आम्ही ट्रेकींग करतो ( म्हणे ) !
" मी या दगडांवरुन आजीबात येणार नाही आधीच सांगुन ठेवतो" आपल्या चिरकलेल्या आवाजात संज्याने डरकाळी फ़ोडली.
" तु पक्का डरपोक रे लेकाचा, इथे काय हिमालय चढतोय का आपण?" रव्याने त्याच्या काळी पाच मधल्या आवाजात संज्याला सुनावले.
" नालायका, हलकटा झालच तर मेंदुलेस माणसा या निसरड्या दगडावरुन डोंगर चढण्याला तु ट्रेकींग म्हणतोस?" संज्या बिथरला.
" मग काय मुंबई पुणे रेल्वेट्रॅकवरुन चालण्याला ट्रेकिंग म्हणतात?"
"ए, बास करा यार! आपण इथे ट्रेकींगला आलोय की भांडायला? तु गप रे संज्या.
मिसळपाव
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या.