Skip to main content

विचार

०४ नाशिकचे घड्याळजी - नाशिकचा उद्योग

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 28/04/2017 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
पेशव्यांस घड्याळाचे भलते वेड. १७३४ साली बाजीराव पेशव्यांनी खरीदलेले घड्याळ १७३५ सालात एका कॅप्टन वॉकर नामक इंग्रजाने दुरुस्त केले असा उल्लेख असलेले कॅप्टनने बाजीरावास लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. म्हणजे बाजीराव घड्याळ वापरत होते. गंगापूरला राहणाऱ्या माधवरावच्या आई गोपिकाबाईस ठराविक घडीला जप आणि ध्यान करता यावे म्हणून खास तीन रुपये किमतीचे वाळूचे घड्याळ - वालुकायंत्र - दिले होते. माधवरावाचे धाकटे बंधू नारायणरावकडे चक्क हातघड्याळ होते, ते तो मिरवीत असे. हातघड्याळ इतकी दुर्मिळ चीज होती की नारायणराव बडेजावीने वापरीत.

अक्षय्य तृतीया

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 28/04/2017 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षय्य तृतीया म्हणलं कि मुहूर्ताची सोनेखरेदी, आंब्याच्या सीझन मुळे दुपारच्या जेवणाला आमरस पुरी अश्या गोष्टी आठवतात. मला मात्र ह्या दिवशी कायम 'घोसाळ्याचा (घोसावळ्याचा) वेल आणि बालपणीचे दिवस' आठवतात. ह्या दिवशी कुठलंही झाड लावलं तर ते उत्तम येतं असं बाबा म्हणायचे. चैत्र-वैशाख मध्ये तापलेली जमीन आणि पुढे दीड महिन्याने सुरु होणारा पावसाळा हे त्यामागील शास्त्रीय कारण असेल कदाचित. तेव्हा मात्र शुभ मुहूर्तावर झाड लावलं कि छान येतं असंच वाटायचं. अक्षय्य तृतीयेच्या काही दिवस आधी बाबांबरोबर पुण्याच्या मंडईत जाऊन घोसाळ्याच्या बिया आणायच्या. वाटीत पाणी घेऊन २ दिवस त्यात ठेवायच्या.

बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

लेखक खेडूत यांनी बुधवार, 26/04/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
h . . (प्रासंगिक) सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत. एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.

नातं..!

लेखक हर्षु यांनी रविवार, 23/04/2017 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
नातं हे दोन व्यक्तींमध्ये असतं, मग ते कुठलेही असो. पण यातील मैञीच्या नात्यात आपण आपली सगळीच नाती जगु शकतो, बघु शकतो, आणि जेव्हा या सुंदर नात्यामध्येआपल्या नकळत का होइना पण, संध्याकाळच्या वेळी कमळ फुलावर बसलेला भ्रमर जसा सकाळपर्यंत त्यात कैद होतो, अगदी तसाच कटुपणा कैद होवु पाहतो तेहा मन नावाचा अवयव अगदीच हेलावुन जातो. नातं जोडण्यासाठी जश्या दोन व्यक्ती लागतात, तसेच ते टिकवण्यासाठी सुद्धा दोघांचे प्रयत्न सुद्धा गरजेचे असतात.

चकल्या….. ३४२५

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 23/04/2017 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा मजेदार आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता? … १) १२३४५६७८९…… मी माझ्या बायकोच्या दबावा मूळे या प्रयोगात सामिल झालो होतो. माझ्या कवटीला भोक पाडताना सुध्दा ती डॉक्टरांना अखंड सूचना देत होती. माझे डोके बधिर असल्यामुळे परत बधिर करायची गरज नाही असे तिनेच डॉक्टरांना सांगीतले होते, ऑपरेशन सक्सेसफुल, डॉक्टरांनी जाहिर केले, आणि हिच्या चेहर्यावर आन्ंदाचा महापुर उसळला, लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला. आणि आन्ंदाने म्हणाली “ बरं झाल!

श्रीसाईसच्चरित भाग २. अध्याय १ . शब्दार्थ आणि भावार्थ

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 20/04/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीसाईसच्चरित भाग २. अध्याय १ मंगलाचरण ओवी १३ ते ४२ भावार्थ आजच्या टू मिनिट नूडल्सच्या जगात बर्याच जणांना हे भलं मोठ्ठं मंगलाचरण म्हणजे पाल्हाळ वाटू शकतो. मी माझ्या वैद्यकीय विद्यार्थीदशेत असताना जेव्हा श्रीसाईसच्चरित वाचत असे तेव्हा मी हे मंगलाचरण पटकन 'वाचून टाकत' असे कारण मला मुख्यत्वे रस कथांमध्ये होता. आता मी विचार करते की हेमाडपंतांना इतक्या सगळ्या लोकांना वंदन करण्याची गरज का वाटली असेल? बरं त्यातही नावं न घेतल्यामुळे ही मंडळी, जसं की वेगवेगळे देव, ऋषी,संत हे रागावणार होते असंही नाही. मग एवढी मोठी यादी कशाला? उत्तर आहे हेमाडपंतांच्या मनात असलेली 'कृतज्ञता'.

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/04/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

ही आगळी कहाणी : एक आगळावेगळा कथासंग्रह

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 19/04/2017 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणात गुलाबजाम अन वाचनात लघुकथा आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे अवघड. नारळीकर, धारप, वपू, मिरासदार, मतकरी वगैरे कथाकारांच्या लिखाणाने कित्येक पिढ्यांची वाचनभूक भागवली आहे. मराठी वाचक नेहमीच उत्तमोत्तम कथांच्या शोधात असतो. आजच्या धकाधकीच्या अन तणावग्रस्त आयुष्यात काही खुसखुशीत वाचायला मिळालं तर ! हीच गरज निलेश मालवणकर यांचा 'ही आगळी कहाणी' हा नवीन कथासंग्रह पुर्ण करतो. सहज म्हणून मी पुस्तक हाती घेतलं आणि संपेपर्यंत हातातून सुटलं नाही. इतक्या सहजपणे आणि विनोदी शैलीत कथाविषय मानण्याचं कसब फार कमी लेखकांकडे असतं. पुस्तकाचं रुपडं चित्ताकर्षक आहे.

नाशिकचा उद्योग ०२ : उद्यमशीलतेची परंपरा

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 16/04/2017 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या नाशकात एक बोली आहे. विशेषतः इथले बहुदा सर्व प्रकारचे राजकीय पुढारी उद्योगांशी संबंधित कार्यक्रमामध्ये हा डायलॉग आपल्या भाषणात ठोकतात. बहुदा सगळीच स्थानिक वृत्तपत्रे या डायलॉगचा कुठे ना कुठे वापर आपल्या लिखाणात करत असतात. म्हणे "मंत्र भूमी कडून तंत्र भूमीकडेनाशिकची वाटचाल होते आहे". नाशिकच्या मंत्रभूमी म्हणून असणाऱ्या लौकिकाचा मला आदर आहे. पण या दोनही शब्दांच्या अर्थात दडलेल्या वास्तवाचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. मंत्र आणि तंत्र या शब्दांचे फारतर यमक जुळण्यापलीकडे नाशिकच्या संदर्भाततरी या दोनही बाबी भिन्न आहेत.

सत्यमेव न जयते, कल्याणमस्तु!

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 14/04/2017 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे - सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो. ============================================================== सत्यमेव जयते चं शब्दशः भाषांतर "सत्यच जिंकते" असे आहे. सत्यम् = सत्य, एव = च जयते = जिंकते. च वर जोर.