मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे.
मिसळपाव
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.