Skip to main content

प्रतिसाद

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 14/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

जळ.लि..

लेखक गवि यांनी सोमवार, 07/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचं लिखाण मिळमिळीत आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या लिखाणाला वरणभाताची उपमा कधी मिळाली आहे का? तुमच्या शब्दांची तुलना वपु काळेंच्या लेखनाशी केली गेली आहे का? तुमच्या लेखनात ज्वलंत अनुभवविश्व नाही अशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली आहे का? तुमचं लिखाण वाचून तुम्हाला कोणी मिडिऑकर, कार्कुंडा, किंवा एसी केबिनमधे बसून कल्पनेचे मनोरे रचणारा अशी दूषणं दिली आहेत का? वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर "लाजयुक्त हो" असं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. पुढे वाचा.

काळी पिवळी..

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 24/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशितः मनोगत दिवाळी अंक २०१२) ’सरदारजी, उजवी कडे वळा आणि बरोब्बर दोन बिल्डिंगच्या मधोमध थांबवा!’ मग टॅक्सी चाळीच्या कायमस्वरुपी सताड उघड्या असलेल्या फाटकातुन आंत शिरायची आणि मी वडीलांच्या हातातुन रुपयाची नोट सरदारजींच्या पुढे करायचो. दचकु नका, ही ६० च्या दशकातली गोष्ट आहे. त्या काळी स्कूटर पेट्रोल पंपावर गेली तर टाकी भरुन झाल्यावर पांचाची नोट देता सुटे पैसे परत येत असत. अर्थातच टॅक्सीचे किमान भाडे तेव्हा एक रुपया होते, कदाचित ८० पैसेसुद्धा असेल. ठाण्यात टॅक्सी हा प्रकार केवळ भिवंडीच्या समाईक फेरीपुरता, शहरात फिरण्यासाठी नाही.

खुणावणारे ते यश शेवटी मृगजळच ठरले

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 23/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कडाक्याच्या थंडीतही सत्तर वर्षाची, अंगावर सुरकुत्या पडलेली आजी मंदिराच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या अनेक वर्षापासून ती नियमितपणे मंदिरात येत होती पण आज मात्र काठी सावरताना तिचे हात थरथरत होते, पायात एक विलक्षण असा शिणवटा आला होता. 'जन्म हि निसर्गाने दिलेली देणगी आहे. आयुष्याचे इप्सित ध्येय साध्य झाले कि त्या दिवसाची आठवण म्हणून वाढदिवस साजरा करावा' अशी तिची ठाम समजूत होती. ती आपल्या यशोशिखराच्या अगदी पायथ्याशी उभी होती व ईश्वराने साथ दिलीच तर आज ती आपला पहिला वाढदिवस साजरा करणार होती.

'कट्टा... On The Rocks': संक्रमणावस्थेतील पिढीचा आत्मशोध

लेखक रमताराम यांनी रविवार, 23/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
'कट्टा' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका.कधी चहाची टपरी नसेल तर कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोल च्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशी पासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा.

चावडीवरच्या गप्पा - बळीराजा आणि रामगिरी

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 11/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत. “आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण

... देवाशी भांडण !

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 19/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
ओ माय गॉड अर्थात देवाशी भांडण एवढ्यातच 'ओह माय गॉड' पाहीला. मिसळीवरही खूप चर्चा झालेला हा चित्रपट आहे. एकाने त्याची गोष्ट मांडली आहे तर दुसर्‍याने त्या चित्रपटाच्या विषयावर लिखाण केले आहे. चर्चेला विषय मिळवून देणारा हा चित्रपट आहे हे नक्की. वरकरणी हा चित्रपट काही वेगळ्या विषयाला हात घालणारा, भाष्य करणारा वाटत असला तरी हा विषय नवा नाही. चावून चोथा झालेला हा विषय आहे त्यामुळे पिळून काढलेल्या चिपाडातून रस काढण्याचा हा प्रयत्न वाटतो. टिळेमाळा, ढोंग, बकध्यान, बुवाबाजी हे शब्द भाषेत अस्तित्वात येऊन कित्येक वर्षे होऊन गेली आहेत. विमलदांच्या 'परख' सारख्या चित्रपटातदेखील थोड्या प्रमाणात हा विषय

त्याचीच.. अटॅचमेंट (नवी बाजू).

लेखक इनिगोय यांनी गुरुवार, 01/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतून राहणं चांगलं की गुंतल्यानंतरही वेळ येईल तेव्हा शांतपणे विलग होणं चांगलं यावर जे बोलणं झालं त्यातून त्याची डिटॅचमेंट हे प्रकटन याआधी लिहिलं गेलं. निसर्ग हा इतका जिवंत, इतका व्हर्सटाईल आहे, की प्रत्येकाला तो वेगळा दिसतो, नवं काही देतो. लेखावर आलेल्या प्रतिसादांमधूनही हेच जाणवलं. अनेकांनी त्यांना जाणवलेल्या - पटलेल्या आणि न पटलेल्या - गोष्टी तिथे मांडल्या. ही मूळ चर्चा ज्यांच्याशी झाली, त्यांनाही तो जसा जाणवला तसा..

शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 31/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.

मिसळपाव.

लेखक गवि यांनी गुरुवार, 30/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
3