मन उगाच भरकटते -
नेहमीप्रमाणे सर्व कामं आटपून हातात वर्तमानपत्र घेतलं .
कुठेतरी कुणीतरी आंदोलन केलं होतं , त्याचा
पाठपुरावा म्हणून आंदोलनाविषयी सविस्तर बातमी आली होती . माझी नजर त्या बातमी मधील चौकटीवर खिळली होती. आंदोलन 'संपवण्या'साठी आतुर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचे छायाचित्र त्या चौकटीत दिसत होते. त्यात पोलीस कुणाच्या पाठीवर , कुणाच्या पायावर तर कुणाच्या हातावर - हातातील काठीने जमेल तसा (त्वेषाने-) मार देतांना दिसत होते !
एका बाजूला पाठमोरा बसलेला एक मरतुकडा ज्येष्ठ नागरीक दिसत होता. ' अहो पोलीसदादा , मी नुसता या बाजूने चाललो होतो, माझा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही हो!
मिसळपाव