Skip to main content

विरंगुळा

प्रेमअगन..!

लेखक पाटिल यांनी रविवार, 12/12/2021 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमअगन. इसवी सन १९९८. फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना. राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन. स्मिता जयकर- सूरजची आई. अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे. बीना बॅनर्जी- सपनाची आई. समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ). पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे..! विशालभैय्या आणि सपना रोज वेगवेगळ्या स्पोर्ट्सकारमधून कॉलेजला जातात. कारण अनुपमपापा अब्जाधीश आहेत. कॉलेजात एअरोबिक्सची ट्रेनर किरकोळ रजेवर असल्याने सपनावर ट्रेनिंगची जबाबदारी पडतेय..

आप मुझे अच्छे लगने लगे-२

लेखक पाटिल यांनी रविवार, 12/12/2021 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१: https://www.misalpav.com/node/49462 (पुढे चालू)... 'भाभी,असं कसं विसरून जाऊ सपनाला? माझा दिल दुखतो. मला आत्ताच सपनाला जाऊन भेटलं पाहिजे' रोहित-निशिगंधाभाभीचा होस्टेलच्या गेटवर संवाद चाललाय. ह्यावर भाभीचं म्हणणं असं पडतं की, 'तू सुरक्षित रहावास ह्या भूमिकेतूनच सपनाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे..! ह्यामध्ये माझा काही विशेष रोल नाही. मी फक्त हा निरोप सांगण्याचं कर्तव्य करत आहे..! याउप्परही तुला तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर तू स्वतंत्र आहेस..!

विपश्यना आणि रॅन्डम मी

लेखक पाटिल यांनी रविवार, 21/11/2021 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
(हे वाचणाऱ्यास विपश्यनेच्या दहा दिवसांच्या कोर्ससंबंधी अनुभवाने किंवा ऐकून वाचून माहिती असेल, असं गृहीत धरून लिहितोय.) १. तर फारा वर्षांनी एकदाचा दहा‌ दिवसांच्या सुट्टीचा जुगाड करून, पद्धतशीर बॅग वगैरे घेऊन, ट्रेनमधून उतरलो. रिक्षातून विपश्यना सेंटरच्या दिशेने जाताना 'कदम बंधू बिअर शॉपी' असा एक ओझरता बोर्ड दिसला. म्हटलं, कोर्स संपल्यानंतर आपल्यासारख्यांसाठी ह्या कदम बंधूंनी जवळच 'सोय' करून ठेवली आहे, हे एक बरंय. रिक्षातून उतरलो तर सेंटरच्या गेटवरच्या छोट्याशा हॉटेल कम् टपरीमध्ये दोन समवयस्क तरूण सिगरेट ओढत उभे.

लोगो...

लेखक चिनार यांनी बुधवार, 17/11/2021 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
लोगो.. 'अ' कंपनीला 'ब' कंपनीने टेकओव्हर केलं. 'अ' कंपनी तशी जुनी पण गावठी. 'ब' कंपनी एकदम आंतेर्रराष्ट्रीय! काही तांत्रिक कारणाने 'अ' कंपनीच नाव बदलता येणार नव्हतं. त्यामुळे ती ब कंपनीची ग्रुप कंपनी म्हणून ओळखल्या जाणार होती. कागदी टेकओव्हर पूर्ण झाल्यावर हळूहळू प्रत्यक्षात कब्जा करणं सुरू झालं.रोजच्या रोज पॉलिसी,प्रोसेस, कल्चर, इथिक्स, कॉम्पलायन्स वगैरे शब्दांचा भडिमार सुरू झाला. मग कंपनीचा लोगो या विषयावर गाडी आली. आता अ कंपनीच नाव बदललं नसल्यामुळे आणि लोगो नावावरूनच बनलेला असल्यामुळे त्यात फार काही बदल करता येणार नव्हते. शिवाय त्या लोगोचा ब्रँडही मार्केटमध्ये ओळखीचा होता.

मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 07/11/2021 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१ आज दिनांक 07/11/2021, रविवार, नाशिक मध्ये मिपाकरांची छोटी भेट (मीनी कट्टा) आयोजित केला गेला. त्याचा हा वृतांत. आपणास माहित असेलच की मिपाकर नाशिककरांनी गेल्याच महिन्यात मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ साजरा केला होता. आजचा दिनांक 07/11/2021, रविवार, हा कट्टा अचानक दोन दिवस आधीच ठरला. सकाळी ठरल्या वेळेत योगेश पुराणिक (yogi900), व सचिन बोरसे (पाषाणभेद) मुंबई नाक्यावर हजर झाले. थोड्याच वेळात जानु - सर्वेशसरांचा फोन आला व तेथे पोहोचले. त्याच दरम्यान डॉ. दातरंगे सरांचा फोन आला. ते पण वेळेत पोहोचले. नेहमीप्रमाणे इतर दोन जणांनी येण्याचे कबूल करूनही ऐनवेळी टप्पा दिला.

दिवाळी विशेष लेख- बोगी-वोगी रेस्टॉरंट

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 04/11/2021 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईला गेलो असताना तिथे एका नव्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पदार्थ चाखण्याचा आनंद घेता आला. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील त्याच माझ्या वेगळ्या अनुभवाविषयी... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 18 क्रमांकाच्या फलाटाच्या बाहेरच्या बाजूला Bogie-Wogie हे अनोखे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू झालेले हे मध्य रेल्वेवरील पहिलेच चाकांवरील रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट चालवण्याचे कंत्राट Bogie-Wogie या रेस्टॉरंट चालकाला मिळाले आहे.

आप मुझे अच्छे लगने लगे.

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 22/10/2021 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आप मुझे अच्छे लगने लगे. इसवी सन २००२. हृतिक= रोहित, अमिषा= सपना, किरण कुमार= ढोलकिया (सिनियर), मुकेश तिवारी= रमन ढोलकिया (ज्युनिअर), निशिगंधा वाड= सपनाची भाभी, आलोकनाथ= रोहितचा बाप. सपनाचा बाप ढोलकिया (सिनियर) हा शहरातला मोठा डॉन.

कंटाळा

लेखक पाटिल यांनी रविवार, 17/10/2021 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा." यावर आम्ही बोललो की, "रावसाहेब, तुम्हाला कंटाळा आलाय ही उत्तमच गोष्ट झाली. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला सतत वागवत राहणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मनुष्याला अधूनमधून कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. उदाहरणार्थ कामाचा, राहत्या जागेचा, शहराचा, गोंगाटाचा, माणसांचा वगैरे कंटाळा येणं हे नैसर्गिकच आहे.

कधीही समाधान न होणाऱ्या भेटी!

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 14/10/2021 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
8 ऑक्टोबर 1998. हवाईदल दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या लोहगाव हवाईदल स्थानकाला (Air Force Station) मी पहिली भेट दिली तो दिवस. त्याआधी दोन-तीन वर्ष असं होत होतं की, लोहगाव विमानतळावर सामान्य नागरिकांना विमानं पाहण्यासाठी खुली असल्याची बातमी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये यायची. त्यामुळे लोहगाव विमानतळावर विमाने पाहण्याची इच्छा असूनही संधी मिळत नव्हती. 1997 मध्येही असेच झाल्यावर मात्र निश्चय केला की, पुढच्या वर्षी हवाईदल दिनाला या विमानतळावर जाऊन प्रत्यक्षात विमाने पाहायचीच. हवाईदलात असलेले आमचे एक नातेवाईक त्यावेळी बदली होऊन लोहगाव हवाईदल स्थानकावर रुजू झाले होते. हवाईदलात ते अधिकारी होते.

बखरीतून निसटलेलं पान..

लेखक पाटिल यांनी रविवार, 03/10/2021 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे..