माझे आजी आजोबा
आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. आजकाल जनरेशन गॅप मुले प्रत्येक मुलाला आज्जी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही. पण मी नशीबवान आहे कारण मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली.
मला आज्जी चे प्रेम ज्यास्त मिळाले आणि अजूनही मिळतेच आहे. आजोबांचा सहवास थोडा कमी मिळाला कारण मी सातवीत असताना ते गेले.त्यांना मी लाडाने आबाजी म्हणायचो. ते दहा वर्षे पार्किन्सन्स ने आजारी होते. शेवटचे दिवस तर इतके हाल झाले की काय बोलायला नको. मी आजी आजोबांच्या खोलीत झोपत असल्याने होणारे हाल बघितले होते. माझ्या आजीने त्यांची खूप सेवा केली .
मिसळपाव