Skip to main content

औषधोपचार

अ‍ॅकलेशिया कार्डिया-रोग आणि उपचार -२

लेखक तिमा यांनी शनिवार, 17/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.

अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव -१

लेखक तिमा यांनी गुरुवार, 15/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती. गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अ‍ॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे.

पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 20/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का? पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये...... (आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.) (पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल. पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये....

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 01/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे....... मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन.

देव पाहिलेला माणूस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 23/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

अवकाशाचा वेध १ : सप्तर्षी व कृष्ण विवर

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 27/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :
  1. अंगिरस (Epsilon of Ursa Major)
  2. अत्रि (Delta Ursae Majoris)
  3. क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
  4. पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
  5. पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
  6. मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
  7. वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).

औषध

लेखक मोक्षदा यांनी शुक्रवार, 24/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्यातील काही महत्त्वाचा भाग सर्वांच्या माहितीसाठी इथे देत आहे. औषधांचा वापर, विक्री, आणि रुग्णाचे हित आणि औषध प्रशासनाची जबाबदारी याबद्दल यात खूप चांगल्या तर्‍हेने उहापोह केलेला आहे. ------------------------------- औषधांच्या वापरामुळे मानवी जीवन सुखकर होत चालले असताना औषधांच्या चुकीच्या वापरामुळे उद्भवणारे भयानक परीणाम सुद्धा वाढीस लागले हि बाब सामाजिक स्वस्थ्याकरिता अत्यंत हानिकारक आहे.

बंबईसे आया मेरा दोस्त

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 21/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते! पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”

योग – प्रतिबंधात्मक उपाय

लेखक विअर्ड विक्स यांनी बुधवार, 25/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
योग – प्रतिबंधात्मक उपाय शाळेत असताना विज्ञानात शिकलो होतो कि उत्क्रांतीतून मर्कटाचा मानव झाला.मनुष्य प्राणी हा जरी जात्याच बुद्धिमान असला तरी त्यास पडलेले एक कोडे उलगडत नव्हते, ते म्हणजे या जीवनाचे ध्येय काय ? महामुनी पतंजलींनी हे कोडे उलगडले - नश्वर जीवनास योगरूपी संजीवनी देऊन ! योग हा शब्द संस्कृत धातू 'युज' पासून बनलेला आहे.युज म्हणजे संयोग पावणे वा एकत्र जुळून येणे. आत्म्याचा परमात्म्याशी संयोग म्हणजेच योग होय ! योगमध्ये प्रामुख्याने चार प्रवाह मानले जातात – कर्म योग, भक्ती योग, ज्ञान योग आणि राजयोग .राजयोग हा महामुनी पतंजली प्रणीत अष्टांग योगाचाच एक भाग आहे.