Skip to main content

समीक्षा

रेडी ? नो रेडी ssSSsss ...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 21/06/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती.

देरसू उजाला

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 20/06/2011 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
जे जंगलात हिंडतात, ट्रेकींग करतात, त्यांना भावणारा हा सिनेमा. मला तरी हा बघितल्यावर रात्रभर झोप आली नाही. देरसूची शप्पत !

दोन गोष्टी नेहमी माझ्या हाताशी असतात.

  1. पाडस नावाचे पुस्तक आणि
  2. देरसू उझालाची सी. डी.

देरसू उझाला

   

मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली (भाग २)

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 12/06/2011 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय पूर्वपीठिका: लेख जरा लांबलचक होतो आहे अशी जाणीव लिहिताना झाली होती. त्यामुळे तो शेवटीशेवटी थोडक्यात आटपला होता, हे कबूल करतो. पण शेवटचा भाग त्रोटक करण्यामागे त्याशिवाय अजून एक विचार होता: अखेर चित्रं ही डोळ्यांनी पहायची असतात. त्याविषयीचं विवेचन हे फार फार तर जरा मदत एवढ्यापुरतंच यावं असं मला वाटतं. असो. काही लोकांची तशी इच्छा दिसल्यामुळे थोडं अधिक विवेचन देत आहे.

'लोक'मत

लेखक निखिल देशपांडे यांनी मंगळवार, 07/06/2011 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सुरु झालेल्या पेपर वॉरची गंमत आमच्या घरा पर्यंतही पोहचली. शनिवार रविवार औरंगाबादला पोहचल्यावर जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे लोकमतची घरातून हकालपट्टी झालेली होती. लोकमतच्या साथीला किती तरी पेपर आले आणि गेले, तरी पण आमच्या घरातून निदान गेली १५ वर्ष तरी लोकमत काही हलत नव्हता. दिव्य मराठीने हे काम करुन दाखवले. दिव्य मराठीच्या लॉन्चची तशीही जोरदार तयारी करण्यात आली होती. वातावरण निर्मितीचे प्रयत्न जोरदार होते. सुरवातीला आलेला सर्व्हे, त्यानंतर वाटलेली औरंगाबादची माहिती सांगणारी डायरी, २०० रुपयांत वार्षिक नोंदणी, असे एक ना अनेक मार्केटिंग गिमिक्स वापरण्यात आले.

हत्या करायला शीक

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 29/05/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
हत्या करायला शीक विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्‍यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्‍यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.

बालगंधर्व, आम्ही तुम्हाला पाहिलं!

लेखक समीरसूर यांनी रविवार, 15/05/2011 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातल्या दिवसेंदिवस असह्य होत जाणार्‍या वाहनवरातीतून कसेबसे रस्ता काढत आम्ही आठ वाजता सिटी प्राईडला पोहोचलो. 'बालगंधर्व'चे खूप कौतुक ऐकून होतो; त्यामुळे हा चित्रपट पाहणं क्रमप्राप्त होतं. शिवाय 'नटरंग'मुळे रवी जाधव काय ताकदीचे दिग्दर्शक आहेत हे लक्षात आलं होतंच. आगाऊ तिकिट काढून देखील अगदी कोपर्‍यातली तिकिटे मिळाली होती. स्थानापन्न झालो. पुढील सव्वादोन तास अक्षरश: मंतरलेल्या अवस्थेत चित्रपट पाहिला. कशाकशाचं तोंड भरून कौतुक करावं? शब्दात कसं पकडायचं ते गारुड?

शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 03/05/2011 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
सबसिडी कुठाय? गेल्या अनेक वर्षापासून मी ऐकत आलोय की शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जाते. शाळा-कॉलेजात शिकत असताना पहिल्यांदा ‘शेतीची सबसिडी’ हा शब्द ऐकण्या-वाचण्यात आला. अगदी तेव्हापासून मी शेतीत सबसिडी कुठे आहे म्हणून शोधण्यासाठी जिवाचा आटापिटा करत बसलोय; पण मला काहीकेल्या ही शेतीतली सबसिडी गवसतच नाहीये. बहुतेक तळहातावरच्या केसासारखीच ही ‘शेतीची सबसिडी’ सुद्धा अदृश्य स्वरूपात अस्तित्वात असते की काय, किंवा मीच तर अंधार्‍या खोलीत नसलेले काळे मांजर शोधत बसलो नाही ना? असा एक प्रश्न आजकाल माझा मलाच पडायला लागला आहे.

काही निसर्गचित्रे फोटोग्राफी टेकनिक्स आणि फोटोशॉप

लेखक खालिद यांनी शुक्रवार, 29/04/2011 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी शरद यांनी म्हटल्याप्रमाणे, 'मिपावर या विभागात अनेक छायाचित्रकार आपली छायाचित्रे डकवत असतात. त्यांचा दर्जाही चांगला असतो. प्रतिसादावरून हेही जाणवते की वाचकांना ही चित्रे आवडतात. याचे एक कारण असे की या चित्रातील ७०-८०% च्या आसपास निसर्गचित्रे असतात. आता घनदाट झाडी, फेसाळणार्‍या लाटा, बर्फाच्छादित पर्वत नेत्रसुखदायक असल्याने सर्वच खुश. उरलेल्या चित्रात फुले आणि पक्षी. तेही चांगले दिसतात. आनंदी आनंद गडे.... एक लक्षात घ्या. या अशा चित्रांत वेळ, अपर्चर, स्पीड, दृष्टीकोन, थोडेफार बदलले तरी फारसा फरक पडत नाही. चित्राची आकर्षकता कायम रहाते.