Skip to main content

वाद

.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखनाची प्रेरणा यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत उपरोल्लेखित लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं.

दुखरी बाजू का खुपते?

लेखक आशु जोग यांनी रविवार, 13/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख जरूर वाचावा http://tinyurl.com/lokanna लोकसत्तेने उगाचच नि:पक्षपणाचा आव आणून अण्णांच्या आंदोलनावर टीका सुरु केली होती जणू ए राजा, कनिमोळी, कलमाडी आणि टीम मनिमोहनचे सदस्य धुतल्या तांदळासारखे आहेत.

वेळ आहे कुणाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 14/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मेंढरं ? मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही? आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही.

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

लेखक VINODBANKHELE यांनी शुक्रवार, 23/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

निस्तीच पोकापोकी!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 16/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
एकानं दुसऱ्याला पोक केलं की दुसऱ्यानं पहिल्याला पोक करायचं, कोणी ‘हे’ शेअर केलं की कोणी ‘ते’ शेअर करणार, कोणी ‘ह्याची’ इमेज पेष्ट केली की कोणी ‘तिच्या’ इमेजा पेष्ट करीत सुटणार... सोशल नेटवर्किंग साईटा म्हणजे निस्ती पोकापोकी झालीय बघा. काय मनाला वाट्टेल ते गरळ बाहेर टाकून ओकाओकी करीत जायचं. भिंतीवर चढून पाहिजे ते खरडीत निघायचं, वाट्टेल ते डकवित चालायचं, नक्को नक्को त्या लिंका पेष्टवित जायचं. मग त्या कोण उघडून पाहतो तर कोणी न उघडताच छान, मस्त, उत्तम असं लिहून पुढे पळतो. सकाळ झाली रे झाली की सुप्रभात, जीएम म्हणत कोण काय प्रतिक्रिया देतो ते चाळीत जायचं. दुपारीही तेच.

पेट्रोल ची पुन्हा दरवाढ.

लेखक चन्द्रशेखर सातव यांनी गुरुवार, 15/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पेट्रोल ची पुन्हा सुमारे ३ रुपयांनी दरवाढ झाली आहे. ७१ रुपये प्रती लिटर आता पेट्रोल ची किमत असणार आहे,काही महिन्या पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर्स प्रती पिंप होती तेव्हा सरकार ने दरवाढ केली होती,परंतु सुमारे दोन महिन्या पूर्वी एशियन बाजात तेलाच्या किमती ८५ डॉलर्स प्रती पिंप पर्यंत खाली उतरल्या होत्या तेव्हा किमती कमी करण्याचा विचार केला नाही.आता मात्र रुपयाचे मूल्य डॉलर च्या तुलनेने कमी झाल्यावर लगेच दरवाढ का केली जात आहे ? चारही सरकारी तेल कंपन्या प्रचंड फायद्यात आहेत,मग कंपन्यांचे होणारे नुकसान त्या नफ्यातून का भरून काढले जात नाही ?

मिपावर उठवळ मोर्चा (स्लटवॉक)

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 26/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... आता तुम्ही मला विचाराल, की उठवळ मोर्चा म्हणजे नक्की काय? तर उठवळ मोर्चा हे स्लटवॉकचं मराठी भाषांतर आहे. कॅनडा का कुठल्याशा देशात एका पोलिस अधिकाऱ्यांने बायकांना सांगितलं की 'तुम्हाला जर बलात्कार करून घ्यायचा नसेल तर हे असले उठवळ बायकांसारखे उत्तान कपडे घालणं थांबवा'. त्यावरून बायका खवळल्या. एक तर पुरुष प्रधान संस्कृतीत पददलित म्हणून रहायचं. वर वेळोवेळी पुरुष बलात्कार करतात.