Skip to main content

विरंगुळा

दोन लेकांमधील अंतर

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 10/06/2011 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील शहरी मध्यमवर्गीय सध्या आम्ही दोन, आमचे एक ह्या मोडवर आहेत. परंतु, कुटुंब नियोजनाच्या सुरुवातीच्या काळात "हम दो हमारे दो" किंवा "पहला जल्दी नही, दुसरा अभी नही, तीसरा कभी नही" अशा जाहिराती प्रसिद्ध होत. दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवावे ह्याची चर्चा करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला. आदिमानवदेखिल आपल्या अपत्यांत ३-४ वर्षांचे अंतर ठेवी, हे कळून आश्चर्य वाटले.

थोडा टीपी

लेखक मीमाको यांनी मंगळवार, 07/06/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.

फावल्या वेळेत काढलेली काही रेखाचित्रे

'लोक'मत

लेखक निखिल देशपांडे यांनी मंगळवार, 07/06/2011 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सुरु झालेल्या पेपर वॉरची गंमत आमच्या घरा पर्यंतही पोहचली. शनिवार रविवार औरंगाबादला पोहचल्यावर जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे लोकमतची घरातून हकालपट्टी झालेली होती. लोकमतच्या साथीला किती तरी पेपर आले आणि गेले, तरी पण आमच्या घरातून निदान गेली १५ वर्ष तरी लोकमत काही हलत नव्हता. दिव्य मराठीने हे काम करुन दाखवले. दिव्य मराठीच्या लॉन्चची तशीही जोरदार तयारी करण्यात आली होती. वातावरण निर्मितीचे प्रयत्न जोरदार होते. सुरवातीला आलेला सर्व्हे, त्यानंतर वाटलेली औरंगाबादची माहिती सांगणारी डायरी, २०० रुपयांत वार्षिक नोंदणी, असे एक ना अनेक मार्केटिंग गिमिक्स वापरण्यात आले.

वसंतकाव्यमाला कट्टा वार्तांकन

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 31/05/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आधी ठरल्याप्रमाणे रविवारी २९ मे २०११ रोजी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. 'मी मराठी' चे राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो. नेहमी जालावर शब्दरुपाने भेटणार्‍या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, कशा बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला. सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर आम्ही स्थानापन्न झालो. जुजबी गप्पा झाल्या.