Skip to main content

प्रकटन

तीन झुरळांचं शुभेच्छापत्र!

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 31/03/2010 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रीण एक हरहुन्नरी कलावंत आहे. तिच्याचसारखी तिची पाच वर्षांची मुलगीदेखील मनस्वी, कलासंपन्न व आनंदी स्वभावाची आहे. मैत्रिणीला नवनवीन कल्पना प्रत्यक्षात राबविण्यात, त्यांना आकार देण्यात समाधान मिळते. तिची लेक तिच्यापेक्षा कलेत एक पाऊल पुढेच आहे. खेळकर, दंगेखोर, खट्याळ, कल्पक आणि मनस्वी!! आजूबाजूच्या जगाचे तरल निरीक्षण तिच्या चित्रांत पाहायला मिळते. पण त्याविषयी बोलायची तिची तयारी नसते बरं का! तुम्ही तिला त्या चित्राबद्दल विचारलंत की ती तुमच्या हातून सटकून पसार होते. परवा ह्या मैत्रिणीचा वाढदिवस झाला.

दरवळ!...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 31/03/2010 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
कॉम्प्युटरमधला `ई-मेल'चा `इनबॉक्स' भरून वाहू लागला, की, नको असलेले काही ई-मेल `डिलीट' करून टाकावे लागतात. मग ते पुरते पुसले जातात. पुन्हा उघडू म्हटलं, तरी सापडत नाहीत. कालांतराने, मेलबॉक्स पुन्हा वाहू लागतो, आणि पुन्हा तेच करावं लागतं... नको असलेले मेल पुसून टाकणं ! जेव्हढं हवं, तेव्हढंच मेमरीमध्ये `सेव्ह' करून ठेवायची सोय कॉम्प्युटरमध्ये करताना, माणसाचा मेंदूच विज्ञानाच्या डोळ्यासमोर असावा... पण मेंदूची बातच अलग असते... तिथल्या `आठवणींच्या कप्प्या'तली, कुठलीच गोष्ट `डिलीट' होत नाही, आणि पुसलीही जात नाही...

अदृश्य डोळ्यांनी अनुभवलेलं साहित्य संमेलन

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 30/03/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या साहित्य संमेलन बरंच गाजतंय...नव्हे, गाजवलं जातंय! नवे नवे वाद, नव्या बातम्या, नवे विषय.... अशाच ह्या बातम्या वाचताना मला 'त्या' साहित्यसंमेलनाची आठवण झाली. एक असं साहित्य संमेलन जे मी तिथे हजर न राहताही अनुभवलं.... नाही, नाही.... मला संजयासारखी दिव्यदृष्टी नव्हती प्रदान केली कोणी! ना मला धृतराष्ट्रासारखा चिंतातुर बाप ''काय काय दिसतंय ते सांग झणी'' म्हणून सतावत होता. मी इकडे पुण्यात..आणि संमेलन तर दूर गावी!

लाभले दुर्भाग्य आम्हास...

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 30/03/2010 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या आयुष्यातील 68 वर्षांपैकी 41 वर्षे मी महाराष्ट्रात घालविली आहेत. मी स्वतःला महाराष्ट्राचेच एक अंग मानतो आणि त्याबद्दल मला अभिमान आहे.'' ...गेली चार दशके केवळ रुपेरी पडदाच नव्हे, तर तमाम भारतीयांचे हृदयही व्यापून उरणारा महानायक अमिताभ बच्चन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हे गौरवाने सांगत होता....हिंदी भाषेतून! वेळात वेळ काढून मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहून अमिताभ यांनी मनाचा मोठेपणा दाखविला; पण त्यांचा "महाराष्ट्राभिमान' फुलून आला, तो भाषणाच्या सुरवातीला मराठी उच्चारशैलीतील "नमस्कार', सुरेश भट आणि गडकरी (फक्त "गडकरी'च!

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 29/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

आमचे काही पूर्व-जन्म....

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे काही पूर्वजन्मः आणखी काही पूर्वजन्म पुन्हा कधीतरी...... १६२४ साली इंग्लंड मधील एक लढवय्या..... एक संस्थानिक..... अर्धांगिनीसहः

आपल्या मोना(लिसा) वहिनी

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या संग्रहातील मोना वहिनी: आणखी नंतर पाठवू. छबिदार छबी: मोनाताई: चारचौघी: मोनाकाकू: Mona vahini1 मोना वहिनी: M

कॅलेब

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 26/03/2010 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... मध्यंतरी टीव्ही च्या कोणत्या तरी चॅनलवर एक गाजलेला मराठी चित्रपट लागला होता. ''मुक्ता''. सोनाली कुलकर्णी, विक्रम गोखले, डॉ. श्रीराम लागू, अविनाश नारकर ह्या अभिनय क्षेत्रातील नामवंत मंडळींचा समावेश, जब्बार पटेल ह्यांचे दिग्दर्शन... अशी भट्टी जमल्यावर खरे तर चित्रपट सुपर ड्यूपर हिट व्हायला हवा होता. पण बहुधा तसे झाले नसावे. चित्रपटात हाताळलेल्या संवेदनशील विषयामुळे असेल कदाचित. पण ह्या चित्रपटात एक व्यक्ती मात्र भरपूर भाव खाऊन गेली. कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... माझा वर्गमित्र. मला कॉलेजमधील ते सुरुवातीचे दिवस अजूनही आठवतात.