Skip to main content

"चूल बंद की अक्कल बंद "

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2019 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वाची गोष्ट आहे सायंकाळचा समय होता मी व हिने चितळ्यांच्या दुकानात खरेदी केली चितळे दुकाना समोर नूर भाई भाजीवाल्याचा ठेला आहे नुरभाई भाजी वाल्याकडून भाजी घेतली जवळच रिक्षा होती रिक्षा केली व घरी यायला निघालो वेळ संध्याकाळची डेक्कन वर मरणाची गर्दी लकडी पूल सिग्नल ला रीक्षा थांबली होती तेव्हढ्यात मोग-याचे गजरे विकणारी मुले रिक्षा जवळ आली मोग-याचे गजरे म्हणजे जीव कि प्राण कसे दिले ? १० ला एक ४० ला ६ दे -हि म्हणाली ५ देईन -गजरे वाला मुलगा ठीक आहे दे -त्याने ५ गजरे हिच्या कडे दिले हिने गजरे सुंगले व माझ्याकडे दिले अन पैसे देण्यासाठी पर्स मध्ये हात घातला तेव्हढ्यात सिग्नल सुटला व रिक्ष

जमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने

लेखक सुनिल प्रसादे यांनी सोमवार, 15/07/2019 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
तिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण दोन जुलैला रात्री साडेनऊ वाजता फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ह्या अदृश्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. पाठोपाठ तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. काही प्रतिक्षिप्त घोषणादेखील ताबडतोब झाल्या.

डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल - भाग 4

लेखक nishapari यांनी सोमवार, 15/07/2019 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619 भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807 भाग 3 - https://www.misalpav.com/node/44821 सुपरनॅचरल मालिकेचे काही एपिसोड खूप विनोदीसुद्धा आहेत.... आणि खरं म्हणजे भीती वाटण्यासारखी नाहीये मालिका ... पात्रांचे आपापसातले संबंध ह्या गोष्टीवर जास्त जोर दिला आहे .. दोन भावांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी , प्रेम हे जास्त हायलाईट केलं आहे ...

कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू

लेखक बाप्पू यांनी शनिवार, 13/07/2019 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल.. पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी.. मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल??

माझे जिम चे प्रयोग ... जिम मधली गाणी (भाग २)

लेखक अमर विश्वास यांनी शनिवार, 13/07/2019 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
जिम मधली गाणी एपिसोड #३ रोजच्या प्रमाणे सकाळी उठून जिम मध्ये धडकलो ... (विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही च्या चालीवर ) आज स्पिंनिंग चा दिवस ... सायकल ऍडजस्ट करून "वॉर्म अप" ला सुरवात केली. हळू हळू गाण्यांनी जोर पकडला आणि त्याचबरोबर आमच्या पॅडलिंगने ही आणि .. अचानक ते गाणे आले ... आजा डूब जाऊं तेरे आंखों के ओशनमें... स्लो मोशन में... अहाहा .. काय ती शायरी ... शब्द ऐकून मी अडखळोच ... ओशन मध्ये गटांगळ्या खातोय असा फील आला .. पायांची हालचाल स्लोमोशन झाली ... ह्या अवस्थेत किती वेळ होतो माहित नाही .. पण अचानक सरांचे शब्द ऐकू आले .. don' give up ... keep going ... लगेच सावरलो.

कुत्रत्वाचं नातं

लेखक इरामयी यांनी शुक्रवार, 12/07/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही.

प्रस्थापितांचे सामाजिक भान

लेखक सर टोबी यांनी शुक्रवार, 12/07/2019 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखात प्रस्थापित म्हणजे ज्यांनी जीवनातील अनिश्चितता संपवून स्थैर्य प्राप्त केले आहे असे सर्व जण. आता यातील प्रत्येक जण जाणीव पूर्वक समाजाकरिता काही करेलच असे नाही. परंतु ज्या देशात पदोपदी तुम्हाला जीवनाशी झगडणारे लोक दिसतात तेथे प्रस्थापितांकडे आपसूकच 'टॉर्च बेअरर' या अर्थाने बघितले जाते. आणि म्हणून त्यांचे सामाजिक भान असणे किंवा नसणे हे देखील इतरांसाठी महत्वाचे असते. तर हा असा प्रस्थापित एकूणच समाजासाठी आणि देशासाठी कळत नकळत महत्वाची भूमिका बजावत असतो. या समाजाने जर पुरोगामी भूमिका पत्करली तर इतर समाज घटक देखील अशा गोष्टींचे अनुकरण करतात.

डोक्याला शॉट [प्रतिपदा]

लेखक गड्डा झब्बू यांनी शुक्रवार, 12/07/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
चिन्मय बेडवरुन उठला बेसिन जवळ जाऊन वोश घेतला... दाढी आणि अंघोळ करायचा कंटाळा आल्याने तोंड पुसून केस विंचरून वरचे कपडे उतरवून तसाच घराबाहेर पडला.... वरचे कपडे उतरवून म्हणजे रात्री झोपताना थंडी वाजत होती म्हणून हाफ टी शर्टवर फुल टीशर्ट आणि थ्रीफोर्थ वर जीन्स चढवली होती ते वरचे कपडे उतरवून... तर सांगायचा मुद्दा काय कि चिन्मय कपडे उतरवून घराबाहेर पडला आई काशी यात्रेला गेली होती ल्लोळत पडायचा कंटाळा आला म्हणून पडली स्वारी घराबाहेर ...

पोपट

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 11/07/2019 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
पशुपक्षी आणि माणूस यांचे जग स्वतंत्र असले तरी काही पशू आणि पक्षी माणसांच्या आसपासच, माणसांच्या सहवासातच वावरणे पसंत करतात. वने आणि जंगले हेच आपले जग याची त्यांना जाणीवही नसते. कुत्रामांजरे तर मानवी जगरहाटीचा अविभाज्य भाग आहे. हळुहळू अन्य काही पशुपक्ष्यांनाही मानवी सहवासाची ओढ आणि आवड वाढू लागली असून वने आणि जंगले सोडून मानवी वस्त्यांवर फेरफटके मारण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सुपरनॅचरल - भाग 3

लेखक nishapari यांनी गुरुवार, 11/07/2019 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619 भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807 जॉनची पत्नी मेरीला अझाझेल या डेमनने मारलं . त्याचा बदला घेण्याचा जॉनने निश्चय केला . त्यातून तो अमानवी अस्तित्वांना शोधून संपवणारा हंटर बनला ..असे अनेक हंटर त्याच्याआधीही होते पण जॉन मात्र अमानवी अस्तित्वांबाबत पूर्ण अनभिज्ञ होता . मेरीच्या मृत्यूनंतर शोध घेता घेता त्याचा इतर हंटर्सशी परिचय झाला .. त्यांच्या मदतीने आणि स्वतः अनुभव घेत तो लवकरच एक कुशल एक्स्पर्ट हंटर बनला .