Skip to main content

विरंगुळा

माया (भयगुढकथा)

लेखक तुडतुडी यांनी शनिवार, 01/08/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येची रात्र होती . रात्रीचे ८ वाजले होते . 'काल्या' बाबा राजीव सोबत आपलं सगळं समान घेवून आला .गुढघ्यापर्यंत काळी कफनी , खाली काळी लुंगी , कमरेला कमरपट्ट्या सारखं लाल कापड बांधलेलं . खांद्याला काळ्याच कापडाची झोळी. कपाळावर काळा टिळा. डोक्याला काळं फडकं गुंडाळलेल. ह्या सगळ्याला म्याचींग असा शरीराचा रंगहि काळाच . पण डोळे मात्र कमरपट्ट्याला म्याचींग असे लाल आणि बटबटीत .त्याच्या ह्याच अवतारामुळे ज्यांना तो माहित होता ते त्याला काल्या बाबा म्हणायचे . काल्या एक तांत्रिक होता . काळ्या शक्तींची उपासना करायचा तो . काही काळ्या शक्ती आणि सिद्धी वश होत्या त्याला .

<विडंबनः मिसळपाव वाचा व्यवस्थापन नीती शिका>

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 31/07/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका मिसळपाव हे संस्थळ, तिथले लेख, कविता, काथ्याकुट आपण सर्वानी वाचलेच असणारच, पण ते फक्त वाचन आणि मनोरंजन म्हणून न बघता एक बोधप्रद संस्थळ म्हणून बघितले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप. मिसळपाव वर ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. दूरदृष्टी / नियोजन :- मिसळपावचे काम नियोजनबद्ध होते हे सर्व मिपाकर जाणतातच.

भयकथा - शिकारी साखळी

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 31/07/2015 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
(कथा वाचण्यापूर्वी एक निवेदन - ही कथा मी पूर्वी लिहिलेल्या शिकारी रात्र या कथेची सुधारीत आवृत्ती आहे. कथा कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा फक्त प्रतिक्रिया पूर्वग्रहदूषित नसाव्या ही माफक अपेक्षा!) *** मध्यरात्र उलटून गेलेली असते. वातावरणात खूप थंडी असते. एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते. अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो. बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो.

भामी

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 31/07/2015 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
भामाक्का बाजाराच्या टेम्पोमधून खाली उतरली तेव्हा उन्हं उतरायला होती. घराजवळ पोहोचल्यावर ओट्यावर बसलेल्या धाकट्या लेकी उराशी बिलगल्या, तसं लेकींना कवटाळू धरताना, भामीचं लेकुरवाळं आभाळ आणखीनच भरून आलं. "गोमू कुटं दिसंनांग पोरींनो ? ". " मगाचंधरनं ती शोध्तीय्या पाडीला अन तिच्या पाडसाला". …… "पाडी लई द्वाड, हायवेच्याकडच्या फाट्याकड बघायला जात्येगं पोरींनो ". असं बोलून भामी तिथून निघालीसुद्धा.

( रेशनकार्ड )......शतशब्द-सम्मुच्चय

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 29/07/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
३ वर्षे खच्चून पर्फोर्मंस दिल्यावर शेखरअण्णाने तीला सोलो पाठवायचं ठरवलं. घरवालीशी बोलून झालं, नगरसेवक काचीचं नाव निघालं. घरवालीला केवढा आनंद झाला, काचीबरोबरची रात्रीची "बैठक" छान झाली. "१८ वर्षांपेक्षा मोठी दिसायला लागली आता तु" असं काचीकडून उत्तर मिळाल्यावर खुश झाली. टोपाझची रात्र जवळ येवू लागली, खरेदी वैगेरे झाली. शेखरअण्णाने पारदर्शक डीपकट घालायला लावलं तीला. "कष्टमरको खुश रखेगी…. इदर जैसे डान्स किया, उससे अच्छा उदर करेगी" असं ऐकल्यावर त्याचं टेन्शन कमी झालं. आवश्यक सोपस्कार पार पडले. टोपाझमधे धंदेके टाइमवाला डान्सफ्लोर मिळाला.

उन्हाळी उद्योग ३

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 28/07/2015 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
छोटा मृदुल (microsoft) जसा दर एक दोन वर्षांत काही तरी नव - नवीन आकर्षणे देत रहातो, तसे काही तरी आमच्या उन्हाळी उद्योगांत करत राहावे लागणार हे आमच्या - म्हणजे मी आणि "सौ", किंवा आमच्या बालचमूच्या दृष्टीने "आबा" आणि "आजी" - कधीच लक्षात आले होते, पण ते प्रत्यक्षात आणण्याकरता हा उन्हाळा लागला.

[शतशब्दकथा स्पर्धा] ग्रीन कार्ड

लेखक तुडतुडी यांनी मंगळवार, 28/07/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
३ वर्षे खचून performanse दिल्यावर कंपनीने त्याला ऑनसाईट पाठवायचं ठरवलं . अप्लिकेशन करून झालं . लॉटरी मध्ये नाव निघालं . त्याला केवढा आनंद झाला . इंटरव्ह्यू छान झाला . 'पारपत्रावर वर विसा चिकटवून कंपनीत पाठवला जाईल' असं एम्बसी कडून उत्तर मिळाल्यावर तो खुश झाला. उडण्याचा दिवस जवळ येवू लागला तसा त्याचा उत्साह वाढत होता. खरेदी वगेरे करून झाली . आई बाबांनी काय काय घ्यायला लावलं त्याला . अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं . असं म्हणून ओझं कमी केलं . आवश्यक ते सोपस्कार पार पडले . बोर्डिंग पास मिळाला . विमानात बसल्या बसल्या तो विचार करू लागला . आत्ता ३ वर्षे validity आहे विसा ची .

ती (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 28/07/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
"स्त्रीला कधीही नाही जमणार, भालाफेकीत किंवा तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला...... तुझं शरीराचं, तुला अडचणीच होईल त्यावेळी !" त्याचा मृतदेह पुरला, तरी डोक्यातले त्याचे शब्द तिला राहूनराहून छळत होते. 'त्याने शिकार करायची, अन तिने धारदार सुऱ्याने शिकारीची चामडी सोलून, छोटूकले तुकडे करून, शेकोटीवर भाजून, चिल्ल्यापिल्ल्यासकट सगळ्यांना खाऊ घालायचे', असा सरळसोट हिशोब राहिला नव्हता आता……त्याला गुहेजवळ पुराल्यानंतर.

तोच जुना शालू ....(शतशब्दकथा )

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 27/07/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या मनाने, मला आग्रह करकरून, तोच मुलायम शालू नेसायला सांगितला होता. मोतीया रंगाचा आणि सुंदर लालचुटूक फाटलेल्या किनारीचा, तोच जुना शालू. तशी मी पहिल्यापासून हौशी, प्रत्येक गोष्ट कशी, सुंदर, नीटनेटकी आणि पद्धतशीर व्हायला पाहिजे, हा माझा कायमचा आग्रह. आजही माझ्या वयाला साजेसाच रंग होता आणि माहेरचा खानदानी बाज होता, काठ स्वतःच्या हाताने फाडला होता त्याचा मी. भावाची जखम बांधायला, मागेपुढे का पाहावे ?? म्हणूनच……फाटका, तरी अत्यंत प्रिय मला आणि माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेला शालू …… ....... ..... ....

"ती - ४"

लेखक खटपट्या यांनी रविवार, 26/07/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
"ती - १" "ती - २" "ती - ३" मलाही प्रचंड झोप येत होती पण खड्यांमुळे गाडी उडत असल्यामुळे मला झोपता येत नव्हते. जेव्हा जेव्हा मी डुलकीमधून बाहेर येत असे तेव्हा तेव्हा मी नेहाकडे पहात असे. नेहा दिवसभराच्या धावपळीने थकून गाढ झोपली होती. झोपेत सुंदर माणूस अजून सुंदर दिसते. लहान बाळे सुद्धा झोपेत खूप गोड आणि निष्पाप दिसतात. नेहाचा चेहरा अगदी निरागस होता. होतीच ती निरागस. तिला पाहताना मला कोणी पहात नाहीना याची मी काळजी घेत होतो.