Skip to main content

प्रतिभा

Mission भगीरथ

लेखक आदित्य अनिल रुईकर यांनी शनिवार, 27/02/2016 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी Advocate आदित्य रुईकर. मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली. त्यादृष्टीने प्रकाशकांशी बोलणे, करार इत्यादी सुरूच आहे. पण प्रत्यक्ष कादंबरी छापून विक्रीस येण्यास थोडा अवधी लागणार आहे.

निखारा

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 19/02/2016 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधीमधी पाऊस यायचा. मग जरा अडचणच व्हायची. लाकडं पेटत नसायची. पत्र्याचं शेडपण गळकं. वाऱ्याच्या झोतानं पाऊस आत यायचा आन पाण्याचा फवारा शिपडून जायचा. येवढी मेहनत करुन पेटवलेली लाकडं मग विझायची. राकेलचा आख्खा ड्रम मग उपडा करावा लागायचा. रातभर तसंच बसून राहावं लागायचं. पाऊस उघडला की मग पुन्हा सुकी लाकडं आणून पेटावायला लागायची. रात गेली तरी चालंल पण मढं समदं जळलं पाहीजे. त्याशिवाय सुट्टी न्हाय. थंडीवाऱ्यानं हाडं खिळखीळ करायची. मग गांज्या मारावा लागायच्या. त्याच्या नशेत सगळं स्मशान डोक्यात घुमत राहायचं. अनंतकाळ. येरवाळी बरं असायचं. राती नऊ-दहालाच सराण पेटवून देऊन खोपट्यात निवांत पडायला मिळायचं.

प्रेम !!! ???

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 15/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण! आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो. मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. तसे सरधोपट कथानक! किशोरवयीन फ्लोरेन्तिनो फार्मिनाच्या प्रेमात पडतो. बिचारा गरीब असतो.पण त्याचे प्रेम भारी असते.

दिल से सलूट....

लेखक dipak bhutekar यांनी रविवार, 14/02/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

सोबत

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 29/01/2016 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
[शतशब्द कथांबद्दल एक धागा दिसला. आपणही प्रयत्न करावा असं वाटलं. अर्थात ते मला जमलं नाही पण त्या प्रयत्नात ही कथा जमेल तितकी छोटी ठेवली आहे. अधिक काट-छाट करणे ठीक वाटले नाही , तेव्हा ३३४ (मायक्रोसॉप्फ्ट वर्डनुसार) शब्दांची ही कथा खास मिपाकरांसाठी] रात्री बाराच्या सुमारास विमानतळावरुन नीता बाहेर आली. राजेश नक्की येणारच याची तिला खात्री होतीच त्यामुळे तिने पर्स मधून फोन बाहेर काढला नाही. नऊ वाजता "फ्लाईट उशिराने आहे" हे सांगायला तिने त्याला फोन केला होता तेव्हा त्याच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता , शिवाय त्याचं डोकंही दुखत होतं. आपल्या प्रिय नवर्‍याला आपण त्रास देत आहोत असं तिला वाटून गेलं.

वेटोळे (लघुकथा)

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 25/01/2016 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
तर मी एकदा असाच चालत होतो, भटकत होतो, दगडधोंडे तुडवत, पायवाट मळवत, तहानभुक भागवत, ऊन्हा-पावसाला भिजवत, अंधाराला कवटाळत, जगत होतो. माझ्या कपाळी अपयशाचा टिळा लावला होता. प्रश्न जगण्याचा होता. जगुन जगुन थकण्याचा होता. गुडघे घासून मरण्याचा होता. तो प्रश्न घेऊन मी आत जंगलात खोलवर गेलो. उंच टेकाडं चढून पाहीली. दलदलीत चिखल माखून घेतला. काटेरी गवतात झोपुन गेलो. झऱ्याच्या पाण्यात गारठून गेलो.

ऑपरेशन भाग 4

लेखक समीर१२३४५६ यांनी शनिवार, 16/01/2016 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 3 वरुन पुढे- अश्विनला व श्‍वेताला खरे कारण माहित असते,त्‍यामुळे ते त्‍याला दोषी मानत नसतात. अश्विन व श्‍वेता रोहितला समजावतात, की त्‍याची काहीच चुक नाहीये, त्‍याने हे सर्व संजयच्‍या दबावाखाली येऊन केलेले आहे, परंतू सर्व व्‍यर्थ. रोहित आता कसातरी वागत होता, मनाला येईल ते तो करु लागला होता. अलिकडे तर तो दारुही पित असायचा. दुसरीकडे अश्विन रोहितच्‍या अचानक कुठेतरी निघून जाण्‍याने चिंतेत होता, आणि तो सारखा रोहितला फोन लावत होता, परंतू रोहितचा फोन लागत नव्‍ह‍ता.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

ऑपरेशन भाग 3

लेखक समीर१२३४५६ यांनी बुधवार, 06/01/2016 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 2 वरुन पुढे- रोहित संजयकडून सत्‍य जाणण्‍याचा प्रयत्‍न करत असतो, परंतू संजय त्‍याला काहीही सांगायला तयार होत नसतो,त्‍यामुळे तर रोहितचा संशय अधिकच बळावलेला असतो. काही दिवसांनी शवविच्‍छेदन अहवाल पाठवला जातो,त्‍यात संजयच्‍या भावाला विष दिल्‍याचे निदान झालेले असते. रोहितला खात्री पटते, की यात संजयचा काहीतरी कावा आहे, काही दिवसांनी संजय व त्‍याचा एक साथीदार येऊन रोहितला शवविच्‍छेदन अहवाल बदलण्‍याची धमकी देऊन जातात. रोहित त्‍यांचे ऐकायला तयार होत नाही, तेव्‍हा संजय रोहितला त्‍याच्‍या पत्‍नी व मुलाला ठार करण्‍याची धमकी देऊन जातो.

ऑपरेशन भाग 2

लेखक समीर१२३४५६ यांनी शनिवार, 02/01/2016 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 वरुन पुढे- सर्वांनी रोहितची समस्‍या जाणून घेण्‍याचा बराच प्रयत्‍न केला. ब-याच जणांना असे वाटायचे, की श्‍वेताच्‍या बेताल वागण्‍याने तो चिडचिड करतोय, तर काहींच्‍या मते दुसरे कोणते कारण होते. रोहितच्‍या सिनीअर मि.अंकोलानी त्‍याला विश्‍वासात घेऊन त्‍याची समस्‍या जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला होता. रोहितला आपल्‍या वैदयकिय पेशामुळे स्‍वतःच्‍या खाजगी आयुष्‍याकडे लक्ष देता येत नव्‍हते. तशातच मि.अंकोलानी त्‍याची पगारवाढीची मागणीही धुडकावून लावली होती, त्‍यामुळे तर तो अधिकच चिंतित असायचा. रोहित अश्विनची मात्र जिवापाड काळजी घेत असायचा, तोच त्‍याच्‍या जगण्‍याचा आधार होता.