हे धाडस करीत आहे. बघू कसं काय आणि कितपत जमतंय ते ! आम्ही सध्या आहोत अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात. एकाच हिमवादळात चांगला फुट- २ फुट बर्फ आणणारा हिवाळा आणि कायम शून्याखाली तापमान अशी थंडी चालू होण्याआधी अधाशासारखे फिरून घेणारे लोक आहेत इथे ... २/३ हिवाळे पाहील्याने आम्हीही "आधीच" एखाद्या ठिकाणी जाऊ असा विचार केला. बरं, एक ठिकाण ऐकून माहित होत. Pictured Rocks National Lakeshore.

जिथे सागरा धरणी मिळते........

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 15/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
'व्हाय डोन्ट यू गो टू विजिट द सबमरिन?' डॉ. नवीनने विचारले. 'सबमरिन? मालदिव में सबमरिन है?' डॉ. अनिल. 'तिथे आहे.... ' डॉ. नविनने खिडकीतून बाहेर दाखवले.. समुद्रात दूर अंतरावर एक पांढरी बोट दिसत होती. इन्दिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून समुद्र फार देखणा दिसतो. मी मुंडके खाली वळवले आणि मुकाटपणे चहा पिऊ लागलो. मालदीवमध्ये चार महिने राहूनही इथे २०० फुटांवर पाण्यात एक सबमरिन आहे हे मला पहिल्यांदाच समजत होते! शनिवारचा दिवस म्हणजे मालदीवमधील सुट्टीचा दिवस. माझा मित्र डॉ. अनिल मगदूम भारतात परत जाणार असल्यामुळे मला भेटायला मालेमध्ये आला होता. तिथूनच तो कोचीला जाणार होता.

बदल

लेखक प्रभो यांनी रविवार, 27/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कालच घरी आलो दसर्‍यासाठी.

इस्रोचे अभिनंदन

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 24/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
इस्रोचे अभिनंदन काल ओशनसॅट-२ या दूरसंवेदन उपग्रहासह एकूण सात उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात पाठविलल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) अभिनंदन. सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण झाले. ओशनसॅट-२ उपग्रहाबरोबरच जर्मनीचे चार छोटे उपग्रह, तुर्कीचा एक व स्वित्र्झलडचा एक असे एकूण सहा उपग्रह अवकाशात एकाचवेळी सोडले गेले. एप्रिल २००८ मध्ये इस्रोने एकाचवेळी दहा उपग्रह एकाचवेळी सोडून एक जागतिक विक्रम केलेला आहे. इस्रोचे पुन्हा एकादा अभिनंदन! (सतत निगेटिव्ह बातम्या वाचाव्या ऐकाव्या लागतांना असल्या बातम्या म्हणजे एक 'सिल्व्हर लायनिंगच' आहे. )