Skip to main content

विचार

आज गुरुपोर्णिमा....

लेखक डावखुरा यांनी रविवार, 25/07/2010 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा : गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नम: ॥ हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानक

मला आवडलेले पुस्तक : तोत्तोचान( खिडकीतली मुलगी)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 24/07/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
तोत्तोचानः तेत्सुको कुरोयानगी ( अनु: चेतना गोसावी सरदेसाई) प्रकाशकः इंडिया बुक हाऊस totto chan एक लहान मुलगी वय वर्षे कदाचित पाच. शाळेत अत्यंत अस्थीर . वर्गात येणार्‍या चिमण्याशीच बोलणे, वारंवार डेस्क उघडणे, वर्गाच्या खीडकीतून रस्त्यावरून जाणार्‍या बॅन्डवाल्यांशी बोलणे वगैरे वगैरे.... हे तिचे सततचे उद्योग. तिच्या या उद्योगाना कंटाळून शाळेतून मुलीचे नाव काढून टाकले.

आभार प्रदर्शन..

लेखक भारतीय यांनी शुक्रवार, 23/07/2010 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणि एकदाचे आम्ही येथे दाखल झालो आहोत..!! येथे ज्या दिवशी खाते बनवले, त्याच दिवशी मी जात पडताळणीसाठी सूद्धा अर्ज केला होता.. जातपडताळणी अर्ज केन्व्हाच मिळाला , पण इथले सदस्यनाम काही सक्रीय होत नव्हते..! मी उगीचच सरकारी कर्मचार्यान्ना कामाच्या दीरन्गाईबद्दल दूषण देत असतो.. बरे, ते असो.. इथे प्रवेश दिल्यबद्दल सम्पादक मन्डळीन्चे मनापासून आभार.. आणि खासकरून शिल्पाताइन्चे विशेष आभार.. तुम्ही चान्गले सहकार्य केले येथे येण्यासाठी..

म्हातारा बाप

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 21/07/2010 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादीवशी थोडा excited state मधे होतो.चहा व सिगरेट पियावी म्हणून बाहेर गेलो. दुकानाबाहेरच्या टेबलावर बसलो. "एक चाय दे रे!" मोबाईल वाजला. "हॅलो" "तुला कुठल हवय PSP 2000 की 3000? "3000 आण..2000 नको आणु" "ओके,घेतल्यावर फोन करतो" "हा पण 2000 नको घेउ,बाय" कॉल कट केला. चहा आली.सिगरेट पेटवली.आकाशाकडे तोंड करुन धुर सोडला.तेव्हा मागुन कोणीतरी येताना दीसल.पायात नवीन कोरी स्लीपर्,त्यावर तीन चार फोल्ड्स मारलेली पँट्,कमरेतला भाग गोल्,शर्ट साफ,गोल चेहरा,पिकलेली मिशी व काळे पांढरे केस.....................एकुनच personality बघुन हसायला आल.तो चेहरा मला बघुन जबरदस्तीने हसला तेव्हा ओळखल. "अरे मामा तुम्ही!!......

कॉलेज कट्टा भाग - अंतिम

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 16/07/2010 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
---भाग - १ --- ---भाग - २ --- ---भाग - ३ --- ---भाग - ४ --- ---भाग - ५ --- "ज्या पोरी पोरांवर जाळं टाकायला सुरुवात करतात, त्त्यांच्यावर नजर ठेवुन मोका मिळताच त्यांना खलास करायचं" - रुपेश सगळ्यांचे रक्ताळलेले सैतानी डोळे एकमेकाकडे बघत होते. आतल्या ज्वालामुखीला वाट मिळाली होती.

शिरगाव मध्ये सुरू असलेल्या संगणक शिक्षणावरील ब्लाग

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 15/07/2010 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आमच्या शाळेत चालणा-या संगणक शिक्षणावर स्वाती देसाई हीने एक माहीती पट तयार केला होता त्याचे परीक्षण एका ब्लाग आले आहे ते आपल्या माहीती साठी व वाचना साठी देत आहे Monday, 1१1ly 13, 20१० A DOCUMENTARY REVIEW ON ICT HARVEST ICT Harvest a film is made by Swati Desai a creative consultant. This film is made with financial support from HIVOS and Comet Media Foundation 2007.From 2002 to 2007, NIIT an IT Training and Developing Organization undertook a study investigation what children did when left themselves with a computer and a high speed internet connection.

बुद्धीबळ नियमांचे भाषांतर - बुद्धीबळप्रेमींना एक आवाहन - प्रकल्प पूर्ण झाला.

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 14/07/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बद्दु ह्यांच्या बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ह्या धाग्यावरुन एक कल्पना सुचली. मराठीत बुद्धीबळाचे नियम मला आंतरजालावर मिळाले नाहीत. एकट्याने भाषांतर करणे वेळखाऊ आहे. परंतु मिसळपावावरील बुद्धीबळप्रेमींनी त्यांचा थोडा थोडा वेळ देऊ केला तर हा भाषांतराचा उपक्रम आपण मिळून करु शकू.

मिसळपावाची धोरणे सांगण्याचा फायदा

लेखक धनंजय यांनी बुधवार, 14/07/2010 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
झालेली एकूण चर्चा बघता कोणतेही नवीन मुद्दे उपस्थित होत नाहीयेत तेच ते गुर्‍हाळ चालू आहे. बहुतेक सर्व मुद्द्यांचा विचार संपादक मंडळाने आधीच केलेला आहे. आता येणारे प्रतिसाद हे वेगळेच वळण घेत आहेत त्यामुळे इथे लेखात दिलेल्या 'आधिकारिक धोरणांच्या' कलम ९ अनुसार हा धागा आता केवळ वाचनमात्र करण्यात आला आहे. कळावे. -संपादक मंडळ हल्लीच मिसळपावाची आधिकारिक धोरणे प्रसिद्ध झाली आहेत. त्या बाबतीत दोन प्रकारचे मूलभूत प्रश्न काही प्रतिसादकांच्या मनात उद्भवले आहेत.

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका.