Skip to main content

विरंगुळा

शिरपूरचा पार

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 09/12/2009 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
"च्यामारी ह्या म्हातार्‍याच्या, हातात घावुदे एकदा... नरडंच आवळतू साल्याचं", हणम्या स्टेशनमास्तरच्या केबीन मधुन बाहेर येता येता करवादला. त्याची धुसफूस ऐकुन तिथेच बसलेल्या दोघा-तिघांनी दात विचकले. नान्याच्या पाठीत धपाटा घालुन तो तिथेच एका दगडावर बसला, बाजुला तोंडातील तंबाकुची पींक टाकुन, तो परत चालु झाला. नान्याच्या पाठीच धीरडं झालेले बघुन बघ्यांची चांगलीच करमणुक झाली. हणम्या जाम तापला होता, तापणार नाय तर काय हो? एकतर जवान गडी, चार महिन्यांपलिकडेतर हळद लागली, आठ्वड्याला दोन रोज ह्याची मुंबई ड्युटी, म्हनजे हा आपला चार रोज तिकडंच की!

आमची `शोध'(?)पत्रकारिता!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 09/12/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचं बोलणं चोरून ऐकण्याची आणि ते दुसर्‍यापर्यंत विनाविलंब पोहोचवायची आमची सवय तशी फार जुनीच. म्हणजे इतकी जुनी, की, आम्ही बातमीदार होणार असं भविष्य आमच्या पिताश्रींनी खूप लहानपणीच- म्हणजे `आमच्या' लहानपणी- वर्तवलं होतं. आज आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो, याचं कारण, पाळण्यातले पाय पाहून भविष्य वर्तवण्याचे शास्त्र अलीकडे लोप पावत असताना, असे शास्त्र खरोखरच अस्तित्वात होते, याचा ठोस पुरावा आमच्या रूपानेच आमच्या हाती आहे. बातमीदाराने (पक्षी- रिपोर्टराने) पुरावा हाती असल्याखेरीज बातमी `डिस्क्लोज' करू नये, असं पत्रकारितेच्या वर्गात शिकवलं जातं असं म्हणतात.

मलकापूरचा म्हातारा

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/12/2009 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण किती रम्य असतं नाही? लहान असताना आमच्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे रत्नागिरी-मुंबई किंवा रत्नागिरी-पुणे असायचा. दोन्हीकडे आत्या राहायच्या, राहतात. त्यामुळे वर्षातून एकदा, विशेषतः मे महिन्यात किंवा काही सणानिमित्त एक ट्रिप या ठिकाणी असायची. रत्नागिरीत झोपाळ्यावर खेळतानाही आम्ही बसची जमवलेली तिकिटं घेऊन रत्नागिरी-मुंबई एसटी असा खेळ खेळायचो. असो. मुंबईपेक्षाही पुण्याचा प्रवास जास्त वेळा झाला. पुण्याची साधी गाडी रात्री सात वाजता निघायची. नंतर ही वेळ वाढत नऊपर्यंत गेली. तेव्हा सेमीलक्‍झरी गाडीत बसणं म्हणजे चैनच होती. त्यातून वडील एसटीत असल्यानं वर्षातून दोन महिने पास मिळायचा.

एका बाजेची गोष्ट

लेखक मराठे यांनी सोमवार, 07/12/2009 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजीकडे जायचो तेव्हाचा तिने सांगितलेला एक किस्सा. तिच्याकडे रात्री गाद्या घातल्यानंतर आजी, मामा, आई, मावशी गप्पा मारत बसायचे. खरं तर त्या गप्पा ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. पण हा किस्सा तिने सांगितला आणि त्या रात्री माझी झोपच उडाली. ती मी ऐकलेली पहिली "भयकथा" पण ती "कथा" नव्हती.. तो तिचा अनुभव होता. आजीचं सासर उरणचं. पहिल्या बाळंतपणानंतर ती घरी आलेली होती. तिला झोपायला घरातली एक बाज दिली होती. ती बाज खूप दिवस अडगळीच्या खोलीतच पडलेली होती. रात्री कधीतरी तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळाला बघायला म्हणून ती उठली. पाहते तर बाळाच्या जवळ एक जख्ख म्हातारी बाई बसलेली.

माझे खाद्य-पेय जीवन-४

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 06/12/2009 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः मद्य, मद्यपान व मद्यपी यांच्याविरुद्ध तीव्र आणि टोकदार मते असणार्‍यांनी हे लिखाण वाचले नाही तरी चालेल. मद्यपानाचे मला काही उदात्तीकरण वगैरे करायचे नाही, जे आहे, जे पाहिले, ते सांगायचे आहे, इतकेच. चिअर्स! चहा, कॉफी ही प्रातःकालीन उत्साहवर्धक पेये झाली की इतर पेयांचा विचार सुरु होतो. त्यातली बाटलीबंद शीतपेये तूर्त सोडून देऊ. इतर पेयांमध्ये लिंबू सरबत, कोकम सरबत आणि पन्हे हे सरताज. लिंबू सरबतात बारीक वेलदोड्याची पूड आणि बर्फाचे भरपूर खडे असले की ते अधिक चविष्ट लागते. कोकम हे तहान भागवणारे खरे, पण त्यात पाण्याऐवजी थंडगार सोडा घातला तर ते अधिक मादक लागते.

स्नोई...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 04/12/2009 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता'च्या व्हिवा पुरवणीत (३ डिसें.०९) माझ्या नववीतल्या, इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलीचा- सलोनीचा- हा लेख प्रसिध्द झालाय.) Picture 006 गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी आणि माझी बहीण-विदिशा- आम्ही दोघंही आई-बाबांच्या अगदी मागे लागलो होतो. एक छानसं कुत्र्याचं पिल्लू घरी आणा म्हणून. शेवटी, सहा-सात महिन्यांपूर्वी बाबांनी तळहातावर धरून एक पपी आणला.

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर पुन्हा दहशतवादी हल्ला !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 04/12/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई (ब्रेबॉन)- ता. ३ डिसेंबर (पीटीआय,एएफपी,एबीसी,ळक्षज्ञ) - दहशतवादी हल्ल्यांना सरावलेल्या मुंबईत आज पुन्हा दक्षिण मुंबईतल्या ब्रेबॉन स्टेडियमवर "क्रिकेट-ए-तोबा" ह्या भारतीय संघाने श्रीलंकन क्रिकेट संघावर हल्ला चढवला आणि पुन्हा मुंबईस (आणि अवघ्या क्रिकेटजगास) वेठीस धरले. ह्या हल्ल्यामध्ये श्रीलंकन क्रिकेटचे एटीएस प्रमुख मुथय्या मुरलीधरन ह्यांच्यासह सहा गोलंदाजांची गोलंदाजी शहीद झाल्याचे वृत्त आहे. सकाळी १० च्या सुमारास नुकताच "क्रिकेट - ए - तोबा" मध्ये निवड झालेल्या एम विजय ह्याने काही फैरी झाडल्या तेव्हा कमिशनर कुमार संगकारा ह्यांना पुढे यू घातलेल्या वादळाची कल्पना आली नाही.

न्युयॉर्क

लेखक प्रभो यांनी बुधवार, 02/12/2009 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
"भे**...मी NY ला येतोय या थँक्सगिविंगच्या सुट्टीला.....आयेगा नं तू मिलने???" ऑफिसमधला एक जुना मित्र जो आता दुसर्‍या कंपनीत आहे तो जीमेलवर बोलत होता. शेवटची भेट झालेली दीड वर्षापूर्वी....त्याच्या अमेरिकेला जाणार म्हणून दिलेल्या पार्टीला... ईकडे रूमपार्टनर्स आणी बाकिच्या मित्रांचा वॉशिंग्टन डी सी आणी अटलांटीक सिटी ला जायचा प्लान फिसकटला.. म्हणून मग न्युयॉर्क ला जायचं ठरवलं..आधीचा विकांत पण एका मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी न्युयॉर्कची नाईट लाईफ हुंगण्यात गेला होता. यावेळेस काही प्रसिध्द ठिकाणं पाहण्याचे ठरवले.. थँक्सगिविंग डे ला न्युयॉर्कचे एक आकर्षण असते ते म्हणजे मेसीची थँक्सगिविंग डे परेड.