Skip to main content

प्रतिभा

राँग नंबर

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 19/05/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे! मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो! सगळा ग्रुप जमला होता. मग खूप धमाल केली होती. अशाच एका क्षणी हसता हसता त्याने अचानक तिला I love you म्हटलं होतं. त्याचं सगळंच धक्कादायक आणि अनपेक्षित. कधी काय करेल याचा नेम नाही. हीच spontaneity तिला भावली होती. आणि ती काय लाजली होती!

अडगळ

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 03/05/2016 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
'मोहरा' पिच्चर आणला तवाची गोष्ट. मोकळं मैदान गाठून, शंकराच्या दगडी देवळाच्या बाजूला टेबल मांडून, त्यावर टिवी ठेऊन पिच्चर दाखवायची व्यवस्था केली ती दाद्यानं. हा दाद्या उधळ्या माणूस. एक म्हणता तीन तीन पिच्चर आणणारा. गणपतीची वर्गणी पुरली नाय तर स्वताचे शे-पाचशे घालून हौसमौज करणारा. तर त्या दिवशी त्यानं ग्यांगला सरप्राइज म्हणून एक दोन बीपी ची पण कॅसेटं आणलेली. रात्री ऐश करायची म्हणून गावठी दारुपण त्यानं तयार ठेवली होती. तर अशी सगळी व्यवस्था करुन दाद्या गुटख्याच्या पुड्या फोडत व्हीसीआर वर चित्र आणण्याची खटपट करणाऱ्या पोरांना उगाचच आयबहीनीवरनं शिव्या घालत होता.

खुरटी झुडपं

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 25/04/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
एका अवाढव्य शिळेला टेकून जरावेळ बसलो. त्याची तिरपी सावली अंगावर पडली. रखरखत्या आयुष्यात ओलावा दाटला. मग भरुन घेतली माती ओंजळीत, अन उधळून दिली आभाळात. थोडी डोळ्यात पण घुसली. मग झोळीनंच तोंड पुसलं अन उभारलो ठार वेड्यासारखा. पाठीत उसण भरली. गडद वीज खोल आभाळात जाऊन चमकली. ऐन दुपारी डोळ्यापुढं अंधारी आली. जीव घामाघुम झाला. एक पाय वाकवून हाडं मोडली तेव्हा कुठं उभारी आली. मग झोळी पाठीवर टाकून चालायला लागलो. त्या हिरव्या सपाट मैदानावर म्हटलं तर गवत तसं फारसं नव्हतं. खुरटी झुडपं मात्र बक्कळ. दूरवरचे डोंगरमाथे आभाळाला भिडणारे. उतारावरुन खाली घसरत गेलेल्या नागमोडी पायवाटा.

मरण!

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 25/04/2016 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

मैथिली

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 19/04/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं. हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिऊन टाकलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं. " हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच. "कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय? तेवढ्यात झुडपात झोपलेली रानडुक्करीण जागी झाली.

ढेकळे

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 17/04/2016 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुलछबू रातीचा गाभारा भादवातल्या कुत्र्यासारखा लवलवत होता. गोठ्याच्या शेजारी थोडी जागा करुन गजड्या त्यावर झोपला होता. वारा कितीही थंडगार वाहत असला तरी तो आतुन धुसमुसत होता. पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखा तो तडफडत या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होता. आजची रात त्याला बोडक्या बाईच्या अंधाऱ्या खोलीसारखी भकास वाटत होती. जिच्या नैराश्याचे भाले त्याच्या शरीरात भळ्ळकन घुसले होते. वर्षानुवर्षे उभा असलेला एखादा वटवृक्ष एखाद्या जोरदार वादळात उन्मळून पडावा तसा तो अशक्त होऊन अंधरुणावर पडला होता. डोक्यात ना ना विचांरांची शकले चौफेर उधळली गेली आणि तो उठून बसला.

सांधीकोपरं

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 14/04/2016 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
बाई मरुन गेली. अन घराचं सांधीकोपरं काळवंडलं. मधल्या वाश्याच्या खोबणीत एका भुंग्यानं साम्राज्य थाटलं. लाकडाची भुकटी करुन मग आत खोलवर पसरवलं. खालच्या आड्याला काळ्या कातळाचं गठळं साचलं. सुर्य सकाळी उगवायचा अन पारुश्या घरात येऊन तापायचा. त्याच्या रोगट उन्हाचा सडा छपरा-भिंतीवर पडायचा. म्हातारी आपलं भुंडं केस विचरत ओट्यावर बसून राहायची. खुडूक कोंबडी सारखी. उघड्या दरवाज्यातनं गांधीलमाशी आत यायची अन वळचणीला जाऊन भिरभिरायची. दिवळीच्या आत तिनं पण भोकं भोकं करुन ठेवलेली. त्यात जाऊन लपायची. एकदा कोळ्याच्या जाळ्यात सापडली अन मरुन गेली. मागे भोकाभोकातली अंडीपिल्ली ठेवून तशीच गेली.

सूक्ष्मकथा : जंगल

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 07/04/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
वाघाने डरकाळी फोडली. माकड झाडावर चढले. शेंड्यावर लपून अद्भुत हसले. अन तिथूनच घेतली उडी. खालच्या फांदीवर. वाघ झाडाखाली आला. जिभल्या चाटत पाणी पिला. अन घेतला एक सूर. पाणवठ्यात. ऊन तापले. पाणवठ्याच्या अवतीभवती गिधाडे. सूक्ष्मजंतूंचा नायनाट.अन पाण्यातला वाघ गारगार. कुठून आलं एक हरिण. बिथरुन बसलं काठावर. अन सुसाट पळालं माघारी. सैरावैरा. वाघाने जलक्रिडा केली. मग आला काठावर. अन झाडून अंग फोडली एक डरकाळी. भयचकीत. माकड पुन्हा शेंड्यावर. गिधाडे उडाली आकाशी. अन जंगलातली हरणे हिरव्या कुरणावर. सुसाट पळाली. वाघ जंगलात निघून गेला. पाणवठ्यावर गर्दी.

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 07/04/2016 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :( हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले! शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :( बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना! म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण!

सूक्ष्मकथा : गणपती

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 06/04/2016 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
हालगीच्या तडतडीत, ढोल ताश्यांच्या रणधुमाळीत, माणसांच्या गर्दीत, धुळीत, चेंगराचेंगरीत गडबडून गेलेला अगडबंब गणपती माझ्याकडे बघून वैतागत म्हणाला, "अरे आवाच वाढव डिजे तुझ्या आयची.... तुला आयची शपत हाय.." अन मोदक कुरतडताना एक घास माझ्या घशातच अडकला.