Skip to main content

विचार

उमलू द्या कळ्यांना : लहान मुलांचे शोषण, माहिती, खबरदारी व कायदा

लेखक अरुंधती यांनी रविवार, 10/04/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्‍या, त्यांना कुस्करणार्‍या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.

अति जेवल्या वर काय कराल?

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 08/04/2011 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
खादाडी कट्टा हा विषय चाललाच आहे तेव्हा.... 'गरम गरम पुरणपोळी, त्यावर साजूक तूप- मग काय विचारताय? चांगल्या ३-४ हाणल्या. एवढ्या प्रेमानं केल्या होत्या मग त्याला दाद द्यायला नको?' असे संवाद तुमच्या कानावर पडले असतीलच. नाही? बरं मग - 'अरे काल आम्ही सगळे मित्र मंडळी जमलो होतो. काय धम्माल आली माहितीये, तंदुरी चिकन, पनीर मक्खन्वाला, गरमागरम बटर रोटी! डाएट वगेरे पार विसरलो रे!' 'अगं काल मी घरी एकटीच होते, मग टी. व्ही. बघता बघता एक डबाभर आईस्क्रीम फस्त केलं. कळलंच नाही कधी एवढं खाल्लं गेलं ते!' ह्या पैकी एक तरी उदाहरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असणार.

अगोरा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 06/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक 'यशस्वी' चित्रपट पाहिल्यानंतर काय सापडतं? विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर? आजही फार काही वेगळं दिसत नाही आणि मुळात मानवी स्वभाव बदलत नाही. भाषा, वेशभूषा, तंत्रज्ञान बदलतं पण स्वभावाला औषध नाही. जमावाला तुच्छतावाद शिकवला की सत्ता हस्तगत करता येते, असलेली सत्ता अबाधित राखता येते. दुसर्‍या जमावाला तुच्छ लेखण्यासाठी भाषा, धर्म, जात, प्रांतिक ओळख किंवा इतर काही मानवनिर्मित ओळख असेल किंवा वंश, लिंग अशी निसर्गनिर्मित असेल.

उपेक्षित इतिहाससंशोधकाची मुलाखत

लेखक ईश आपटे यांनी बुधवार, 06/04/2011 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय इतिहाससंशोधनाची सुरस कथा-२ ह्यापूर्वीचा लेख आपल्याला इथे वाचता येईल http://misalpav.com/node/17423 ......... तर गेल्या वेळी मी आमच्या इतिहास संशोधन पध्दतीचा परिचय करुन दिला होता. अर्थात त्याला वैचारिक दिशाभूल पध्दती म्हणणे योग्य होईल. ह्या वेळी थोडा दुसरा प्रसंग सांगणार आहे. मागच्या वेळी फक्त मनुवाद्यांच्या वाड्यात जावे लागले होते, ह्यावेळी प्रत्यक्ष एका प्रतिगामी इतिहास संशोधकाची भेट घ्यायची होती. खर तर आम्ही ह्याला इतिहास संशोधक अस म्हणत ही नाही, मिथकवादी, पुनरुज्जीवन वादी असे काही बाहि शब्द आम्ही वापरतो.

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ९.५

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 06/04/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : आधीच्या ९ भागांचा या भागाशी काही-एक संबंध नाही. मी ,स्पा वेग्रे उपटसुंभ्या लोकांनी ५० फक्त यांच्या लग्नाची पत्रिका छापायचे/वाटायचे ठरवले.. त्यासाठी ही छापलेली पत्रिका अन चेष्टा... ही प्रत्येक मिपाकर मंडळीपर्यंत पोचवुन त्या दांपत्याला शुभाशिर्वाद मिळावेत म्हणुन हा छोटासा प्रयत्न ... दिल्लगी आहे दिल्लगीतच घ्यावे ही सर्व रसिक जणांना विनंती.
. . . .II श्री अष्टविनायक प्रसन्न II आमच्या येथे श्री संपादक मंडळ कृपेने, . ...

तिच्या मनातून.....................

लेखक कवितानागेश यांनी बुधवार, 06/04/2011 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज या अथांग उत्तुंग हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोचलेय... त्याचे अस्तित्व अगदी एखाद्या गंभीर पण आश्वासक मुनींसारखे भासतंय ... असे वाटतंय की कितीतरी काळापासून प्रवास करतेय, करतेय ....... ते शेवटी या इथे पोचण्यासाठीच. आत्तापर्यंत सोबत असलेले सगळेच निघून गेलेत पुढे, कधीचेच. पण मला भीती वाटत नाहीये, कसलीच नाही, कधीच वाटली नाही, ना माणसांची, ना संकटांची, ना परिस्थितीची, ना जगण्याची, ना मरणाची! पण मला आता अजून पुढे मात्र जाता येत नाहीये.... खरें तर माझी तशी इच्छाही नाही. मला खरोखरच कधी कसली इच्छा होती का? मला तरी आता आठवत नाही. होती ती फक्त आग, प्रचंड आग! माझ्यासकट सगळे काही जाळणारी आग.

सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.

लेखक विनायक बेलापुरे यांनी मंगळवार, 05/04/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा.

(यांना विसरुन कसे चालेल ? )

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 05/04/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?