लेखकचष्मेबद्दूरयांनी मंगळवार, 18/10/2022 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या.
लेखकचष्मेबद्दूरयांनी मंगळवार, 18/10/2022 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या.
लेखककर्नलतपस्वीयांनी सोमवार, 26/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
ढवळ्या शेजारी पवळा बांधला
वाण नाही पण गुण लागलापेरणा
एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या.
मित्र रोगी तपासत असताना मी रोडवर येणारे जाणारे बघत आपले मनोरंजन करत होतो. कुणी ओळखीचा आसेल तर हाय,हॅलो. कधी आला,कधी जाणार टाईप विचारपूस.
लेखकvaibhav deshmukhयांनी शनिवार, 24/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
हाडाचा सापळा (गूढकथा)
काही घटना एकदम अनपेक्षितपणे घडतात.
पण खरोखर त्या अनपेक्षित असतात का? की त्या विधिलिखित असतात. आगोदरच त्या निश्चित झालेल्या असतात. तुम्ही केवळ त्या घटनांचे एक वाहक असता. किंवा मग नाममात्र साक्षीदार असता. कदाचित तसेही असू शकेल.
मी हे असे का म्हणतोय, त्यालाही कारण आहे. एक तार्किक स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण समजून घेण्याईतपत मी समंजस नसेलही, पण त्या स्पष्टीकरणाच्या जाणिवा मात्र मला तीव्रपणे जाणवायच्या. त्या माझ्या अगदी अंगावर यायच्या. हे जे काही सगळे घडले, ते माझ्याच सोबत का घडले, याचे भले माझ्याजवळ उत्तर नाही. पण ते माझ्यासोबत घडले होते.
लेखकvaibhav deshmukhयांनी रविवार, 18/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
दिंडी (गूढकथा)
दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.
पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही.
लेखकपाषाणभेदयांनी शनिवार, 17/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर,
पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला.
एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
लेखकपाषाणभेदयांनी बुधवार, 14/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर.
रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली.
गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका.
लेखकvaibhav deshmukhयांनी सोमवार, 12/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस!
(गूढकथा)
सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता.
जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.
लेखककर्नलतपस्वीयांनी शनिवार, 10/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
लेख केवळ मनोरंजन व स्वानंद हा उद्देश समोर ठेवून लिहीला आहे. खुप आधी लिहीला होता,अभद्र विषय असे लोकांचे म्हणणे. सणासुदीला कशाला अभद्र लिहायचे व आनंदावर विरजण टाकायचे म्हणून आता डकवत आहे. माझ्यापुरते म्हणाल तर,
काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ ll
-संत नामदेव स्मायलींची बाराखडी शिकवल्या बद्दल @टर्मिनेटर भौं चे विषेश आभार.
😀😁
______________________________
आजकाल मिपावर कवितेच्या दुकानाकडे रसिक कमीच फिरकतात दोन आकडी वाचक तीन आकडी जरी झाले तरी धन्य वाटते.मधूनच एखादी"तुला काय ठाऊक सजणी" दामिनी सारखी चमकून जाते.