Skip to main content

विचार

एका व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियरचे मनोगत!

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 21/04/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
शैशव, बाल्य, पौगंड, तारूण्य, गृहस्थ अन वार्धक्य अशा षटजीवनावस्थांमध्ये कैचर्य (असा शब्द कदाचित मराठीत सापडतो) किंवा कचेरीगिरी (साध्या भाषेत ऑफिसमनशिप) अंतर्भूत करावी असे माझ्यासारख्या नोकरमाणसाला वाटते. नवतारूण्याअंती, गृहस्थांगी अन वार्धक्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड खेचर म्हणून एका मळ्यात ओझं वाहत सोसतो. हे मळं म्हणजे ऑफिस होय. इंग्रज जाता जाता भारताला हा नोकरपणा आंदण देऊन गेले. तारुण्यसुलभ "जग जिंकायची इच्छा" ही उपजतच सगळ्यांत असते.

हे जग मी सुंदर करून जाईन....

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 21/04/2011 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... नाशिकला विध्यार्थी स्नेह-संमेलनात भाईकाकांनी केलेल्या भाषणाचा काही भाग नुकताच मी इथे वाचला. त्यांनी केलेल्या अनेक उत्तमोत्तम भाषणांपैकी एक!!! कधीकाळी नाशिकला पुलंनी केलेलं हे भाषण अजूनही खूप नाविन्यपूर्ण वाटते, त्यापेक्षा मी असं म्हणेन की, पुलंची कुठलीही भाषण असू द्यात ती कधीच जुनी होऊ शकत नाहीत.

पोटपाल

लेखक तिमा यांनी बुधवार, 20/04/2011 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोणा एका राज्यात भ्रष्टाचार अतोनात माजला होता. राजा देखील या मलिन प्रतिमेमुळे अतिशय त्रस्त झाला होता. पण त्याच्या भोवतीचे कोंडाळे, प्रधानजी, राजाच्या पूर्वजांनी अनेक वर्षे पोसलेले वतनदार या सगळ्यांपुढे तो काहीच करु शकत नव्हता. स्वतः साधे रहाणे यापलिकडे तो लोकांसमोर कुठलाही आदर्श ठेवू शकत नव्हता. प्रजा ही एके काळी साधी होती. परन्तु सततच्या भ्रष्टाचारामुळे तीही अशा गोष्टी गृहीत धरु लागली होती. संपूर्ण लोकसंख्येमधे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे फारच थोडे लोक राहिले होते. ज्यांना कुठे ना कुठे हात मारता येत होता ते यथेच्छ ओरपत होते. ज्यांना संधीच मिळत नव्हती ते नाईलाजाने प्रामाणिक राहिले होते.

मुंबई विरुध्द पुणे ( आयपील क्रिकेट सामना)

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 20/04/2011 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मुंबई विरुध्द पुणे अशा चर्चा/ भांडणे आपण अनेक ठिकाणी, अनेक वेगवेगळ्या संदर्भाने पाहिल्यात , रंगवल्यात या दोन्ही शहरांच्या नावापुढे 'कर' जोडून दोन्ही संस्कृतीतील फरक, स्वभावपैलू विविध ठिकाणी, अगदी संकेतस्थळांवरही विक्रमी चर्चा आपण केल्या आहेत. आज आयपील सामन्याच्या निमित्याने आज ही दोन्ही शहरे एकमेकांविरुध्द लढण्यास सज्ज झाली आहेत.

कळत नाही...

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 18/04/2011 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अस कधीतरी होत कि आयुष्याच्या वळणावर कोणीतरी आपल्या बरोबर चालू लागत, आपल्या चालीशी चाल जुळवू पाहत, त्या साठी तो खूप तडजोडहि करतो, छान दिवस जाऊ लागतात, त्या माणसाची सवय होऊ लागते.. आणि... आणि अचानक तो माणूस आपली चाल बदलतो, आणि पुढे निघून जातो. आपल्याला काळतच नाही कि काय झाल, मान्य असत कि आपण त्याच्या चालीने चालू शकलो नाही, शक्यही नव्हत, पण... अलगद डोळ्यात पाणी येंत, कोणास ठाऊक कशामुळे, आता त्रास होत असतो, त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,....

शब्द शब्द जपून फेक

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 18/04/2011 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विचारांत असो, बोलण्यात असो वा लिखाणात असो, आपले शब्द आपल्या भोवतालचं जग बदलू शकतात. प्रेम, आनंद, वीरश्री, मैत्री, दु:स्वास, भीती, तिरस्कार ...सगळे, सगळे भाव या शब्दांतून जन्म घेतात. राल्फ वाल्डो इमर्सनने लिहून ठेवलंय त्याप्रमाणे (आपण जगातल्या खूपश्या गोष्टी बदलू शकत नसलो तरीही), आपण जन्मलोच नसतांना जग होतं, त्यापेक्षा आपल्या 'असण्याने' ते थोडंसं बरं, सुसह्य झालं असेल तर कधीही चांगलंच.

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 17/04/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips) संदर्भ: http://www.misalpav.com/node/17667 http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0 http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7995952.cms १. पाणीपुरी हि विक्रेतीकडची असली पाहिजे. (विक्रेत्याकडची नको.) २.

मिसळपाव विषयी......

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 16/04/2011 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी..... माझा पहिलाच प्रयत्न आहे मिपालेखनाचा त्यामुळे काही त्रुटी आपल्याला आढळल्यास सांभाळून घेणे. तसा मी सुद्धा मिपाकर आहे पण फ़क़्त वाचनापुरता. गेल्या वर्षी आगस्टमध्ये गुगलवर कोल्हापुरी मिसळीची पाककृती(स्वाती राजेश यांनी लिहलेली अतिशय चटकदार अशी कोल्हापुरी मिसळीची पाककृती) शोधता शोधता मिसळपाववर आलो आणि मग इथलाच झालो. सर्व मिपाकरांप्रमाणे मिसळपाव हा माझासुद्धा वीक पोइन्ट आहे. त्यानंतर मिसळपावची सवय इतकी अंगवळणी पडली कि सकाळी ऑफिसला आल्यावर सर्वात पहिल्यांदा मिसळपाव ओपन करतो आणि त्यानंतरच मग बाकीची सगळी कामे करतो.