Skip to main content

प्रतिसाद

झुंई...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 09/03/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑर्विल आणि विल्बर या दोन राईट ब्रदर्सनी १७ डिसेंबर १९०३ या दिवशी पहिलं विमान उड्डाण केलं.. असं आपण सर्वांनीच ढोबळपणे ऐकलेलं असतं..तारीखवार कदाचित माहीत नसेल, पण राईट ब्रदर्सचं नाव विमानांशी जोडलं गेलंय हे आपल्याला माहीत आहे. तसं पाहिलं तर राईट ब्रदर्स हे विमानोड्डाण करणारे किंवा त्यावर प्रयोग करणारे पहिले मुळीच नव्हते. त्यापूर्वीही अनेक जणांनी हे प्रयोग केले होते. बलून्स, ग्लायडर्स अशा अनेक प्रकारच्या उडू शकणार्‍या यंत्रांनी हवेत तरंगण्याची युक्ती आधीच जमलेली होती. मग राईट जोडगोळीने काय नवीन केलं? तर त्यांनी हवेपेक्षा जड विमानाला नियंत्रित करत उडवण्याचं तंत्र शोधून काढलं..

एकात एक...

लेखक गवि यांनी बुधवार, 07/03/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
भात लावायचाच ना भांड्यात.. मूठभर डाळ त्यातच टाकू.. होऊन जाईल एकात एक.. भेकरटाप्रमाणे चहाच्या कपावर धरलेलं ओलंगिच्च बिस्कीट.. लपलपत पत्तकन चहात पडण्याची वाट पाहताना पुन्हा चटका मिळणार म्हणून शहारलेलं.. ते पडल्यानंतरही इकडे पेपरात रुतलेली बुबुळं तिथेच भिरभिरत राहतात.. चहासोबत पेपरही संपवू.. होऊन जाईल एकात एक.. आईची एकसष्ट पूर्ण झाली.. विधीबिधीवर विश्वास नाही पण सगळ्यांना बोलवायला हवंय एकदा....गेट टुगेदर.. रविवार बघून एकदाच एकत्र..बाहेरच कुठेतरी थाळी घालू सगळ्यांना..थाळी म्हणजे फिक्स बिल.. नव्या फ्लॅटची पार्टी, गाडीचीही मागताहेत साले कधीचे... आणि एकसष्टीपण..

मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा.

लेखक कोल्हापुरवाले यांनी बुधवार, 29/02/2012 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा. दोन ऑप्शन आहेत १ . Sony Cybershot DSC-H70 Point & Shoot . ( किंमत ९८०० ) २. Nikon Coolpix L120 Point & Shoot ( किंमत १३,५३२ ) या दोन्ही पैकी कोणता घ्यावा? फोटोग्राफी करणारे जे कोणी मीपा आहेत आणि ज्यांना खरच काही फोटोग्राफी बद्दल कळत त्यांनी कृपया सल्ला द्यावा. किमती मधील फरक सांगू नये .. :) खूप कन्फ्युज राव..... सल्याची नितांत गरज !!!

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

पंचायतसमीती.....

लेखक भीमाईचा पिपळ्या. यांनी शुक्रवार, 10/02/2012 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वर्षी आमचा गण महीला राखीव झाला. भल्याभल्यांची तारांबळ उडाली. मागच्या पंचवार्षीकला आम्हाला जनतेने विजयी कौल दिला नव्हता. यावेळेस सौ.ला उमेदवारी मिळाली. प्रचारासाठी अधिकृत दिवस फक्त पाच. १ते५ फेब्रु. अनेक युक्त्या क्लृप्त्यानि प्रचार केला. अनेक ठक बेटले. एकेक अनुभव शेअर करण्यासारखा आहे. त्यातला एक. वडगावची प्रचार सभा आटोपून पुढच्या प्रचारसभेला निघालोच होतो तर गववाला गपक्कन गाडीत घुसला. हे प्रकार होतच असतात. त्यामुळे विषेष काही वाटले नाही. माह्याकडं १० मतं हायेत..... ते आपुन सांगु तेच करणार......... तुम्ही काळजी करु नका.....

मी ?? म्हातारा ???

लेखक गवि यांनी मंगळवार, 31/01/2012 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली. का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्‍याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे.. "मी.. ?? म्हातारा ???" ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे.. ........................ मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध.. जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो.

!! श्रद्धांजली !!

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 25/01/2012 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुण्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली..... संतोष माने नावाच्या एका माथेफिरू S.T महामंडळाच्या कर्मचाऱ्याने बिचाऱ्या ९ माणसांना कारण नसताना चिरडले आणि कित्येक लोकांना जखमी केले.. याच्यावर काय लिहावे तेच कळत नाही....डोके बधीर आणि सुन्न झाले आहे. या घटनेत मृत पावलेल्या सर्व नागरिकांना !! श्रद्धांजली !!

विनोबा भावे-अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत अध्यात्मातील वन लायनर्

लेखक कापूसकोन्ड्या यांनी सोमवार, 16/01/2012 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या आठवड्याच्या सुट्टीत इंटरेनेटवर लक्ष्मीबाई टिळक आणि प्रभाकर माचवे यांचे काही लिखाण शोधत असताना, अचानक हाती घबाड सापडले. ओस्मानिया विद्यापीठ च्या साईटवर बरीच मराठी पुस्तके डिजिटल स्वरूपात ठेवली आहेत. त्यात माझ्या आवडीच्या लेखकांपैकी विनोबा भावे यांचा १९४६ सालात प्रसिद्ध झालेला विचारपोथी नावाचा एक ग्रंथ सापडला. पुस्तक प्रथम अधाशासारखे उतरवून घेतले. स्कॅन करून पिडिएफ केलेले असल्यामुळे समोर ठेवून स्वत: टंकलेखन केलेले आहे.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

लेखक यकु यांनी सोमवार, 16/01/2012 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४ सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला. झपाट्याने पुढे गेलो. मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.