Skip to main content

विरंगुळा

ट्वेन्टी इयर्स ऑफ धांगडधिंगा

लेखक चिनार यांनी बुधवार, 19/06/2019 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
ट्वेन्टी इयर्स ऑफ सरफरोश....फिफ्टीन इयर्स ऑफ लक्ष्य वगैरे ट्रेंड सुरु आहेत. पण ट्वेंटी इयर्स ऑफ 'धांगडधिंगा' विषयी कोणी काहीच कसं बोलत नाहीये ! ९९ साली आलेल्या ह्या सिनेमाची जाहिरात 'टायटॅनिकला मराठी उत्तर' अशी करण्यात आली होती. टायटॅनिकमध्ये शेवटी लाकडी फलटीवर पुरेशी जागा असतानाही जॅकने मरण का स्वीकारले ह्याचे उत्तर हा सिनेमा बघितल्यावर मिळते. धांगडधिंगा सिनेमाची कथा कोर्टाच्या पार्श्वभूमीवर घडते. टायटॅनिक जहाजातून वाचलेल्या सातशे प्रवाश्यांनी धांगडधिंगा बघितल्यावर, आम्हाला का वाचवले म्हणून जहाजाच्या कॅप्टनवर त्याच कोर्टात केस केली होती म्हणे.

गेटिसबर्गचा कसाई

लेखक प्रलयनाथ गेंडास्वामीं यांनी मंगळवार, 18/06/2019 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
कोलोरॅडोच्या त्या भयाण वाळवंटात दिवसभर फिरून फिरून अगदी वैतागून गेलाअसता एखादा… रणरणत ऊन भाजून काढत होतं… उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…ध्यास होता तो एकाच गोष्टीचा…औषधाच्या कुपीचा... "फार फार तर तीन किंवा चार दिवसच आपल्या हातात आहे आता ..." हुंदका आवरता आवरता तिचे ते शब्द त्याच्या कानात घुमत होते निघाल्यापासून ... जेव्हा त्याची मुलगी आजारी पडली तेव्हा तो औषध आणायाला, घोड्यावर दोन दिवस प्रवास, मधे एक रात्री मुक्काममार्गावर . त्या रात्री, त्यांला सेंट लुईस येथुन जमानिम्यासह निघालेला पायोनियरांचा एक गट मिळाला...

दोसतार - २१

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 12/06/2019 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/44307
मी काय काय बोलत होतो आणि आई ते ऐकत होती. त्यावेळी माझ्या पेक्षा माझा चेहेराच कदाचित जास्त बोलत असावा. कारण आईचे माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या चेहेर्‍याकडेच जास्त लक्ष्य होते. सोमवारी सहलीला जायचे या विचारांनीच माझ्या चेहेर्‍यावर काहितरी मजेदार रंगीत रांगोळी उमटत असावी. माझ्यासारखीच ,आई पण त्या नक्षीत हरवून गेली.
यवतेश्वर म्हणजे धगांचा डोंगर. पाटणला असताना पाऊस खूप असायचा. कधीतरी कोयनानगरला गेलो तर जंगली जयगड चा डोंगर ढगात झाकलेला दिसायचा पण त्या ढगात कधी गेलो नव्हतो.

धूपगंध (५)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 09/06/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://misalpav.com/node/44648
डोळ्यातल्या पाण्यामुळे आबांना समोरचे धूसर दिसू लागले. समोरचे काही आता पहायचे नव्हतेच मुळी. त्याची गरजही नव्हती. डोळ्यासमोर वेगळेच जग होते. ते जग पहायला या जगातली दृष्टी गरजेची नव्हती. आठवणी अशा एकट्या कधीच येत नाहीत. एक आली की तीचा पदर धरून दुसरी येतेच.
या भरजरी आठवणींचा पदर धरून सोबत काही गमती जमतीही आल्या. मानसकन्येचा प्रयोग होता. खानदेशात बहुधा रावेर ला असावा. मध्यंतराला चहावाला पोर्‍या कुणासाठीतरी विड्या घेवून आला. साने मॅनेजरना ते अजिबात आवडायचं नाही.

सदाभाऊची हॅकिंग...

लेखक चिनार यांनी बुधवार, 22/05/2019 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
गजाभाऊ : अरे काय म्हणतं सदा... काय लेका दिसतंच नाही तू आजकाल? सदा: काही नाही भाऊ ...मी इथंच आहो तसा ....थोडं नवीन काम मिळालं होतं म्हणून तालुक्याला गेलतो चार दिवस. गजाभाऊ : कोणतं काम मिळालं तुले? सदा: ते थोडं शिक्रेट हाय भाऊ.. गजाभाऊ : एवढं काय शिक्रेट हाय बा..? सदा: जौद्या ना भाऊ.. गजाभाऊ : अबे तुये सारे शिक्रेट मले माहिती आहे लेका, तुये बँकेचे सारे पासवर्ड मले माहिती आहे. अन ह्यापेक्षा मोठं कोणतं शिक्रेट हाय बे? सदा: आता तुम्ही हॅकर माणूस भाऊ..

मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 14/05/2019 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
डायना जेव्हा तिच्या प्रियकरासोबत (दोडी अल फयाद) कार अपघातात वारली, तेव्हा तिच्याबद्दल साऱ्या जगभरात हळहळ व्यक्त झाली होती. एका करारी बेधडक राजस्नुषेचा मृत्यू चटका लावणारा होता. विचार करा, जिच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अशी ख्याती असलेल्या इंग्लडच्या राणीची सून होणं किती कठीण गोष्ट असेल. राजघरण्याची प्रतिष्ठा सांभाळणं आणि ते टिकवण्यासाठी कित्येक मुखवटे राजघराण्यातील व्यक्तींना चढवावे लागतात.

नन्दिनीची डायरी - निर्णय

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 14/05/2019 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
नन्दिनीची डायरी - निर्णय वेटिंग रूममध्ये ती एकटीच बसली होती. "एला" मी हलक्या आवाजात हाक मारली. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. पंचविशीच्या आसपास, अतिशय रेखीव चेहरा, पिंगट डोळे, केस मात्र कोरडे, फिस्कारलेले, काळजी न घेतले गेल्यासारखे. आणि चेहर्यावर मलूल असा भाव. मला पाहून कसनुसं हसू तिच्या चेहर्यावर उमटलं पण ते वरवरचं होतं. माझ्या मागोमाग ती आत आली. समोरच्या सोफ्यावर बसली. नजर जमिनीवर लावून ठेवलेली. सुरुवातीच्या औपचारिक गप्पा चालू झाल्या. एला तिच्या पार्टनरसोबत राहत होती. हा देश आता लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर की चूक या वादाच्या पुष्कळ पुढे गेला आहे.

एकच वादा...कोहली दादा

लेखक चिनार यांनी सोमवार, 13/05/2019 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
कोहलीचा सकाळी सकाळी "टीम इंडिया मिशन २०१९" या व्हाट्स ऍप ग्रुपवर मॅसेज, "पोट्टेहो, आयपीएल संपली. आता नाचगाने बंद करा सायचेहो. उद्या सकाळी पाच वाजता मले सारे मैदानात पाहिजे..." तिकडून विजय शंकरने लगोलग अंगठ्याची स्मायली पाठवून दिली. केदार जाधवचा पण लगेच रिप्लाय..."हाव भाऊ..येतो" बाकी कोनीच अजून मॅसेज वाचला नाही हे पाहून कोहली चिडला. "मॅसेजही वाचून नाही राहिले ना पोट्टे.... माया दिमाग खराब करू नका" "भाऊ चिडू नका भाऊ...मी उठवतो साऱ्यायले..", केदार जाधव स्क्रीनवर रोहित इज टायपिंग असा मॅसेज दिसतो. "भाऊ..ते बघा..रोहित उठला वाट्टे.." "अन बाकीचे?...झोपूनच राहा लेकहो..

धूपगंध (३)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 13/05/2019 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
पंच तुंड रुंड माळधर पार्वतीश आधी नमीतो विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्नेश्वर गणपतो मग तो.... मागील दुवा https://www.misalpav.com/node/17685 ( मित्रानो क्षमा असावी. खूप मोठ्या काळानंतर पोस्ट करतोय.