गुंडा

क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर गायन = लता / आशा / किशोर / रफी संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर लेखक = पु ल / व पु / सावंत कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड gunda थोडक्यात सां

विचारणा व तोड सुचवा

लेखनविषय:
मित्र हो व विशेषतः स्मार्ट मोबाईल व टॅब वापरणाऱ्यांनो, मी एल जी इ 400 स्मार्टफोन वापरतो. त्यात ‘मल्टीलिंग की बोर्ड’ हे ऎंड्रॉईड बेस्ड ऎप वापरून मराठीत ‘इन्सक्रिप्ट’ पद्धतीने लेखन करतो. पण जाड बोटांनी बारीक चौकोनी कीज दाबताना 10 पैकी 4 वेळा नको ती अक्षरे दाबली जातात. मोठ्या आकारात इतर कंपन्यांचे टॅब घेऊन त्यावर टाईप करायला सोईस्कर होते. पण त्यात गैरसोय अशी की ज्ञ, श्री, क्ष अशी युक्ताक्षरे व प्र त्र अशी जोडाक्षरे तुटक्या प्रकाराने दिसतात व विरस होतो. शिवाय ह्रस्व वेलांटी पुढील अक्षरावर पडते. जसे शशकिांत. मित्रांनो, आपण यावर काही तोड सुचवावीत.

उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...

मित्रांनो, काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला. श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी.

झेन कथा - सहनशिलता

लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपा वरील अलीकडील काही लेख, त्यावरील प्रतिसाद आणि त्या प्रतिसादांचे पडसाद वाचुन मला ही झेन कथा आठवली. योग्य/अयोग्य, पाप/पुण्य, साक्षर/निरक्षर, इश्वरवादी/निरीश्वरवादी ई. वादग्रस्त वातावरणात थोडासा शितल शिडकाव करावा हा हेतु. zen चंदन पुर गाव. या गावात लहु लोहाराच एक दुकान असतं.

'कट्टा... On The Rocks': संक्रमणावस्थेतील पिढीचा आत्मशोध

लेखनविषय:
'कट्टा' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका.कधी चहाची टपरी नसेल तर कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोल च्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशी पासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा.

हझारो ख्वाहिशे ऐसी...३

लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग एक : http://www.misalpav.com/node/23033 भाग दोन : http://www.misalpav.com/node/23154 नर आणि मादी या हिशोबात विचार करायचं ठरवलं तर आपलं माणूस कोण असतं? ते जावूदे, पण मला एक सांगा कि, हि कथा ज्यांना आवडतिये/ आवडली आहे, त्या प्रत्येकाची एक कथा असेल... त्या प्रत्येकाची एक तार असेल, भूतकाळातली. कुठल्यातरी एका तानेवर या कथेतली एक एक ओळ समेवर येतेय आणि कोणाकोणाचे सूर जुळून जाताहेत. ती तुमची तान आहे, तिचा ठेका हे तुमच्या आठवणीतलं तुमच्यापुरत गाणं. कधी हे गाणं कॉलेज मध्ये साकारलेलं तर कधी बालपणामध्ये.

माझी चार अंग वस्रे

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

स्कायफॉल-

विदेशी चित्रपटात सकस कथा, स्पष्ट व्यक्तिचित्रण व अतिप्रगत छायालेखन यांचा संगम अनेक वेळा दिसून आलेला आहे. या सर्व व्यक्तिचित्रणात चार्ली चाप्लीन यांचा ट्रॅम्प, ब्रॅम स्टोकर यांचा काउंट ड्राक्युला , इयान फ्लेमिंग यांचा जेम्स बॉण्ड व स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा इंडियाना जोन्स हे लोकप्रिय आहेत. ५० वर्षे टिकून जेम्स बॉन्ड याने त्यात आघाडी घेतली आहे यात शंकाच नाही. नुकताच प्रदर्शित झालेला "स्कायफॉल" हा॑ चित्रपट कथेत जरा कमी असला तरी फोटोग्राफी , अभिनय, व्यक्तिचित्रण यात सरस ठरलेला आहे. पूर्वी दुखावलेला एक ब्रिटिश गुप्तहेर आता सायबर टेररिस्ट झालेला आहे.

२१ डिसेंबरचे प्लॅन्स

तर मित्रहो, २०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अ‍ॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे!
Subscribe to शिफारस