Skip to main content

विरंगुळा

अगा ते ब्रम्हकमळ उमलले दारी...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 03/09/2015 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या टेरेसवरच्या छोट्याश्या बागेत अनेक वर्षे एक ब्रह्मकमळाचे (Epiphyllum oxypetallum) रोपटे एक कोपरा पकडून झोपाळू अनामिक सदस्यासारखे चूपचाप पडून आहे. हिमालयात आणि श्रीलंकेत मूळ घर असलेली ही वनस्पती भारताच्या अनेक घरांच्या बागेत रोपट्यांच्या स्वरूपात वाढवली जाते. तिचा भारतापेक्षा थोडा वेगळा प्रकार (Phyllocactus purpusii) मेक्सिको, ब्राझील, इ अमेरिकन खंडातील देशांतही सापडतो. बागेतल्या इतर नखरेल वृक्षवल्लींना सांभाळताना आणि त्यांच्या सुंदर रूपरंगाचे कौतुक करताना या कार्टूनमध्ये रोडरोलर अंगावर जाऊन सपाट झाल्याप्रमाणे दिसणार्‍या बिचार्‍या वनस्पतीकडे बर्‍याचदा लक्षही जात नाही.

ती सकाळ आणि ती!

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 01/09/2015 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाळातली चांदण्याची आरास पुसट होत चालली होती. रात्रीचा खेळ संपवून माघारी चाललेल्या चांदण्यांमधल्या काही उगाच मागे रेंगाळल्या होत्या. वारा कधी झाडांवरच्या पानांबरोबर तर कधी खाली निवांत पहुडलेल्या पाला-पाचोळ्यांबरोबर खेळत होता. धुकही आता आजूबाजूच्या परिसराला मिठीत घ्यायला लागल होत. बाहेर भिरभिरणारा वारा आता शिरीषच्या बेडरुमच्या अर्धवट उघड्या खिडकीतून आत शिरला व शिरीषच्या तोंडावर झुलणा-या चादरीच्या टोकाला धरून हलवू लागला.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

क्रीडायुद्धस्य कथा - दहा सेकंदांचं युद्ध

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 29/08/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला माहित्ये .... सगळे नऊच्या नऊ ग्रह जर एका लायनित आले ना..... त्या दिवशी पृथ्वी खतम होऊन जाणार!" आमचे ८ वर्षांचे ज्येष्ठ मित्रवर्य आम्हा ६ वर्षाच्या पोरांना सांगायचे. ते ऐकून जी टरकली होती म्हणता....त्यानंतरचे बरेच दिवस आकाशाकडे बघून सगळ्या ग्रह तार्यांची पोझिशन तपासण्यात गेले होते. जाम टेन्शन आलं होतं तेव्हा. तेव्हाच्या प्रदुषणविरहित आकाशात नेहमी दिसणारे गुरू, शनी, मंगळ वगैरे एकमेकांपासून हातभर अंतर ठेऊन आहेत बघितलं की हायसं वाटायचं. पल्याड शुक्र, बुध आणि न दिसणारे राहू केतू काही का गोंधळ घालेनात. जोपर्यंत ही नऊ लोकं एकत्र येत नाहीत तो पर्यंत प्रॉब्लेम इल्ले.

भिंगार्‍या

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 27/08/2015 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारायला आलं होतं. लंगडा भिंगार्‍या वैरण घेउन आला. आण्णा नांगरटीला गेला होता . मंजु भाकर्‍या थापत होती . लंगडा भिंगार्‍यानं वैरण कापून गुरांना टाकली . पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती . वैरण टाकून भिंगार्‍या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला . दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला. मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं. त्यानं ते पडवीत बसून खाल्लं. भिंगार्‍या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.

तुलनेचा तराजू

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/08/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सततची आणि अंधपणे केलेली स्वतःची इतरांशी आणि इतरांच्या जीवनाशी केलेली तुलना द्वेषाचे आणि नाशाचे कारण बनते. आपण इतर दोन व्यक्तींमध्ये केलेली तुलना सुद्धा हेवा आणि लोभाला जन्म देते आणि त्या दोघांचीही अधोगती करवते. तुलनेमुळे स्वतःचे दोष आणि इतरांचे गुण आपल्याला दिसत नाहीत. तुलना केल्याने आपण स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र अस्तित्व नकळत नाकारत असतो. तुलना ही नेहेमी हक्काची केली जाते पण कर्तव्याची आणि कर्तृत्वाची केली जात नाही. इतरांपेक्षा मी कसा चांगला होईन, इतरांपेक्षा मी स्वतःच्या स्वभावात जास्त बदल कसा घडवेल अशी तुलना दुर्दैवाने होत नाही.

लोणीभक्ती आणि पराठे

लेखक डॉन व्हिटो कॉर्लिऑन यांनी मंगळवार, 25/08/2015 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोतः मातृभक्ती आणि मराठे या देहाची लोणीभक्ती, लोणीप्रेम वादातीत आहे. लोणी देवो चवः, लोणी देवो सवः, पराठे देवो भवः असे म्हणतानाच पराठ्याबरोबरच्या लोण्याच्या चवीचे महत्त्व सुभाषितकाराने सांगीतलेलं आहे. लोण्याचा सुवर्णकाळ, शतके ज्यांनी लोकांच्या पोटावर राज्य केलं असे 'अमुल' त्यांची ती अमुलकन्या सुरभी, आपल्या पराठ्यावर चापुन लोणी लावत असे. लोणीप्रेमावतंस पराठापती *** पराठावाले. ह्यांच्या बालपणापासुनचं प्रत्येक पराठ्यांवर त्यांच्या पाकसम्राज्ञी आईसाहेबांचा प्रभाव आढळतो.

नाकतोडा......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/08/2015 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
नाकतोडा...... मी लहान होतो, म्हणजे असेन सात आठ वर्षांचा. त्यावेळेस माझ्या आजोबांकडून पंचतंत्रातील गोष्टी ऐकताना मी अगदी त्यात रंगून जात असे. माझे आजोबा मला नुसतेच गोष्टी सांगून थांबत नसत तर त्या गोष्टींचे तात्पर्य अगदी तपशीलात जाऊन सांगत असत. अर्थात मला त्यात काही विशेष रस नसे. यातील एक गोष्ट मला चांगलीच लक्षात राहिली होती ती म्हणजे ‘नाकतोडा व मुंगी’ ही गोष्ट. लक्षात राहण्याचे कारण म्हणजे आजोबा या गोष्टीचे तात्पर्य सांगताना त्यांच्याच आयुष्यातील घटना सांगत.

काही न जुळलेले गुण!!!

लेखक शीतल जोशी यांनी सोमवार, 24/08/2015 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
काही न जुळलेले गुण!!! आमचे काही न जुळलेले गुण, काही म्हणजे केवळ म्हणायला, खरे तर सगळेच गुण-अवगुण न जुळणारेच. गेली काही वर्षे एकत्र घालवल्यावर, आता जर कुठे सगुण-निर्गुणच्या जवळ आहोत आम्ही. म्हणजे फार काही विशेष नाही, न जुळलेल्या गुणांना आम्ही उभयतांनी संमती दिली आहे आणि सोयीस्कररित्या 'काना-डोळा' केला आहे. ऐकून न ऐकल्यासारखे आणि बघून न पाहिल्यासारखे. असेच काही दाखले.. प्रवेश एक : वर्ष पहिले ती (मनात) : आज मस्त पुस्तक वाचणार, ही कादंबरी आज संपवायचीच आहे, तसेही उद्या सुट्टी आहे, आज रात्रीत वाचून होईल. तो (मनात) : आज जर लवकर झोपावे, पहाटे लवकर उठून, कॅमेरा घेऊन बाहेर पडता येईल.

विश्वासघात ! : ०२

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 23/08/2015 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वासघात ! : ०१ फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्‍या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते. फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य!" "एक महत्त्वाचे काम बाकी आहे." तिला कवेत उचलून त्याने गिरकी घेतली, भिंतीला टेकून उभे करून तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक सुखद शिरशिरी तिच्या अंगभर लहरली... डोळे अर्धोन्मीलित... ओठांचा चंबू.