माझी रेखाटने- कृष्ण
नमस्कार मंडळी,
आधीच्या रेखाटनांचा प्रतिसाद बघून अजून काही रेखाटने टाकण्याचा हुरूप आला आहे.
आधीच्या रेखाटनांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आज गोकुळाष्टमी.
गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी
छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना
मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...
- प्राजु
आज ३१ जुलै! माझ्या अत्य॑त लाडक्या गायकाचा, रफीसाहेबा॑चा स्मृतिदिन! त्या॑च्या पवित्र स्मृती॑ना माझे लाख लाख प्रणाम..
अल्पचरित्र -
२४ डिसेम्बर १९२४ रोजी, अमृतसर जवळच्या कोटला सुलतानपूर ह्या छोट्याश्या गावात हाजी अली मह॑मद या॑ना सहावे पुत्ररत्न झाले. त्यावेळेस कोणीच ही कल्पना करू शकले नसेल की हेच मूल अखिल विश्वात महान गायक म्हणून नाव गाजविणार आहे.. मह॑मद रफी!!
लहानपणापासूनच रफीसाहेबा॑ना गाण्याची आवड होती. त्या॑चा गोड गळा त्या॑च्या मेव्हण्याने, मह॑मद हमीदने हेरला व त्या॑ना स॑गीत-शिक्षेसाठी प्रोत्साहन दिले.