Skip to main content

प्रतिसाद

कर्मविपाक - एक प्रयत्न

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 03/05/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे वर बराच काथ्याकूट चालू आहे. म्हटल आपण पण एक जिलबी पाडावी. जमलीय का नाही ते सांगायला मोठे आहेतच... पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे माणसाला पहिल्यापसून भुरळ पाडणारे विषय आहेत. असंख्य लोकांनी त्यावर बरेच काही लिहून ठेवले आहे, त्यावर मी अणखीन लिहिणे म्हणजे.. उपनिषदांत एका शब्दात सांगितले आहे - तत्त्वमसि| ते समजायला कठीण जाऊ लागले म्हणून श्रीक्रुष्णांनी गीता संगितली. तेही कठीण जाऊ लागले म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. आता तेही कठीण जाऊ लागले म्हणून आता ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात :) असो.

एक सिगारेट पिणारी मुलगी

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 28/04/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी.. ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत.. वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच.

अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल

लेखक साळसकर यांनी रविवार, 21/04/2013 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंड्याने तिसर्‍यांदा पलटून पाहिले. अन खात्री केली की ती पुतळाबाईच आहे. फसलोच जरा, पण अंड्याची फसायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बरेचदा असे होते ना, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरताना, कृत्रिम चेहर्‍यांच्या गर्दीमध्ये, एखादा टवटवीत चेहरा उठून दिसावा. आपला चेहरा हरखून यावा, पण निरखून पाहता तो कपड्यांचे प्रदर्शन मांडण्याकरता उभारलेला मानवी पुतळा निघावा.

We are not here to make friends ... खरंच ?

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 15/04/2013 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही.... माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत नाही, मला ते तितकेसे आवडत नाही.... तसेच आपण काम करत असलेल्या जागेबद्दल आणि तिथे घडत असलेल्या घटनांबद्दल ब्लॊगवर लिहणे हे ही मला तितकेसे योग्य वाटत नाही.... पण आज थोडंसं हे सर्व बाजुला ठेऊन ४ शब्द लिहावेसे वाटत आहेत. सध्या तसं पाहता आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ कुठे जात असेल तर ऑफ़िसात. दिवसातले जागेपणातले महत्वाचे निदान ९-१० तास तरी आपण ऑफ़िसात असतो. इथे मग अनेक लोकांशी आपला संबंध येतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 14/04/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्वतंत्र भारताला वेगळे वळण देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. लाखो लोक या लोकोत्तर नेत्याला दैवत मानतात. या महापुरुषाला नम्र अभिवादन. गांधीजी नंतर आपल्या इतिहासावर एवढा परिणाम करणारा नेता अजुन दुसरा कुठला नसेल. या महापुरुषाला माझी आदरांजली

सोत्रींचा दारूवरचा लेख आणि मी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/03/2013 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवारी मिसळपाववरचा सोत्रींचा दारूवरचा लेख वाचला. दारू म्हणजे काय या हे समजवून देणे काही सोपे काम नाही. ते दारू पिण्याइतकेच महत्त्वाचे आणि अवघड काम सोत्रीसारख्या माणसाने खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आजकाल लिहीणे सोपे झाल्याने जो तो आपआपले अनूभव लिहीत बसतो. कुणी किल्यावर भटकंतीचे लेख लिहीतो, कुणी वेगवेगळे पदार्थ कसे करायचे ते सांगतो. हे असले अनुभव वाचल्यामुळे इतरांना किती त्रास होत असतो याची लिहीणार्‍याला काय कल्पना? लगोलग दारूवरचे सगळे लेख वाचून काढले.

२६/११ - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 04/03/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम गोपाल वर्माचा २६/११ सिनेमा पाहिला .. - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य आहे हे ! अनेक मित्रांनि ' देश्भक्तांनि - उदा कडवे हिंदु वगैरे लोकांनी ' फोन करून हा सिनेमा पहायला जा म्हणुन कळवल होत. d उत्सुकतेने पहायला गेलो . उजव्या - भगव्या लोकांना आवडणारे सिनेमे असतात तरी कसे हे बघायचं होत. १) तांत्रिकता : उत्तम . साउंड - लाईट - केमेरा - तंत्र - एडिटिग वगैरे फार छान. या तंत्रामुळ हत्याकांडाचे प्रसंग ..

तीन डझन सूक्ष्मकथा : एक लक्षवेधक , रंजक लेखनप्रकार

लेखक मन यांनी रविवार, 03/03/2013 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या एका संकेतस्थळावर एका वेगळ्याच लेखनप्रकाराबद्दल वाचायला मिळालं. कमीत कमी शब्दांत एखादी गोष्ट सांगून जाण्याच्या एका लेखनप्रकाराबद्दल. त्याचं एक क्लासिकल उदाहरण दिलं जातं ते म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे ह्यानं केवळ सहा शब्दांत लिहिलेली एक कथा:- "For sale, Baby Shoes, Never Worn." . . म्हटलं आपणही असं काही लिहून पाहुयात. ह्यात थीम एकच; प्रत्येक वाक्याच्या मागं काहीतरी एक अध्याहृत घटना, कथा हवी. ती एका वाक्यावरून लागलिच डोळ्यासमोर यावी.

आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 19/02/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.

हार्मोनिका- नवा छंद..

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 08/02/2013 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून हार्मोनिका- अर्थात माऊथ ऑर्गन वाजवण्यात रस आलाय. त्यासाठी क्लास वगैरे न लावता आंतरजालावर युट्युब वरून काही व्हिडिओज बघून मोडकंतोडकं शिक्षण चाललंय. सध्या "तुझसे नाराज नही जिंदगी, है अपना दिल तो आवारा, ये दोस्ती हम नही तोडेंगे, छुकर मेरे मन को" इ सोपी गाणी जमायला लागलीयेत. आता थोडं पुढं सरकावं म्हणतोय. इकडे मिपा वर बरेच जुणे जाणते हार्मोनिकाकर असतीलच. त्यांच्याकडून थोडीफार मदत मिळेल काय?