Skip to main content

प्रतिक्रिया

गमभन ०८.०२.२० आवृत्ती प्रकाशित..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 24/02/2008 18:27 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,


आपल्याला सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव डॉट कॉमच्या अक्षर-सामर्थ्यदात्याने, म्हणजेच गमभन ने आता कात टाकली असून त्याची पुढील आवृत्ती 'गमभन ०८.०२.२०' ही आता प्रकाशित झाली आहे आणि मिसळपावला जोडली गेली आहे!

अभिनयक्षमता

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 22/02/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.

लहान मुले आपले म्हणणे खरे करून दाखवतातच, त्यांना बरोब्बर पालकांना कसे गुंडाळायचे ते माहित असते....

विशेषत: TV वर त्यांचा आवडता कार्यक्रम असेल तर कोणाची काय बिशाद दुसरा कार्यक्रम / दुसरी वाहिनी लावायची...

"कसं जगायचं , कसं वागायचं ? कुणी सांगेल का मला ?????

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 21/02/2008 22:59 या दिवशी प्रकाशित केले.

"प्रशांत दामलेंच " एक मस्त गाणं आहे बघा
"कसं जगायचं , कसं वागायचं ?
कोणी सांगेल का मला ? "

अशीच माझी अवस्था झाले आहे आज. का म्हणून काय विचारता ? सांगतो ..........

शाळेतील गमती जमती

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 21/02/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.

शाळेतील गमती जमती....
यामध्ये आपण शाळेत केलेल्या गमती किंवा स्वतःवर ओढवलेले विनोदी/आठवणीत राहिलेले असे प्रसंग लिहावेत.
तसेच लक्षात राहिलेले शि़क्षक/ शिक्षिका.....

यावर एक मेल द्वारे आलेली कविता

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय............. मला पुन्हा एकदा तरी शाळेत
जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 12/02/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.

"अभिजीत" ने छेडलेल्या "तसल्या नजरा" व त्याला पडलेले अनेक प्रतिसाद याच्या अनुषंगाने हा लेख.
मला आलेल्या " विरोपाचे " स्वैर मराठी भाषांतर ......... [ हे मी लिहलेले नाही ..]

व्हेलेंटाईन्स डे...२

लेखक प्राजु यांनी रविवार, 10/02/2008 01:23 या दिवशी प्रकाशित केले.

पहिल्या भागात पान उलटावे लागत असल्यामुळे इथे सुरू करत आहे. आपण सगळ्यांनी पुन्हा भरभरून लिहावे हीच विनंती..

तुझ्या डोळ्यांतल्या नभी
माझे स्वच्छंदी विहरणे
निळ्या मेघात दाटूनी
सरीतूनी बरसणे..

- प्राजु

शेजारचे जातियवाद व राजकारण

लेखक सतीश वळीव यांनी शनिवार, 09/02/2008 01:44 या दिवशी प्रकाशित केले.

सध्याच्या युगात जातियवाद व राजकारण आजुनही ज्वलंत समस्या आहे. मी ऐक मध्यम वर्गीय नोकरधार असुन प्रामाणिक व सरळ साधा व दुसर्‍यास उपयोगी पडनारी व्यक्ती आहे. मी मागासवर्गीय असुन शेजारच्या स्त्रीया आमच्या स्त्रीयांच्या बरोबर अंतकरनापासुन व्यवस्तीत वागत नाहीत. हे जहाले स्त्रीयांचे. पुरषांचे कही कमी नाही. इतर कोनत्याही गोष्टीत आडकाठी घालुन आम्हाला खाली खेचतात. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे.

कुठली खिडकी? कितवा मजला?

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 08/02/2008 08:32 या दिवशी प्रकाशित केले.

कुठली खिडकी? कितवा मजला?

निळ्या पांढर्‍या भिंती दिसल्या
बावरलेल्या नजरा वळल्या
शब्दांनीही खाटा धरल्या
प्रश्न तेवढा एक राहिला
कुठली खिडकी? कितवा मजला?

मित्र,सोयरे सगळे जमले
नव्या घरी येताना दिसले
बंद लिफ्ट पाहून म्हणाले
किती पायर्‍या चढावयाला?
कुठली खिडकी? कितवा मजला?

मध्यरात्रीचा प्रहर नेमका
हेरून गेलो तसा बेरका
व्यवहारी मी मदन नेटका
पैसे मोजत खांद्यावरती हात टाकला
कुठली खिडकी? कितवा मजला?

तूच आहेस तुझ्या र्‍हासाचा शिल्पकार

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 06/02/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार,

कृपया ही बातमी वाचा.

आपल्याला काय वाटते?

इच्छुकांनी या संदर्भात कृपया येथे चर्चा करावी असा मानस आहे..