Skip to main content

वर्तुळ - शशक

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 08/09/2015 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला.." पर्स मधील मोबाईल खणाणला. तिच्या गोबऱ्या गालावर हसु फुटले. बंदुकीची नळी सरळ करत तिनं माझ्यावर रोखली. धडाम्... मी जागीच कोसळलो. थरथरत्या हातातली बंदुक गळून पडली. घाईघाईने ती निघाली. मोबाईलबरोबर बंदुकही पर्समध्ये टाकायला विसरली नाही. पिटुकल्या स्कुटीवर बसुन वाड्याकडे निघाली. वाड्याजवळ येताच धुंद हसली. करकरत दरवाजा उघडला. धावतच वरच्या मजल्यावर आली. एकटाच होतो. मी निलाजरेपणानं बेधुंद प्रणयाची मागणी केली. ती त्याच्यासाठीच आली होती. शृंगारल्या डोळ्यांनी ती लाजुन चुर झाली. तेवढ्यात, "पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला.." पर्स मधील मोबाईल खणाणला. तिच्या गोबऱ्या गालावर हसु फुटले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2461
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

थोडा गोंधळ उडला आहे. कृपया सविस्तर खुलासा मिळू शकेल का?

धडामकरुन गोळी कोणाला मारली? कोसळला कोण? आणि मग वरच्या मजल्यावर कोण होता? नळीवाली बंदूक पर्समधे कशी राहीली? पर्स कीती मोठी होती?

त्या शशक च्या नादात कथा नीट उतारता आली नाही. स्व:त भोवती गोल गोल फिरणारी कथा टाकायचा प्रयत्न होता. 'वर्तुळ' शीर्षक पाहीजे होते. दिलगीर आहोत.

In reply to by अन्या दातार

धन्यवाद, तेवढं ते 'सकाळ - त्यांच्या नजरेतुन' या धाग्यामध्ये पण वाढ करायची आहे. काय ते धागा वाचल्यास लक्षात येईल. आभार.