शिवमानसपूजा - आदि शंकराचार्य!
नुकतेच एक स्तोत्र ऐकण्यात आले. त्याची गेयता, नादमधुरता, त्यातल्या रमणीय कल्पना ऐकून ते आदि शंकराचार्यांचे असावे असा अंदाज बांधला, तो खरा निघाला.
त्यांचेच हे स्तोत्र 'शिवमानसपूजा' ह्या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्ष खरोखरीच पूजा करणे जरी शक्य नसेल तरी ह्या स्तोत्राच्या पठणाने खर्या पूजेचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे.
तो भाग जरी क्षणभर सोडून दिला तरी ऐकताक्षणीच मनाचा कबजा घेणारे हे सुंदर संस्कृत स्तोत्र मराठीत अनुवादित करायचेच असा चंग बांधला. माझा संस्कृतचा अभ्यास वगैरे नाही अंदाजाने अर्थ लागू शकतो इतपतच समजते.
मिसळपाव