Skip to main content

विरंगुळा

अपॉरच्युनीटी कॉस्ट

लेखक शब्देय यांनी सोमवार, 30/11/2009 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे तीन-सव्वा तीन वाजलेले. स्टडी ग्रुपचे पार्टनर्स आजची केस स्टडी सोडवून नुकतेच आपापल्या रुमवर परतलेले.याच्या डोक्यात मात्र अजूनही "अपॉरच्युनीटी कॉस्ट", आजच्या केस स्टडीचा विषय, याचेच विचार घोळत होते. एक्सिक्युटीव्ह एम्.बी.ए. च्या पहिल्या सेमिस्टरच्या पुस्तकांच्या मधे कुठेतरी अ‍ॅश ट्रे सापडला.तुडूंब भरलेला.पर्यायच नव्हता.

सर्कसः पुन्हा अनुभवलेली

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 30/11/2009 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घराच्या मागे खरे तर खाडी होती. ती बुजवून त्यावर बांधकाम कधीतरी सुरू होणार हे नक्कीच. ती खाडी कधी बुजविली ते कळले नाही. पण आता तर त्या जागेवर सर्कससुद्धा उभी राहिली. गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे १६ ऑक्टो. पासून ती सुरू आहे. नेहमी प्राण्यांचा आवाज ऐकू येत असे. दररोज दुपारी १ वाजल्यापासून त्यांचे संगीत सुरू होते. ते रात्री ९:३० ते ९:४० पर्यंत सुरू असते. मी बहुधा १६ वर्षांपूर्वी सर्कसला गेलो होतो. तेव्हा असे गाणी वगैरे असल्याचे मला आठवत नाही म्हणून वाटले, सर्कसवाल्यांनी मध्येच ऑर्केस्ट्रा ही सुरू केला की काय? :( लहानपणी तर आम्ही वडिलांसोबत जात असू.

बापलेक

लेखक किलबिल यांनी रविवार, 29/11/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
"अगं अनघा, मी आलो ग. आणि ही देवाची फुलं ठेवलियेत टेबलावर." अप्पानी फुलं ठेवली आणि ते बाल्कनीत येऊन आरामखुर्चीवर बसले. ही त्यांची नेहमीची आवडती जागा होती. रोज सकाळी फिरुन आल्यावर इथे बसुन ते गरम गरम चहा पित असत.सोबतीला रेडिओ असायचाच. आजही अनघाने आणुन ठेवलेला कप हातात घेत त्यानी विचारले," प्रकाश कुठे दिसत नाही. अजुन झोपला आहे का?" "नाही, पहाटेच्या गाडीने मुंबईला गेले ते..काहितरी काम होतं " - अनघा "हो हो... तसं काल म्हणाला होता तो. लक्षातच नाही माझ्या" - अप्पा काहीच न बोलता अनघा आत निघुन गेली. महिन्याभरापुर्वीच तर लग्न होऊन आली ती या घरात. अजुन रुळली नव्हती.

स्रीसंत, सॉरी श्रीसंत तात्याबा महाराजांची नंदनला पत्रे..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 21/11/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा छोटेखानी लेख तुझे आहे तुजपाशी मधल्या काकाजी देवासकरांना सादर समर्पित! :) पत्र क्रमांक - १ बेटा नंदन, अनेक आशीर्वाद!
तात्या, मला भारतीय स्त्री-सौंदर्याबाबत काही मौलिक गोष्टी सांगा!
सांगतो हां! नंद्या, बाबारे -या जगात भारतीय स्त्री-सौंदर्य हेच खरे.

ताजे होउन जा (फुल बाग)

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 20/11/2009 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
श्रध्दाजीं सारखी सुंदर रचना मला नाही करता येत पण जे सुंदर आहे ते नजरेतुन सहसा सुटत नाही. मग काय कॅमेरा सरसवायचा आणि सुरु.

पाऊलखुणा..

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 20/11/2009 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणेच मावळतीकडे तोंड करून तो समुद्रकिना-यावरुन चालत होता. त्याच्या मनात कसला तरी कल्लोळ चालू असतानाच त्याची नजर खाली वाळूकडे गेली. त्या सोनेरी वाळूत त्याच्याच पावलांच्या बाजूने काही नाजूक पाऊलं उमटली होती...त्याच्यासारखीच पुढे जात असलेली. त्या पावलांचा मागोवा घेत तो एका खडकाजवळ पोहचला. ती तिथेच बसली होती. गालावर एक हात ठेवून बसलेली आणि तिच्या केसांची एक चुकार बट हळूच तिच्या गालांना स्पर्श करत होती. त्या खडकावर बसून जसं काही ती त्या सूर्याशी हितगूज करत होती...तिच्याकडे निरखून पाहताना त्याला जाणवले की तिचे डोळे खूप सुंदर आहेत.

डोंबिवली... ते...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 20/11/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतल्या एका कंपनीत नवीनच कामाला लागलेले ते दोघे... एक डोंबिवलीत राहाणारा, तर दुसरा साऊथ इंडियातल्या कुठल्यातरी खेड्यातून आलेला... एकत्र काम करताना त्यांची मैत्रीही घट्ट होत असते. काम संपल्यावर गप्पा, नरीमन पॉईंट, मरीन ड्राईव्हवर फेर्फटका, असं सुरू असतं. खूप चांगली, निर्व्याज दोस्ती! कधीमधी हा डोंबिवलीकर आपल्या साऊथ ईंडियन मित्राला घरी येण्याचं आमंत्रण द्यायचा, आणि हाही ते आनंदानं स्वेकारायचा. कितीतरी वेळा असंच व्हायचं. साऊथ इंडियन मित्र कधीच `नाही' म्हणायचा नाही. ...