Skip to main content

संदर्भ

कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’ विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण ८. ---

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 17/02/2012 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, विवेक खोतांनी करणी / भानामती असा धागा काढून त्यांना आलेला विलक्षण अनुभव सादर केला. त्यानंतर अनेकांनी आपापल्या अनुभवांची त्यात भर घातली. त्यावर नेहमीप्रमाणे उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यात गविंनी त्यांना सुचवले, “आपण करणी वा भानामती खरी असते असे न बिचकता खणखणीतपणे म्हणा व त्यावर चर्चा करायला टाका”. आत्मशून्यांनी म्हटले, “भानामती /करणीचा तर स्वतःला मला अनुभव नाही पण लोकांचे किस्से जबरदस्त बुचकळ्यात पाडतात”.

ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’ - प्रकरण 7

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 12/02/2012 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्रकरण 7
ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
ज्ञान तपस्वी प्रा.

निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 02/02/2012 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला थोड्क्यात ओळ्ख /इतिहास :- १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे.

चित्रपट निर्माते गजानन जागीरदर यांच्यावर बुद्धिवाद्यांनी केलेला अन्याय - प्रकरण 9

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 01/02/2012 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्या ब्लॉगमधील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा. विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. दैनिक तरुण भारत... ...विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल आंधळी श्रद्धा व विश्वास बाळगणाऱ्यां लोकांनी तर वाचलेच पाहिजे. पण विज्ञान व त्याची सामाजिक बांधिलकी या विषयाची आस्था बाळगणाऱयांनीही अवश्य वाचले पाहिजे, असे आग्रहाने सांगावेसे वाटते. - रामचंद्र रेडकर बेळगाव. दैनिक लोकमत ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे.

२०१२... अजून काय???

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 25/01/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी ऑफिसमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे ईमेल चेक करत बसलो. कामाचा प्रचंड कंटाळा आला होता (तो नेहमीच येतो म्हणा ;)). एक नियम नेहमी पाळतो, क्लायंटचे ईमेल सगळ्यात शेवटी चेक करतो. साले एक से एक मनहूस असतात, कारण त्यात नेहमीच एकच चर्चा असते टार्गेट्स..टार्गेट्स आणि टार्गेट्स. म्यानेजरचा पहिला ईमेल बघितला, त्याला हाय प्रायोरीटी असं मार्क केलं होतं. ***ATTENTION*** म्हटलं झालं, काही तरी नवीन जबाबदारी दिली असणार. रागातच तो ईमेल उघडला आणि त्यात सूर्याचे काही फोटो दिले होते.

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 17/01/2012 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

लेखक यकु यांनी सोमवार, 16/01/2012 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४ सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला. झपाट्याने पुढे गेलो. मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.