Skip to main content

सद्भावना

थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 01/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
थोरांची ओळख जालिंदर जलालाबादी : या सदरामधून आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कामगिरीची ओळख करून देणे, हा उद्देश आहे. जालिंदर जलालाबादी हे साठच्या दशकात लिहायला सुरुवात केलेले महत्त्वाचे विद्रोही कवी आणि लेखक. पुढे त्यांनी जगभर विशेषत: अफ़्रिकेमध्ये मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा फ़डकावत ठेवला. त्यांचे कुटुंब मूळचे अफ़गाणिस्तानचे... फ़ाळणीमध्ये त्यांचे कुटुंबीय पळून भारतात आले...त्यांची अफ़ूची शेती होती.जगभर पसरलेला व्यापार होता. पण पुढे कुटुंबीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर जालिंदरजींचा जन्म झाला.

दास

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 01/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा आप, तेज, वायु, धरा, सार्‍यांतच भास तुझा तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा मनमोहन, यदुनंदन, यमुनातटी रास तुझा तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा माझी ही कविता आमच्या मुंबईहून प्रसिद्ध होणा-या कार्यालयीन अंकात {संचारिका २००७=०८} मध्ये पूर्व प्रकाशित झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

लेखक सागर यांनी शुक्रवार, 27/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९) छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत. तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.

आभार मिपा व मिपाकरांचे

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 13/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव आणी मिपाकरांचे चे आभार कसे व्यक्त करु अस प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता आणी डोक्यात ही कल्पना आली. रुक्ष वाळवंटात जसा सापडावा अमृताचा झरा तशी मराठीची तृष्णा शमे मिसळपावच्या घरा मराठमोळ्या माणसांना फक्त मिपाचाच आधार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! काव्य, चर्चा, साहित्याचा अनमोल असा ठेवा संगे कौल,कलादालन आणी पाककृतींचा मेवा लहानथोरांसाठी हे मराठीचे अक्षय भांडार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! कोणी न वाटे इथे परके जरी आले कधी प्रतिसाद तिरके भावाबहिणीचे गोड भांडण, तसे एखाद्या काव्याचे विडंबन किती आपुलकी, जिव्हाळ्याची इथे बहार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! चुकुन कुठे कंपुबाजीची तक्रार, कधी तंट
Taxonomy upgrade extras

रसराजेश्वर..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 13/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
साला, मुक्तछंदातल्या आमच्याही या काही ओळी.. मार्च अर्धा संपला जवळजवळ! तो आता येणारे, तो येतोय, येऊ घातलाय..! चला त्याचं स्वागत करुया, सज्ज राहूया, गुढ्यातोरणं उभारून! तो राजा आहे, तो बादशहा आहे तो सम्राट आहे..! तो साक्षात चक्रवर्ती आहे..! तो माणसाला माणूस जोडतो, तो मनातले सारे विकार करतो नाहीसे एका क्षणात.. तो वाटतो फक्त प्रेम

होळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 11/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना होळी-रंगपंचमीच्या अनेकानेक शुभेच्छा! :) आपले, अनुष्का शेट्टी, तात्या शेट्टी! :)

सामुद्रधुनी

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 09/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून शांततेची कबुतरे उडताना पाहून गालिब म्हणाला वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव गुंत्यातला तोरा मिरवत घाटातली वळणे घेताना चुकून मॅडोना म्हणाली जितं जितम् जितम् प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेताना सजणी म्हणाली "अय्या, याला काय अर्थ आहे?"

मातिच्या मुंग्या

लेखक अडाणि यांनी शनिवार, 07/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती मला कळले नाही आजपण... जाता जाता वेळ गेला कळले नाही कधी सरले बालपण... उचलली जीभ लावली टाळ्याला बोलू नका तूम्ही काहीपण... मूंग्या ही गेल्या आणि जीभ ही गेली हाती उरले फक्त वेडेपण... का म सु (काही महत्त्वाच्या सुचना) १. सदरची कविता आंतरजालावर इतरत्र आढळ्ल्यास (शक्यता कमी तरीपण) त्या कवी म्हणवणार्‍याने चोरली आहे असे समजावे. २. ज्यांना विडंबन करायची हौस आहे त्यांनी क्रूपया ह्या कवितेचा वापर करावा... म्हणजे इतरांना त्रास होणार नाही. ३. ज्यांना विडंबन करायची हौस नाही त्यांनी ही कविता विडंबित समजून मुळ कविता तयार करवी. ४.