Skip to main content

संदर्भ

"हमें तुमसे प्यार कितना.."

लेखक अन्नू यांनी रविवार, 21/09/2014 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ-सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरिप सॅमन्थाच्या तोंडावर पडली आणि नापसंतीदर्शक हुंकार भरत तिने तशीच आपली मान बाजुला कलती केली. रात्रीच्या झोपेची ती धुंदी अजुनही तिच्या डोळ्यांवरुन गेलेली दिसत नव्हती. त्या गोड झोपेच्या तंद्रीतच तिने पुन्हा एकदा आपली कुस बदलली. डावा हात पुढे टाकला. अन्.. नकळतच तिच्या चेहर्‍यावर मंद हसू उमटून गेले! आपल्या जडावलेल्या पापण्या हळूवाSरपणे उघडत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तो तिच्या जवळच होता- मॅक.. तिचा मॅक! आणि ती आता त्याच्याच अंगावर हात टाकून स्वस्थ झोपली होती. हलकेसे स्मित करत तिने कौतुकभरल्या नजरेने त्याला न्याहाळले.

जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!

लेखक विलासराव यांनी शनिवार, 16/08/2014 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन. म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे.

फेर्‍यात अडकलेला...

लेखक ऋतुराज चित्रे यांनी गुरुवार, 31/07/2014 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अ‍ॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो. मित्राची कंपनी त्याच्या घरापासून अंदाजे तीसएक कि.मी.वर आहे. हायवेने ३०-४० मिनिटात कंपनीत पोहोचतो. नव्या स्प्लेंडरमुळे चक्क २० मि.

कै. व्यंकटेश माडगुळकारांना साहित्यिक आदरांजली. भाग 1

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 04/06/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.

28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.

लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग 1

संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक

काही काळापुर्वी माझ्या हाती 'चित्रे आणि चरित्रे' या नावाचे कै. व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक हाती आले. (उत्कर्ष प्रकाशन पुणे.

अजंठा ...........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 28/02/2014 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ वत्सगुल्म शाखा : वाकाटकांची अशी काही शाखा आहे हे १९३९ पर्यंत माहीतच नव्हते. तसे अजंठामधे यांचे बरेच शिलालेख आहेत पण वाईट अवस्थेमुळे त्याच्यातील नावे चुकीची वाचली गेली. अकोला जिल्ह्यात वाशीम येथे एक ताम्रपट सापडल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.

शेजारचा फँड्री !!!

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 26/02/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
फँड्रीची मी आतुरतेने वाट बघत होतो. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो हे माझे अगदी ठरले होते. सर्वात मागच्या दोन रांगांमध्ये आराम खुर्च्या आहेत. त्यामुळे मी आणि बायको आरामात सिनेमा सुरु होण्याची वाट बघत मस्त रेललो होतो. पहिला शो असूनही गर्दी ब-यापैकी होती. नागराजला - फँड्रीचा कथा लेखक आणि दिग्दर्शक - लगेच SMS करून अभिनंदन केले. " nashikacha pahilaach show full ! Congrats Nagraj !!!. सिनेमा सुरु झाल्यावर नेहमी प्रमाणे लोक येतेच होते.

अठरा श्लोकी मराठी गीता

लेखक खेडूत यांनी रविवार, 26/01/2014 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत असणे आणि अर्थ सुद्धा समजत असणे हे फारच विशेष आहे. कांही जणांना ती पूर्ण पाठ असते. तसेच माझ्या आईला पण संपूर्ण गीता पाठ आहे. तेही साठ वर्षांपासून! मला संस्कृत येत नाही याचे नेहमी वाईट वाटते. पुढे कधी तरी नक्की करायच्या गोष्टीत संस्कृत शिकणे सर्वांत पहिले आहे. आमच्या गावातल्या शाळेत संस्कृत हा विषय माझ्या ब्याच पासून बंद झाला, कारण म्हणे संस्कृत शिक्षकांचा तुटवडा. हे खरे नसावे असे वाटते कारण आमच्या शाळेतल्या तांबोळी नावाच्या मुस्लिम बाई संस्कृत मध्ये एम ए होत्या आणि त्याना हिंदी शिकवावे लागे म्हणून त्याना वाईट वाटे!