आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?
भडकमकर मास्तरांनी 'साठेचं काय करायच?' ह्या नाटकाच्या परिक्षणात मांडलेला 'राजीव नाईक' ह्यांचा हा विचार मनात रेंगाळत, खर तर वादळासारखा घोंघावत राहिला...
आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?खरच, का छळत, होरपळत असावा हा विचार एवढा?
मिसळपाव
