Skip to main content

जागो ग्राहक जागो - एक अनुभव

लेखक बाळ सप्रे यांनी शुक्रवार, 30/03/2012 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
दिड एक वर्षापूर्वीची गोष्टं.. टिपिकल ट्रॅप.. बिग बझार/ उत्सव प्रदर्शनात स्लिप भरलेली.. तिथे मिळवलेला फोन नं. वापरून फोन आला.. लकी ड्रॉ मध्ये तुमचा नंबर लागलाय.. ३ दिवस ४ रात्री हॉलिडे फ्री वगैरे वगैरे.. खरं तर फक्त टाइमपास म्हणून गेलो. ठरवलं होतं थोड ऐकायचं.. काय फ्री असेल तर घ्यायचं आणि परत फिरायचं.. भन्नाट दावे केलेले.. ज्या हॉटेल्सचा मार्केट रेट ७०००-८०००रु दर दिवशी आहे अशी हॉटेल्स ७००-८००रुपयात मिळतील.. ते पण फक्त "युटिलिटि चार्जेस"!! भारतात आणि परदेशात हजारो ठिकाणी टायअप्स्.. सर्व बुकिंग सेवा ऑनलाइन उपलब्ध.. परदेशात तर युटिलिटि चार्जेस दर आठवड्याला फक्त $१०० !!

द अंडरटेकर!

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी सोमवार, 26/03/2012 04:09 या दिवशी प्रकाशित केले.
बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला! मार्क विल्यम कॉलॉवे.

आशियाड बसेसबद्दल काही

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/03/2012 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
रामदाससरांचा हा लेख वाचला. मागे मी एसटी पुराण हा लेख लिहीला होता. त्यात प्रस्तूत लेखात आलेले मुद्दे विस्ताराने कधीतरी लिहीण्याची मनिषा व्यक्त केली होती. हा लेख प्रतिसाद म्हणून तेथेच टाकणार होतो पण प्रस्तूत लेख अन रामदाससरांचा लेख यांचा विषय वेगळा असल्याने हा लेख वेगळा म्हणून लिहीत आहे. असो. राज्य परिवहन महामंडळ सार्‍या राज्यात सेवा देते. केवळ पुणे मुंबई म्हणजेच महाराष्ट्र नाही. ग्रामिण भागात अजूनही लाल बसेचच धावतात. तेथे सुखकर प्रवासाची अपेक्षा नसली तरी प्रवास हा गरजेचा असतो.

(कॉमन मॅन यांनी पुन्हा धागा काढला)

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 28/02/2012 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरचे तथाकथित वकील सदस्य कॉमन मॅन यांनी आजच पुन्हा एकदा कथ्याकुट सदरात धागा काढून त्यांची मते मांडली आहेत दोन वाक्यात आपले मत व्यक्त करण्यासाठी नमनालाच घडाभर तेलाची उधळपट्टी केली आहे कॉमन मॅनच्या हाताशी असलेला जिलेबीचा सोऱ्या, इतर सदस्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ आणि आपणच इथले कायद्याचे जाणकार असून, प्रत्येक धाग्यात कलमांचा संदर्भ लावलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह आता बळावलेला दिसतो असेच म्हणावे लागेल कॉमन मॅन यांनी पाडलेल्या जिलेब्यांच्या विषयांवरून जयंत कुलकर्णी यांनी त्यांच्या पोशाखाला चालेंज करायचे ठरवलेले दिसते.

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

शि द फडणीस

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी बुधवार, 22/02/2012 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं.

छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर

लेखक सागर यांनी शुक्रवार, 10/02/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
Kurundkar आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.

मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अ‍ॅप)

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 01/02/2012 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अ‍ॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अ‍ॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील. मिपा अ‍ॅप हे अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल.

शाळा : प्रत्येकाच्या मनातली

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 25/01/2012 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्‍याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे.