गोरखधंदा
"शूक.. शूक.." गल्लीतून आवाज आला.
आपण तशी डेरींग कधी केली नाय. पण या झ्याट जिंदगीत बाकी ठेवलंय तरी काय. आपण या घोळक्याला उभा कोलतो.
पोरसवदा उभारलेली एकटी दिसली. मग तिच्यासमोर जाऊन खिशात हात घालून उभारलो. सालं आपलं काळीजसुद्धा किती बेभरवसा धडाकतं.
"बैठना है?" असं तिनं विचारलं. सरळसोट. मनानं ती किती नागडी आहे हे एका झटक्यात समजलं.
"कितना?" सौदा हा असाच होत असावा. आता जरा धीर आला होता.
"सौ रुपय.."
तू मागितलं आणि मी दिलं. एवढं सोप्प वाटलं का हे?
"पचास दूंगा.."
"चलेगा.." पापणीही न लवता तिनं धडक उत्तर दिलं.
"फुल ओपन चाहीये.." तिला नक्की मी काय म्हणतोय ते समजलं नसावं.
मिसळपाव