प्रिय मैत्रीण
प्रिय मैत्रीण,
थोड्या उशिराच पत्र लिहितेय. पण याआधी तू पण बिझी असशील. कोणी ना कोणी तुला भेटायला येत असेल,सारखे फोन चालू असतील. कदाचित एका क्षणी तुला हे नकोस झालं असेल. मला कल्पना आहे. मीही त्यातून गेलेय. म्हणूनच या गदारोळात तुला हाक नाही मारली. सावकाश नि मोकळेपणाने तुझ्याशी बोलायला आवडेल मला.
वरती मायना लिहताना पटकन मैत्रीण म्हटलं तुला. खरं सांगू का?, पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली तेव्हा अगदी बरोबरीच्या मैत्रिणीसारखीच वाटलीस मला. वयाचं अंतर चांगलंच आहे आपल्यात. पण पहिल्याच भेटीत तू मला नावाने हाक मारायला सांगितलिस. तेव्हाच जवळची वाटलीस.
मिसळपाव