डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ३
मागील भाग - http://misalpav.com/node/16707
***
अॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय यात साम्य काय आहे आणि यावर काहीतरी लिहा असे जर सांगितले तर आपल्यापैकी किती जणांचे डोके चालेल हे मला माहित नाही. किमान मी तरी असे काही लिहू शकणार नाही हे नक्की. लिहिल्यानंतर लोकांना ते आवडेलच याची खात्री नाही. पण काही जण मात्र आरामात अशा वरवर एकमेकांशी संबंध नसलेल्या शब्दांच्या शीर्षकाचा लेख लिहितात आणि तो वाचला की आपल्याला वाटते "अरे हो यार ! आपण पण असे लिहू शकलो असतो !!
मिसळपाव