Skip to main content

संदर्भ

पर्शियन, अरबी, फारसी इ भाषा आणि प्राचीन लिप्या

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 09/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पारशांचा धर्मग्रंथ अवेस्तात असुरांना अहुर असे म्हणलेय. पर्शियन भाषेत 'स' नसल्याने त्याचा उच्चार 'ह' असा होतो उदा. सप्तसिंधू चा उल्लेख हप्तहिंदू वगैरे. आणि त्यात देवांना शत्रू म्हणून दाखवलेय असे कुठेतरी वाचले होते. असिरीया हा पर्शियन साम्राज्यातलाच प्रदेश. असुर कोण (१) या धाग्यावरील भाषा आणि लिपीच्या संदर्भातील प्रतिसाद या धाग्यात हलविले आहेत. - संपादक मंडळ

अ‍ॅन्ड्रॉईडः अडखळती पहिली पाऊले

लेखक लंबूटांग यांनी शुक्रवार, 05/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गूगल ने विकत घेतल्यानंतरही अ‍ॅन्ड्रॉईडचे मुख्य ध्येय तेच होते - एक असा प्लॅटफॉर्म जो कोणत्याही software इंजिनीअर ला मुक्तपणे त्याला हवा तसा वापरता येईल. त्यामागे अजून एक उद्देश हाही होता की अशी खुली बाजारपेठ उपलब्ध करून देऊन सेलफोन कंपन्यांची हुकुमशाही मोडीत काढणे. तो पर्यंत अमेरिकेत सेलफोन सेवादाते त्यांना हवे तसे फोन हँड्सेट निर्मात्यांकडून बनवून घेत होते. ह्याला कारण म्हणजे अमेरिकीतील कंत्राट पद्धत. तुम्ही तुमच्या सेवादात्याबरोबर २ वर्षे बांधिलकीच्या कंत्राटावर सही करायची आणि त्या बदल्यात तो सेवादाता तुम्हाला फुकट अथवा नगण्य किमतीत हँड्सेट देणार.

राजकीय पक्ष आणि संरचना

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 01/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
काल भाजपामधील नव्या अध्यक्षांनी आपली नवी 'टीम' घोषित केली. या निमित्ताने प्रत्येक पक्षातील अंतर्गत संरचना कशी असेल असे कुतूहल होते. थोडी शोधाशोध केल्यावर भाजपा, काँग्रेस आणि डाव्यांमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची रचना जशी माझ्या लक्षात आली तशी येथे देत आहे. या धाग्यामुळे विविध बातम्यांत वेळोवेळी उल्लेख होणार्‍या पदांविषयी अधिक डोळस समज निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. ========================
भारतीय जनता पार्टी (भाजपा):
भाजपा या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

दारू - म्हणजे काय रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 05/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते.

उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 14/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला. श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी.

क्यू. आर. कोड - म्हणजे काय रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या ट्रीपला पुण्याहून चेन्नैला परतण्याच्या आदल्या रात्री, इ-तिकीट हॅन्डबॅगच्या खणात ठेवताना मुलाने बघितले आणि "बघू...", असे म्हणून मागितले. त्यावर क्यू.आर. कोड होता. ते बघून, “आयला, कसलं भारी डिझाइन आहे. तिकिटावर कसलं आहे हे डिझाइन?”, असा मला प्रश्न विचारला. मग त्याला उत्तर देण्याऐवजी मी मोबाइल काढला आणि त्याच्यावरचे ‘क्यू.आर. ड्रॉइड (QR Droid)’ हे अ‍ॅप चालू केले आणि तो कोड स्कॅन केला. मोबाइलमध्ये डायरेक्ट ब्राउझर चालू होऊन, स्पाईस जेट एयरलाइन्सची वेब साईट चालू झाली आणि माझा 'वेब - चेक इन' केलेला बोर्डिंग पास दिसू लागला.

काकबन

लेखक सोत्रि यांनी रविवार, 20/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
एका काकबनात असंख्य कावळे नांदत होते. वेगवेगळ्या मतप्रवाहाचे थवे होते त्या काकबनात. पत्येक थवा आपापल्या मतप्रवाहांवर ठाम होता. त्या मतप्रवाहांमधली विवीधता त्या काकबनाचे वैषिठ्य होते. अनेक नविन कावळे त्या बनात येऊन आनंदाने विहार करायचे. बरेच कावळे त्या काकबनात असलेल्या थव्यांना बिचकूनही असायचे. कारण हे थवे कधी कधी झुंडीने काही वेगळेपणा दाखवणार्‍या कावळ्यांवर तुटून पडायचे. त्या काकबनाच्या इतिहासात असे बरेच वेगळे असणारे कावळे हार मानून काकबन कायमचे सोडून निघून गेले होते. त्यात त्या काकबनाचेच नुकसान झाले. पण हे त्या थवे करुन रहणार्‍या कावळ्यांच्या कधी लक्षात आलेच नाही.

ग्लोबल पोजिशनिंग (GPS) म्हणजे काय रे भाऊ?

लेखक सोत्रि यांनी रविवार, 16/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात फेसबुकवर मोबाइलवरून एक स्टेटस पोस्ट केला, त्यावेळी मोबाइलवर लोकेशन शेअर करणारा संकेत ऑन होता त्यामुळे पोस्ट कुठून केली हेही बहुतेक प्रकाशित झाले. नेमका त्यावेळी माझा एक जुना मित्र चेन्नैत आला होता. त्याने ती पोस्ट आणि लोकेशन वाचून, लगेच फोन करून तोही चेन्नैतच आहे असे सांगून भेटायचे ठरवले आणि बर्‍याच वर्षांनी आमची भेट झाली. त्याच्या हॉटेलवर जाण्यासाठी मोबाइलवर ए-जीपीएस (A-GPS) प्रणाली वापरून रस्ता शोधला. मागच्या महिन्यात गोव्यात फिरतानाही ए-जीपीएसचा (A-GPS) भरपूर वापर केला होता.

ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||

लेखक बाबा पाटील यांनी रविवार, 09/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते | खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली || रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली | प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || " कवि गोविंद.... महाराणी ताराराणी बद्दल आणखी काही माहिती असेल तर्,कृपया सांगावी....