Skip to main content

विचार

शैक्षणिक बाजारहाट

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/06/2016 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आजचा जमाना शिक्षणाचा आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेणं वाईट आहे, असं आज एखादा अशिक्षित माणूसही म्हणणार नाही. सर्व जगाने शिक्षण घेतलं पाहिजे. सर्व जग सुशिक्षित व्हायला हवं. मात्र शिक्षण आज ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे माणूस सुशिक्षित होणं लांबची गोष्ट झाली, तो शिक्षित तरी नीट होतोय का अशी शंका घ्यायला जागा आहे. शिक्षण म्हणजे पदवी, पदवी म्हणजे नोकरी, अशा व्याख्या तयार होऊन आज शिक्षणाचा पायाच खचला आहे. कसेही करून पदवी मिळायला हवी. पदवीचे प्रमाणपत्र हातात मिळालं की गंगेत घोडं न्हालं.

मला त्या गावी जायचेय...

लेखक हृषिकेश पांडकर यांनी सोमवार, 13/06/2016 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
शहराच्या मध्यात साठ कुटुंबांची एक चाळ असावी... स्क्वेअर फुटाचा हिशोब नको, फक्त पाठ टेकवायला एक खोली असावी.. श्रीमंती घरात नसली तरी बेहत्तर, संपूर्ण चाळ मात्र गडगंज असावी.. महिना अखेरच्या पगाराची आस नसावी.. meeting, appraisal, onsiteचा गंध नसावा.. मला त्या गावी जायचेय... उजव्या भिंतीपलीकडल्या खोलीत पु.ल.

पर्यटन विशेषांक - बॉलीवूड

लेखक हृषिकेश पांडकर यांनी गुरुवार, 09/06/2016 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवा 'चेन्नई एक्स्प्रेस' प्रदर्शित झाला.दीपिका पादुकोणच्या निमित्ताने माझे पाहणे झाले.सुमारे तीन तासाच्या प्रवासानंतर मी थियेटर मधून बाहेर पडलो.सिनेमाची कथा,गाणी,संवाद या गोष्टींवर नेहमी होते ती चर्चा झाली.सिनेमा कसा आहे, कोणाचा अभिनय कसा आहे इत्यादी पिसे काढून झाल्यावर आम्ही तिथून मार्गस्थ झालो.आता पिक्चर कसा आहे वगरे हे मुद्दे थोडे वादग्रस्त असू शकतात,कारण कोणाला काय आवडावे किव्वा काय आवडू शकेल याचा ताबा आपल्याजवळ नसतो.अर्थात याच वेगवेगळ्या चवी जश्या पाहणार्यांच्या असतात तश्याच त्या दिग्दर्शक गायक आणि लेखक यांच्या देखील असतातच.त्यामुळे सिनेमा कसा होता याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न नक्कीच ना

ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह

लेखक निनाद यांनी गुरुवार, 09/06/2016 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह तयार केला आहे. हा समुह ज्यांना ज्योतिषाची थोडीफार माहिती आहे, या विषयात रस आहे अशा सदस्यांसाठीच आहे याची नोंद घ्यावी. ज्योतिष विषयावर माहितेची देवाण घेवाण, सल्ला मसलत, कुंडलीची चर्चा, बदलत्या ग्रहस्थितीमुळे होणारे परिणाम याची चर्चा, नवीन प्रसिद्ध झालेली मासिके, पुस्तके आणि लेख यावर विचार विनिमय, अशा विषयांसाठी असावा अशी धारणा आहे. या समुहावर ज्योतिष/भविष्य संबंधित विषयाशिवाय इतर कोणतीही चर्चा करता येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

पर्यावरण संवेदनशील इमारती/ शहरे (Environment sensitive buildings/ urban Development): गरज

लेखक उल्लु यांनी सोमवार, 06/06/2016 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
गेली काही वर्षे आणि विशेषतः गेले काही महिने आपण वातावरण बदलाचे परिणाम अनुभवतोय. दरवर्षी होणारी पाणी कपात, दुष्काळामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लातूरला पाठवलेली जलदूत रेल्वे ह्या सारख्या बातम्या आपल्याला नित्याच्या झाल्या आहेत. बर्याच वेळेला ह्या विषयांवर अनेक मंचांवर झालेल्या चर्चाही आपण पहिल्या आहेत किंवा केल्याही आहेत. मिपा वरही अनेक धाग्यातून ह्या विषयांवर चर्चा झाल्या आहेत. ह्या विषयावर होणाऱ्या बहुतेक चर्चांमध्ये आपण आता मान्य करतोय कि वातावरण बदल (climate change) होतोय आणि त्याचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे.

कृत्रिम शीतपेये - सावधान ! ! !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 06/06/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
cold drinks कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो.

मी एकटा आहेच कुठे?, , , , , "खरे सुपरमॅन - आमचे आप्पा" या लेखात नमूद केलेला लेख.

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 03/06/2016 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच! अनेक वेळा खूप वैताग येई.

तो प्रवाही प्रवास…!

लेखक अश्विनी वैद्य यांनी शुक्रवार, 03/06/2016 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
नदीकिनारी चालत जाताना उन्हाची ऊब जरा जास्तच जाणवत होती. तळपायांना थोडा गारवा मिळावा म्हणून किनाऱ्यावर लांबच लांब पसरलेल्या हिरव्या, थंडगार लुसलुशीत गालिच्यावर शूज काढून पाय टेकवत एका झाडाखाली बसले. तिथल्या नीरव शांततेचाही एक वेगळाच आवाज कानांना जाणवत होता. थोड्यावेळाने सहजच लक्ष गेलं. माझ्यापासून अगदी दोन पावलांवरच मुंग्याची चाललेली एक लांबच लांब रांग दिसली…एक एक मुंगी अगदी ओळीने पुढचीच्या बरोबर मागे जात होती…मध्ये येणारे छोटे छोटे दगड, खळगे एका मागोमाग एक सहज ओलांडून पुढे चालली होती.