अंधार
खूपशा अंधार्या रात्री आणि दिवस सरत चालले आहेत. जीवघेणा अंधार व्यापून रहावा सगळीकडे असं वातावरण. प्रकाशाला घुसमट व्हावी आत शिरताना असे काळोखे कोपरे. जिथे मनाला जखम झाली ना तरी जखमेतून बाहेर पडतो आरक्त अंधार.
हळू हळू नशा चढत जाते अंधाराची. उजेड धडका देत राहतो दाराखिडक्यांवर. एखाद्या चुकार फटीतून आलाच उजेड आत अंधाराशी लढाई जिंकून तरी मी सज्ज असतेच गडद काळं ठिगळ घेऊन. फटीला खिळा मारला की मग तगमग कमी होते. मग मी अशीच ठिगळं लावत फिरते घरभर, उजेडाची प्रत्येक शक्यता बंद करत.
अंधार धमन्यांमधे वाहतो. श्वास उच्छवास अंधाराचेच होतात आणि मग मनातला सैतान छद्मीपणे हसत राहतो माझ्या धडपडीवर.
मिसळपाव
आज सकाळी नेहमीप्रमाणेच मोकळा असल्याने शनिवारी अर्धवट राहिलेला Fast Five हा चित्रपट पाहून संपवला.